Chapters
Chapter 2.2: संतवाणी (आ) योगी सर्वकाळ सुखदाता
Chapter 3: शाल
Chapter 4.1: उपास
Chapter 4.2: मोठे होत असलेल्या मुलांनो...
Chapter 5: दोन दिवस
Chapter 7: फूटप्रिन्टस
Chapter 8.1: ऊर्जाशक्तीचा जागर
Chapter 8.2: जाता अस्ताला
Chapter 9: औक्षण
Chapter 11: जंगल डायरी
Chapter 12.1: रंग मजेचे रंग उदयाचे
Chapter 13: हिरवंगार झाडासारखं
Chapter 15: खरा नागरीक
Chapter 16.1: स्वप्न करू साकार
Chapter 16.2: व्युत्पत्ती कोश
Chapter 16.3: उपयोजित लेखन
Chapter 17: अपठित गद्य
Chapter 18: भाषाभ्यास

Chapter 15: खरा नागरीक
SCERT Maharashtra Question Bank solutions for 10th Standard SSC Marathi Second Language Maharashtra State Board 2021 Chapter 15 खरा नागरीक कृती क्रमांक:१
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. गुण (०७)
आकलन कृती
१. कोष्टक पूर्ण करा
निरंजन आज भल्या पहाटेस उठून अभ्यासाला बसला होता. आज शेवटचा, नागरिकशास्त्राचा पेपर. तो झाला, की संपलीच परीक्षा. इतिहास, भूगोल आणि नागरिकशास्त्र, तिन्ही विषयांचा केवढा अभ्यास करावा लागतो. त्यात हे नागरिकशास्त्र जरा अवघडच. पहाटेची, सकाळची वेळ अभ्यासाला योग्य असते, हा भडसावळे गुरुजींनी दिलेला सल्ला अगदी योग्य होता. सकाळच्या टवटवीत आणि प्रसन्न वातावरणात अभ्यास खूप छान होतो. शरीरही पुरेशा विश्रांतीमुळे ताजंतवानं बनलेलं असतं. प्रसन्न वातावरणामुळे मनही अभ्यासात चटकन लागू शकतं. हवेत सुखद गारवा असतो. दुरून एखादी भूपाळी किंवा रेडिओवरचं आवडतं भक्तिगीत ऐकू येत असतं. ते नसेल तर पक्ष्यांचं सुमधुर संगीत साथीला असतंच. अशा आल्हाददायक वातावरणात संस्कृतचा एखादा श्लोक चटकन पाठ होतो. एरवी न कळलेलं गणित चटकन कळतं. त्याची रीतही लक्षात राहते, हा निरंजनचा अनुभव. त्यामुळेच भडसावळे गुरुजींचा हा सल्ला त्याला मोलाचा वाटे. निरंजनची गुरुजींवर अपार श्रद्धा होती. तसं गुरुजींचंही निरंजनवर खूप प्रेम होतं. तो त्यांचा लाडका विद्यार्थी होता, कारण तो अतिशय प्रामाणिकपणे काम करायचा आणि अभ्यासही. या जगात त्याचं असं कुणी नव्हतंच. दूरदूरच्या नात्यातल्या एका मावशीच्या घरी चिपळूण शहरालगतच्या एका उपनगरात तो राहायचा. गावापासून दूर डोंगराच्या पायथ्याशी हे मावशीचं घर होतं. आईवडील लहानपणीच वारले. काही दिवस मामाने सांभाळ केला आणि मग कामासाठी म्हणून चिपळूणला आणलं. या मावशीकडे आणून सोडलं आणि तोही मुंबईला निघून गेला तो कायमचाच. जाताना मोलाचा सल्ला मात्र देऊन गेला - 'रडत बसू नको. शेण, गोठा वगैरे जी पडतील ती सारी कामं कर. मावशी देईल ते खा आणि इथंच रहा. मावशी तुला शाळेतही घालणार आहे.' |
२. आकलन कृती
१. कारण लिहा. (०१)
निरंजन हा भडसावळे गुरुजींचा लाडका विद्यार्थी होता, कारण - ______
२. खालील दोन गोष्टींसाठी परिच्छेदात आलेला एक शब्द म्हणजे - (०१)
या विषयाचा पेपर झाला की परीक्षा संपली ______
हा विषय जरा अवघड होता ______
३. स्वमत (०३)
निरंजनचा मामा त्याच्याशी कसा वागला हे परिच्छेदाच्या आधारे लिहा.
SCERT Maharashtra Question Bank solutions for 10th Standard SSC Marathi Second Language Maharashtra State Board 2021 Chapter 15 खरा नागरीक कृती क्रमांक:२
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. गुण (०७)
आकलन कृती
१. चौकट पूर्ण करा. (०२)
मामा गेला तो पुन्हा परतला नाही; मात्र लहानगा निरंजन मावशीच्या घरी प्रामाणिकपणे काम करायचा. घरातल्या सर्वांशी त्याने जमवून घेतलं आणि शाळेत नाव दाखल केलं. मावशीची परिस्थिती यथातथाच असल्याने निरंजन वार लावून जेवायचा. पहिल्याच वर्षी त्याची अभ्यासातली प्रगती पाहून भडसावळे गुरुजींनी त्याला थोरामोठ्यांच्या घरी वार लावून दिले. दररोज एकाच्या घरी दुपारी निरंजन पाहुणा म्हणून जेवायला जायचा, मग तिथून शाळेत. संध्याकाळी मात्र मावशीकडे जे काही मिळेल त्यावर रहायचा. सकाळी लवकर उठून घरातली, गोठ्यातली सारी कामं आटपून अभ्यासाला बसायचा. गुरुजींवर श्रद्धा ठेवायचा आणि परीक्षेत पहिला नंबर पटकवायचा. त्याच्या वह्या-पुस्तकांचा खर्च भडसावळे गुरुजीच करायचे. गुरुजींनी त्याला सांगितलं, की 'जोपर्यंत तुझा पहिला नंबर आहे, तोपर्यंतच मी सारा खर्च करीन आणि वारही लावून देईन. नाहीतर नाही.' गुरुजींचं हे वाक्य लक्षात ठेवून निरंजन झटून अभ्यास करायचा. आज नागरिकशास्त्राचा अभ्यास करत असताना आधीचे सगळे पेपर्स चांगले गेले असल्याने तो मनोमन खूश होता. नागरिकांची कर्तव्ये कोणती? उत्तम नागरिक कुणाला म्हणावे? लोकसभा म्हणजे काय? ग्रामपंचायतीचा प्रमुख कोण असतो? साऱ्या प्रश्नांची उत्तरे त्याला धडाधड येत होती. अभ्यास करता करता किती वेळ लोटला कुणास ठाऊक. निरंजन ताडकन उठून उभा राहिला. नऊ वाजून गेले होते. साडेदहाची परीक्षा. त्याआधी देशमुखांकडे जायचं होतं. केवढंतरी लांब चालायचं होतं. भराभर आवरून तो निघाला. |
२.आकलन कृती
कारण लिहा. (०२)
- निरंजन वार लावून जेवायचा, कारण -______
- निरंजन मनातल्या मनात उजळणी करत होता, कारण - ______
३. स्वमत (०३)
हक्काचे घर नसले की इतरत्र राहताना लहानपणीच परिस्थितीशी जुळवून घ्यायला मुले शिकतात. तुमचे मत स्पष्ट करा.
SCERT Maharashtra Question Bank solutions for 10th Standard SSC Marathi Second Language Maharashtra State Board 2021 Chapter 15 खरा नागरीक कृती क्रमांक:३
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. गुण (०७)
आकलन कृती
१. शब्दजाल पूर्ण करा. (०२)
१. ______
२. ______ स्टेशनवर गेल्याने निरंजनचे होणारे नुकसान
३. ______
४. ______
मावशीचं घर गावाबाहेर डोंगरपायथ्याशी. मध्ये एक नदीही लागायची. पूर्वी ही नदी पाण्यात उतरूनच चालत चालत पार करायला लागायची; परंतु आता कोकण रेल्वे आल्याने रेल्वेचा छान पूल नदीवर आला. पुलाच्या एका बाजूने लोकांसाठी पायवाटही ठेवली होती. या पुलामुळं आता जाणं-येणं सोपं झालं होतं. निरंजन अभ्यासाची मनातल्या मनात उजळणी करत झपाझप चालला होता. वाटेत त्याला भला मोठा दगड पडलेला दिसला. कुणीतरी कामासाठी घेतला असेल आणि पुन्हा तसाच ठेवून दिला असेल. निरंजनने तो दगड उचलून बाजूला ठेवला. त्याला लोकांच्या या बेफिकीर प्रवृत्तीचा भयंकर राग येई. तुम्ही विसरलात; पण दुसरा ठेचकाळून जिवाला मुकतो त्याचं काय! असंच त्याचं म्हणणं. निरंजन पुलावर पोहोचला तेव्हा साडेनऊ वाजून गेले असावेत. आता नऊ पन्नासची गाडी येईल. धाड्धाड् आवाज करत दिमाखात पुलावरून जाईल. ही कोकण गाडी किती छान दिसते; पण दिसते न दिसते तोच लगेच बोगद्यात शिरते. काय मजा येत असेल नाही गाडीतून जायला? आपणही मोठं झाल्यावर गाडीतून फिरू, या विचाराने तो हुरळून गेला. तोच त्याचं लक्ष डाव्या बाजूस रुळाखाली पडलेल्या भल्या मोठ्या भगदाडाकडे गेलं. हे छिद्र कसलं? रोज नसतं बुवा, असं म्हणत त्यानं जवळ जाऊन पाहिलं तो कुणीतरी काँक्रीट फोडून रेल्वेचे रूळ वेडेवाकडे करून ठेवल्याचं त्याच्या ध्यानी आलं. निरंजनला आश्चर्यच वाटलं. |
२. आकलन कृती
१. चूक की बरोबर ते लिहा. (०१)
- मावशीचे घर गावाबाहेर होतं.
- निरंजन स्टेशनबाहेर पोहोचला तेव्हा दहा वाजले होते.
२. चौकट पूर्ण करा. (०१)
निरंजन सावध होताच या गोष्टी विसरला -
१ ______ २ ______
३. स्वमत (०३)
आपण जे शिकलो ते आपण आचरणात आणले पाहिजे तरच खऱ्या अर्थाने शिक्षण म्हणता येईल, तुमचे मत स्पष्ट करा.
SCERT Maharashtra Question Bank solutions for 10th Standard SSC Marathi Second Language Maharashtra State Board 2021 Chapter 15 खरा नागरीक कृती क्रमांक:४
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. गुण (०७)
आकलन कृती
१.
१. उताऱ्याच्या आधारे पाच हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा. (०१)
२. कोष्टक पूर्ण करा. (०१)
रात्री दोन वाजता शेवटची गाडी इथून जाते. त्यानंतर पहाटेस कुणीतरी हा उपद्व्याप जाणीवपूर्वक केला असावा. आता प्रवाशांनी भरलेली नऊ पंन्नासची गाडी येईल. निरंजन एकदम सावध झाला. गाडी आली तर भयंकर अपघात होईल, हे त्याच्या लक्षात आलं. निरंजन नागरिकशास्त्राचा पेपर, देखमुखांकडचं जेवण सारं विसरला. त्याच्या डोळयांसमोर धाड्धाड् आवाज करत येणारी रेल्वेगाडी दिसू लागली. कानठळया बसवणारा आवाज आणि लोकांच्या किंकाळया कानांत घुमू लागल्या. स्टेशन इथून खूप दूर होतं. तीन-चार किलोमीटर तिथपर्यंत सांगायला जायचं तर परीक्षा बुडणार होती. मग नापास. भडसावळे गुरुजींची मदत बंद. शिक्षणही बंद. रेल्वेने फिरायचं स्वप्न अपुरंच राहणार होतं; परंतु मन मानायला तयार नव्हतं. त्याने क्षणभर विचार केला आणि स्टेशनच्या दिशेने धाव घेतली. तो स्टेशनात शिरला तेव्हा नऊ पन्नासची गाडी नुकतीच आली होती. आता पाच मिनिटांतच ती सुटणार होती. निरंजनने धावतच स्टेशनमास्तरांना गाठलं. त्यांना पुलावरच्या खराब झालेल्या रुळांबद्दल सांगितलं; पण ते त्यांना खरंच वाटेना. अखेर निरंजनने आर्जवं केली, की निदान पाहून आल्याशिवाय तरी गाडी सोडू नका. मी खोटं बोलत असेन, तर मला पोलिसांच्या ताब्यात द्या. एवढं बोलल्यावर स्टेशनमास्तरांनाही त्याच्या बोलण्यात तथ्य वाटू लागलं. उगाच धोका नको म्हणून गाडी थांबवायला सांगून ते पुलाकडे निघाले. निरंजनने नेमकी जागा दाखवली. |
२. आकलन कृती
१. घटनाक्रम लावा. (०२)
१. निरंजनने धावतच स्टेशन मास्तरांना गाठलं.
२. निरंजनने आर्जवं केली.
३. पुलावरच्या खराब झालेल्या रुळांबद्दल सांगितलं.
४. नऊ पन्नासची गाडी नुकतीच आली होती.
३. स्वमत (०३)
कधी कधी छोटी मुलेही समाजोपयोगी असे मोठे काम करतात. तुमचे विचार स्पष्ट करा.
SCERT Maharashtra Question Bank solutions for 10th Standard SSC Marathi Second Language Maharashtra State Board 2021 Chapter 15 खरा नागरीक कृती क्रमांक:५
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. गुण (०७)
आकलन कृती
१. आकृती पूर्ण करा. (०२)
अ)
ब)
फारच भयंकर! कल्पना करता येणार नाही, असा भयंकर अपघात झाला असता. स्टेशनमास्तरांनी लगेचच गाडी दीर्घकाळ थांबवण्याचा आदेश दिला आणि ते या घटनेचा पंचनामा करायला लागले. घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, सारे अधिकारी तत्काळ त्या ठिकाणी जमा झाले. पहिली खबर देणारा म्हणून निरंजनलाही थांबावं लागलं. एवढा मोठा अपघात त्याच्या चाणाक्षपणामुळे टळला म्हणून त्याचं कौतुकही झालं; परंतु त्या वेळी निरंजन मात्र दूर एका झाडाखाली बसला होता. तो निराश झाला होता. त्याचा नागरिकशास्त्राचा पेपर चुकला होता. तो नापास होणार होता. त्याला गुरुजींकडून मिळणाऱ्या सगळया सवलती रद्द होणार होत्या. निरंजनच्या जवळ येऊन वार्ताहरांनी त्याचं नाव विचारलं. फोटोही काढला. निरंजन उदास मनाने घरी परतला. |
२. आकलन कृती
१. कृती पूर्ण करा. (०२)
i. घटनेचे गांभीर्य ओळखून तत्काळ त्या ठिकाणी जमा झालेले -
१. ______ २. ______ ३.______ ४. ______
ii. उदास मनाने घरी परतणारा - ______
३. स्वमत (०३)
कधी कधी दुसऱ्याचे भले होण्यासाठी आपल्याला काही नुकसान सहन करावे लागते. आपले मत व्यक्त करा.
SCERT Maharashtra Question Bank solutions for 10th Standard SSC Marathi Second Language Maharashtra State Board 2021 Chapter 15 खरा नागरीक कृती क्रमांक:६
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. गुण (०७)
आकलन कृती
१. आकृतिबंध पूर्ण करा. (०२)
दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रात निरंजनाची स्तुती फोटोसकट छापून आली होती. भीषण अपघात टाळल्याचं श्रेय त्यालाच देण्यात आलं होतं. त्या दिवशी मावशीच्या घराकडे मोठमोठी माणसं आली. खुद्द जिल्हाधिकारी आले. शाळेचे मुख्याध्यापक आणि भडसावळे गुरुजीही आले. निरंजनने धावत पुढे होऊन गुरुजींचे पाय धरले. रडत रडत तो म्हणाला, “गुरुजी, मी नापास होणार. माझा कालचा नागरिकशास्त्राचा पेपर बुडाला.” “नाही रे बाळा. तू उत्तम नागरिक आहेस. शेकडो माणसांचा जीव वाचवलास आणि नागरिकशास्त्राच्या खऱ्याखुऱ्या परीक्षेत पास झालास. तुझं वर्ष कसं वाया जाईल? हे बघ, शाळेचे सगळे अधिकारी आलेत. खास बाब म्हणून तुझी नागरिकशास्त्राची परीक्षा उद्या घेतली जाणार आहे, जिल्हाधिकाऱ्यांनी तुला सरकारी वसतिगृहात प्रवेश द्यायचं ठरवलंय आणि वर वह्यापुस्तकांच्या खर्चासाठी शिष्यवृत्ती मिळणार आहे. आता नको हं तुला वार लावून जेवायला.” असं म्हणून गुरुजींनी निरंजनला हृद्याशी धरलं, तेव्हा साऱ्यांचेच डोळे पाणावले. |
२. आकलन कृती (०२)
१. खऱ्या नागरिकाची कर्तव्ये
१. ______
२. ______
३. ______
४. ______
३. स्वमत (०३)
'निरंजनच खरा नागरिक' हे तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
Chapter 15: खरा नागरीक

SCERT Maharashtra Question Bank solutions for 10th Standard SSC Marathi Second Language Maharashtra State Board 2021 chapter 15 - खरा नागरीक
SCERT Maharashtra Question Bank solutions for 10th Standard SSC Marathi Second Language Maharashtra State Board 2021 chapter 15 (खरा नागरीक) include all questions with solution and detail explanation. This will clear students doubts about any question and improve application skills while preparing for board exams. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clear your confusions, if any. Shaalaa.com has the Maharashtra State Board 10th Standard SSC Marathi Second Language Maharashtra State Board 2021 solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster.
Further, we at Shaalaa.com provide such solutions so that students can prepare for written exams. SCERT Maharashtra Question Bank textbook solutions can be a core help for self-study and acts as a perfect self-help guidance for students.
Concepts covered in 10th Standard SSC Marathi Second Language Maharashtra State Board 2021 chapter 15 खरा नागरीक are खरा नागरिक.
Using SCERT Maharashtra Question Bank 10th Standard [१० वीं कक्षा] solutions खरा नागरीक exercise by students are an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise also page wise. The questions involved in SCERT Maharashtra Question Bank Solutions are important questions that can be asked in the final exam. Maximum students of Maharashtra State Board 10th Standard [१० वीं कक्षा] prefer SCERT Maharashtra Question Bank Textbook Solutions to score more in exam.
Get the free view of chapter 15 खरा नागरीक 10th Standard [१० वीं कक्षा] extra questions for 10th Standard SSC Marathi Second Language Maharashtra State Board 2021 and can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation