Advertisement Remove all ads

Question Bank Solutions for SSC (Hindi Medium) 10th Standard [१० वीं कक्षा] - Maharashtra State Board - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Subjects
Topics
Subjects
Popular subjects
Topics
Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads
Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]
< prev  1 to 20 of 270  next > 

उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.   गुण (०७)

आकलन कृती

१. एका वाक्यात उत्तरे लिहा. (०२)

 १. म्हातारा भिक्षेकरी कोठे बसला होता?

 २. भिक्षेकर्याने अंगावर व अंगाखाली काय पांघरले होते?

पुढे चार-पाच दिवस मला काही कामांमुळे संध्याकाळी ओंकारेश्वराला जाण्यास उसंत लाभली नाही. त्यांनतर मी नेहमीप्रमाणे ये-जा करत राहिलो. मग एकदम त्या भिक्षेकरी वृद्धाची आठवण आली. तो नेहमीच्या ठिकाणी नव्हताच. तेथील पुलावर चक्कर मारावी म्हणून मी उठलो व पुलावरून चालू लागलो. पुलाच्या जवळपास मध्यावर तो भिक्षेकरी म्हातारा दिसला. मी लगबगीने त्याच्याकडे गेलो. पाहतो तो काय, तीच चिरगुटे अंगाखाली व अंगावर, तेच कुडकुडणे, तेच दीनवाणे जिणे!

मी म्हटले, ’बाबा, तुम्ही मला ओळखले?“

त्याने नकारार्थी मान हलवली.

मग मीच म्हटले, ’बाबा, पाच-सहा दिवसांपूर्वी मी तुम्हांला दोन शाली दिल्या होत्या. आठवते?“

यावर म्हातारा खुलला व पुन्हा हात जोडून म्हणाला, ’हे भल्या माणसा, तू लई मोठा! म्यास्नी शाली दिल्या! पण बाबा, म्या भिकाऱ्याला शाली कशा शोभतील? त्या शोभेपेक्षा पोटाची आग लई वाईट! मी शाली इकल्या व दोन-तीन दिवस पोटभर जेवून घेतलं बाबा! आमचं हे असलं बिकट जिणं! तुझं लई उपकार हायेत बाबा.“

शालीची शोभा आणि ऊब व पोटाची आग आणि अन्नाची ऊब!

भुकेल्यास अन्न दयावे, तहानलेल्यास पाणी दयावे आणि हेही जमले नाही, तर अभाग्यांना सन्मानाच्या शाली तरी दयाव्यात!

२. आकृतिबंध पूर्ण करा. (०२)

३. स्वमत कृती (०३)

'पांघरण्यासाठी दिलेल्या शाली भिक्षेकऱ्याने विकल्या' त्याची ही कृती तुम्हांस योग्य वाटते, की अयोग्य हे सकारण लिहा.

[0.01] गद्य
Chapter: [0.01] गद्य
Concept: गद्य (10th Standard)

उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. गुण (०७)

आकलन कृती

१. चौकटी पूर्ण करा. (०२)

 १. प्रत्येक कार्यक्रमात सन्मान म्हणून दिले जाते – ______

 २. लेखक वाईला येथे राहत होते- ______

एकदा मी पु.ल. देशपांडे यांच्याकडे काही एक निमित्ताने गेलो होतो. काम झाल्यावर मी निघण्याच्या बेतात होतो; तेवढ्यात सुनीताबाइर्नी मला थांबवले व विचारले, ’तुम्हांला शाल दिली तर चालेल काय?“

मी एका पायावर 'हो' म्हटले. पु.ल. व सुनीताबाई यांनी मला शाल द्यावी, हा मला मोठा गौरव वाटला. ती शाल मी माझ्याखोलीतल्या सुटकेसमध्ये ठेवून दिली. वापरली मात्र कधीच नाही.

पुढे वाईला विश्वकोशाचा अध्यक्ष म्हणून मी गेलो. तिथे नदीकाठच्या प्राज्ञ पाठशाळेच्या खोलीत मी राहत असे. खोलीच्या दक्षिणेकडील खिडक्या कृष्णा नदीच्या चिंचोळया प्रवाहावर होत्या. थंडीच्या दिवसात एक बाई माझ्या खिडकीखालील घाटाच्या छोट्या तटावर तिचे छोटे मूल एका टोपलीत ठेवून मासे पकडण्याच्या उद्योगात होती. तिचे बाळ कडाक्याच्या थंडीने कुडकुडत रडत होते; पण आई तिकडे बघतही नव्हती. मला मात्र राहवले नाही. मी सुटकेसमधील 'पुलकित' शाल काढली, पाचपन्नास रुपयांच्या नोटा काढल्या व त्या बाईला हाक मारली. खिडकीतून ते सर्व खाली दिले आणि म्हटले, “त्या बाळाला आधी शालीत गुंडाळ आणि मग मासे मारत बैस.” या घटनेची ऊब पुलकित शालीच्या उबेपेक्षा अधिक होती.

कविवर्य नारायण सुर्वे खूप सभा, संमेलने गाजवत. पुढे ते साहित्य संमेलनाचे अध्यक्षही झाले. परिणामत: त्यांच्या कार्यक्रमांना अहोरात्र भरतीच असे. प्रत्येक कार्यक्रमात सन्मानाची शाल व श्रीफळ त्यांना मिळत राही. एकदा ते मला म्हणाले, “या शाली घेऊन घेऊन मी आता 'शालीन' बनू लागलो आहे.”

२. आकृतिबंध पूर्ण करा. (०२)

३. स्वमत कृती (०३)

'शालीमुळे शालीनता जाते' विधान स्पष्ट करा.

[0.01] गद्य
Chapter: [0.01] गद्य
Concept: गद्य (10th Standard)

उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. गुण (०७)

आकलन कृती

१.

i. आकृती पूर्ण करा. (०१)

लेखकाने उपोषण सुरू केल्यावर लोकांची ऐकू येणारी बोलणी- ______

ii. चौकट पूर्ण करा. (०१)

लेखकाची आस्था ज्या शब्दांबद्दल वाढू लागली ते शब्द- ______

माझ्या खाजगी उपोषणाची हकीकत चाळीत जाहीर झाली आणि येताजाता ही माझी 'नाही ती भानगड' आहे, उगीच 'हात दाखवून अवलक्षण ' आहे, 'पेललं नाही तेव्हा खाजगी झालं!' अशी वाक्ये माझ्या  कानांवर येऊ लागली; पण मी कोणत्याही टीकेला भीक घालणार नव्हतो. 'एकशे एक्क्याऐंशी पाैंड.' रात्रंदिवस ते कार्ड माझ्या डोळयांपुढे नाचत होते. वजन कमी झाले पाहिजे, या विचाराने माझी झोप उडाली. झोप कमी झाली तर वजन उतरते या विचाराने मला त्याचेही काही वाटत नव्हते. मी पूर्वीसारखा गाढ झोपत नाही यावर धर्मपत्नीचा मात्र अजिबात विश्वास नव्हता. “घोरत तर असता रात्रभर!” अशासारखी दुरुत्तरे ती मला करत असे.

 “दोन महिन्यांत पन्नास पाैंड वजन कमी करून दाखवीन तर खरा!” अशी भीष्मप्रतिज्ञा करून मी आहारशास्त्रावरच्या पुस्तकात डोके घालू लागलो. प्रोटीनयुक्त पदार्थ, चरबीयुक्त द्रव्ये वगैरे शब्दांबद्दलची माझी आस्था वाढू लागली. साऱ्या ताटांतले पदार्थ मला न दिसता नुसत्या ‘कॅलरीज’ मला दिसू लागल्या आणि आनंदाची गोष्ट अशी, की वजन उतरवण्याच्या शास्त्रात पारंगत झालेले तज्ज्ञ मला रोज डझनवारीने भेटू लागले. इतकेच काय; परंतु ज्या आमच्या चाळीतल्या लोकांनी माझ्या  उपासाची अवहेलना केली होती, त्यांनीच मला ‘डाएटचा’ सल्ला दिला. उदाहरणार्थ - सोकाजी त्रिलोकेकर.

२. कोण ते लिहा.  (०२)

१. लेखक पूर्वीसारखे गाढ झोपत नाही यावर विश्वास न ठेवणारी ______

२. लेखकाला डाएटचा सल्ला देणार ______

३. स्वमत कृती (०३)

तुम्ही केलेल्या एखाद्या भीष्मप्रतिज्ञेबद्दल माहिती लिहा.

[0.01] गद्य
Chapter: [0.01] गद्य
Concept: गद्य (10th Standard)

उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. गुण (०७)

आकलन कृती

१. आकृतिबंध पूर्ण करा. (०२)

“तुला सांगतो मी पंत, 'डाएट' कर. बटाटा सोड. बटाट्याचं नाव काढू नकोस.”

“हो! 'म्हणजे कुठं राहाता?' म्हणून विचारलं तर नुसतं 'चाळीत राहतो' म्हणा. 'बटाट्याची चाळ' म्हणू नका. वजन वाढेल! खी: खी: खी:!” जनोबा रेगे या इसमाला काय म्हणावे हे मला कळत नाही. नेहमी तिरके बोलायचे म्हणजे काय!

पण सोकाजींनी त्याला परस्पर जामून टाकले. “ए इडिअट! सगळ्याच गोष्टींत जोक काय मारतोस नेहमी? मी सांगतो तुला पंत-तू बटाटा सोड.” मी काय काय सोडले असता माझे वजन घटेल याची यादी बटाट्यापासून सुरू झाली.

“बटाट्याचं ठीक आहे; पण पंत, आधी भात सोडा.” एक सल्ला. “भातानं थोडंच लठ्ठ व्हायला होतं? आमच्या कोकणात सगळे भात खातात. कुठं आहेत लठ्ठ? तुम्ही डाळ सोडा.” काशीनाथ नाडकर्णी.

“मुख्य म्हणजे साखर सोडा.”

“मी सांगू का? मीठ सोडा.”

“लोणी-तूप सोडा-एका आठवड्यात दहा पाैंड वजन घटलं नाही तर नाव बदलीन. आमच्या हेडक्लार्कच्या वाइफचं घटलं.”

“तेल आणि तळलेले पदार्थ आधी सोडा.” बाबूकाका.

“दिवसा झोपणं सोडा.”

“खरं म्हणजे पत्ते खेळायचं सोडा. बसून बसून वजन वाढतं.”

मी मात्र या सर्व जनांचे ऐकून मनाचे करायचे ठरवले होते. पहिला उपाय म्हणून मी 'आहारपरिवर्तन' सुरू केले.

२. आकलन कृती 

कोण ते लिहा.  (०२)

अ) लेखकाला तेल व तळलेले पदार्थ सोडायला सांगणारे 

आ) उताऱ्याच्या आधारे 'आहारपरिवर्तन' हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.

३. स्वमत (०३)

'लेखकाने ऐकावे जनाचे करावे मनाचे असे ठरवले' लेखकाच्या या मताशी तुम्ही सहमत आहात का?

[0.01] गद्य
Chapter: [0.01] गद्य
Concept: गद्य (10th Standard)

उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. गुण (०७)

आकलन कृती

१. एका वाक्यात उत्तरे लिहा. (०२)

 १. उपास हे कोणाचे खास कुरण होते?

 २. लेखकाच्या वजनक्षय संकल्पाला कोणी सुरुंग लावला?

“उगीच आरडाओरडा नका करू. वजनाचं ते काय मेलं? होईल हळूहळू कमी आणि कोणाचं मागून खात नाही म्हणावं आम्ही. स्वत:च कमवून खातो म्हणावं. वाढलं तर तर वाढू दे वजन.” मुलांना देण्यासाठी लाडू काढून बशी ठेवत आणि माझ्या वजनक्षयसंकल्पाला आणखी नवे सुरुंग लावीत ती उद्गारली.

“लाडू कशाला केलेस? साखर असेल त्यात!”

“इश्श! साखरेशिवाय लाडू आमच्या नाही घराण्यात केले कुणी!”

तात्पर्य, चहा बिनसाखरेचा होता हे खरे; परंतु लाडवाच्या रूपाने काही कॅलरीज पोटात गेल्याच!

दोरीवरच्या उड्यांचा फक्त एकदा प्रयत्न केला व पहिली उडीच शेवटची ठरली, कारण आठ गुणिले दहाच्या आमच्या दिवाणखान्यात प्रथम दोरी संपूर्ण फिरवणे अवघड. एकदा डोक्यावरून दोरी पलीकडे गेली ती ड्रेसिंग टेबलावरच्या तेलांच्या व औषधांच्या बाटल्या खाली घेऊन आली. दुसऱ्यादा अर्धवट गॅलरी आणि अर्धवट घरात राहून दोरी फिरवली ती आचार्य बर्व्यांच्या गळ्यात. त्यांचा माझ्यावर आधीच राग होता. मी उपास करतो हे कळल्यावर चाळीतली सारी मंडळी समाचाराला येऊन गेली; परंतु आचार्य बाबा बर्वे शेजारच्या खोलीत असूनही आले नाहीत, कारण 'उपास' हे त्यांचे खास राखीव कुरण होते.

“हा दुष्टपणा माझ्या गळ्यात दोरी अडकवून केलात हे ठीक झालं; पण तुमच्या वयाला न शोभणाऱ्या ह्या धिंगामस्तीला दुसरा कोणी माझ्यासारखा बळी पडला असता, तर तुमची धडगत नव्हती. मी तुम्हांला क्षमा करतो.”

२. आकलन कृती

१. खालील घटनेचा परिणाम लिहा. (०१)

घटना: लेखकाने दोरीवरची पहिली उडी मारली.

परिणाम: _____

२. पुढील विधान सत्य की असत्य ते लिहा. (०१)

बाबा बर्व्यांचा लेखकावर आधीपासूनच राग होता.

३. स्वमत (०३)

'लेखकाने ऐकावे जनाचे करावे मनाचे असे ठरवले' लेखकाच्या या मताशी तुम्ही सहमत आहात का?

[0.01] गद्य
Chapter: [0.01] गद्य
Concept: गद्य (10th Standard)

उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. गुण (०७)

१. आकलन कृती

 १. खालील चौकटी पूर्ण करा. (०१)

   १.लेखकाचे कुचकट स्वभावाचे शेजारी -______

   २.लेखकाने वजनकाट्यात टाकलेले नाणे- ______

 २. लेखकाचे वजन कमी करण्याचे दोन खात्रीशीर उपाय -

पंधरवडाभरात फक्त दोन वेळाच साखरभात झाला. एकदा सोकाजीने चोरून कोळंबीभात चारला व खालच्या मजल्यावरच्या भाऊजी पसरटवारांनी एकदा नागपुरी वडाभात पाठवला होता. एवढे अपवाद वगळल्यास भाताला स्पर्श नाही केला. त्यामुळे मुख्यत: चरबीयुक्त द्रव्ये शरीरात कमी गेली. माझा एकूण निश्चय पाहून चाळीतल्या मंडळीचा आदर दुणावल्याचे माझ्या सूक्ष्म नजरेतून सुटत नव्हते. जी मंडळी माझी, माझ्या डाएटची आणि उपासाची चेष्टा करत होती त्यांनीच “पंत, फरक दिसतो हं!” अशी कबुली द्यायला सुरुवात केली.

जनोबा रेग्यांसारख्या अत्यंत कुजकट शेजाऱ्यालाही “पंत, भलतेच काय हो रोडावलेत.” असे मान्य करावे लागले. मंडळीच्या प्रशस्तीने मला भीती वाटत होती ती एकाच गोष्टीची म्हणजे मूठभर मांस वाढण्याची; पण असली तुरळक तारीफ ऐकून मी चळण्यासारखा नव्हतो.

इतक्या असामान्य मनोनिग्रह आणि जिव्हानियंत्रणानंतर कमीत कमी वीस ते पंचवीस पाैंडांनी तरी माझे वजन घटले पाहिजे अशी माझी खात्री होती व त्या खात्रीने मी आमच्या ऑफिससमोरच्या वजनाच्या यंत्रावर पाय ठेवला आणि आणेली टाकून तिकीट काढले. महिन्यापूर्वी याच यंत्राने माझे वजन एकशे एक्याऐंशी पाैंड दाखवले होते. एक महिन्याचा उपास, निराहार, शास्त्रोक्त आहार, दोरीवरच्या उड्या इत्यादी उग्र साधना केल्यावर आज तिकिटावर वजन...

मिनिटभर माझा विश्वासच बसेना. एकशे ब्याण्णव पाैंड आणि भविष्य होते: 'आप बहुत समझदार और गंभीर है!'

हल्ली मी वजन आणि भविष्य या दोन्ही गोष्टींची चिंता करायचे सोडून दिले आहे आणि विशेषत: डाएटच्या आहारी तर या जन्मात जाणार नाही. छे, छे, वजनाचा मार्ग भलत्याच काट्यातून जातो.

२. आकलन कृती

  १. योग्य पर्याय निवडून गाळलेल्या जागा भरा. (०१)

  अ) जवळजवळ ______ दिवस हा क्रम चालू होता. (पाचसहा, सातआठ, नऊदहा, दहाबारा)

 आ) दुर्दौवाने रोज गाईचे ______ दूध मिळण्याची सोय नव्हती. (ताजे, सकस, गरम, धारोष्ण)

 २. अनेक शब्दांसाठी एक शब्द लिहा. (०१)

 १. साखर घालून केलेला भात ______ 

 २. पंधरा दिवसांचा समूह______

३. स्वमत (०३)

लेखकाने आपले आहार व्रत कसे चालू ठेवले होते ते तुमच्या शब्दांत लिहा. (०३)

[0.01] गद्य
Chapter: [0.01] गद्य
Concept: गद्य (10th Standard)

उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. गुण (०७)

१. आकृती पूर्ण करा. (०२)

“अवो, स्नेहाताई, मी कुठं एसीत बसूनशान काम करत्ये बाई. शेनामातीत काम करावं लागतं! आन आमच्या वस्तीचा रस्ता बी समदा उखणलाय. समदी धूळ लागती पायास्नी. आन धा-धा मिन्टाला हातपाय धोयाला येळ बी नाय आन पानी तरी कुठं हाय बक्कळ?”

“सॉरी, मावशी खरंच सॉरी,” आपण त्यांच्या मळकट पायांबद्दल बोललो याचं स्नेहललाही कसंतरी वाटलं. तिला टाचेला फाटलेली, अगदी पातळ झालेली त्यांची चप्पल आठवली. रेखा मावशीच्या खणखणीत आवाजानं सुमितही जागा झाला आणि हॉलमध्ये आला. सगळा प्रकार त्याच्या लक्षात आला. तेवढ्यात पावडेकाकाही आले. आज बाबा आणि पावडेकाका कुठल्याशा कार्यक्रमाला जाणार होते. स्नेहलने पावडेकाकांना पाणी दिलं. फरशी पुसणाऱ्या रेखा मावशींचं लक्ष पावडेकाकांच्या तळाव्याकडं गेलं. एकदम गोजिरा, गुलाबी तळावा. कुठं चिरण्या नाहीत की काही नाही! 'एकदम लोन्यागत पाय हाय काकांचा', रेखामावशी स्वत:शीच पुटपुटल्या. त्यांनी स्वत:च्या पायाकडं पाह्यलं ... पायाला कितीतरी चिरण्या पडल्या होत्या... माती धूळा बसून त्या काळ्या पडल्या होत्या. अभिषेक-स्नेहलचे बाबाही तयार होऊन हॉलमध्ये आले.

“मामा, मी एक ॲप तयार केलं आहे. त्या ॲपच्या साहाय्यानं आपण कोणाचे पाय किती स्वच्छ आहेत, हे सांगू शकतो”, सुमितनं सांगितलं.

“सुमित, अरे, पाय स्वच्छ आहेत की नाही, हे सांगायला ॲपची काय गरज आहे? तुम्हां टेक्नोसॅव्ही लोकांना कशाचंही ॲप करण्याशिवाय काही सुचतं की नाही? अरे, सगळयांत भारी ॲप डोक्याच्या कवटीत आहे, हे विसरला की काय तुम्ही लोक?” बाबांनी अनाठायी टेक्नॉलॉजीबद्दलची आपली मळमळ व्यक्त केली.

“मामा, गंमत तर बघ तू माझ्या ॲपची...त्याचं नाव आहे फूटप्रिन्ट्स”, असं म्हणत सुमितनं आपला स्मार्टफोन काढला.

२.

अ) आकृती पूर्ण करा. (०१)

आ) एका वाक्यात उत्तर लिहा. (०१)

सुमितने तयार केलेले ॲप कोणते?

३. स्वमत (०३)

तुमच्या घरी येणाऱ्या कामवाल्या मावशींचा अनुभव थोडक्यात सांगा.

[0.01] गद्य
Chapter: [0.01] गद्य
Concept: गद्य (10th Standard)

उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. गुण (०७)

आकलन कृती

१. कोण ते लिहा. (०२)

अ) रेखा मावशींना सायकल घेऊन देणारा – ______

ब) झर्याच्या स्फटिक स्वच्छ पाण्यासारखे पाय असणार्या – ______

क) स्वच्छ आणि मऊसूत पाय असणारे – ______

ड) पायाची स्वच्छता बघणारा – ______

“गेल्या महिन्यापतुर चालतच येत हुते; पण आता माझ्या लेकानं एक सायकल दिलीया मला. तवा आता सायकलनं येते”, अशी अजून बरीच माहिती त्यांनी भरली. आठवड्यातून सरासरी किती किलोमीटर फिरती होते? ही फिरती तुम्ही कशी करता? आतापर्यंत किती झाडं तुम्ही लावली आहेत?

रेखा मावशी फिरायच्या पायीच, कधीतरी सायकलनं! त्यांच्या इवल्याशा झोपडीपुढंही त्यांनी दोन झाडं लावली होती. त्यातलं एक लिंबोणीचं होतं; पण एवढी सगळी सगळी माहिती सुमित का घेतोय, तेच कुणाला कळेना. रेखा मावशी तर फार गडबडून गेल्या. “आणि आता पाहा, या आहेत रेखा मावशींच्या फूटप्रिन्ट्स...!” असं म्हणत त्यानं मोबाइलचं कसलंसं बटन दाबलं आणि स्क्रीनवर पायपुसणीच्या आकाराचा एक निळा चौकोन उमटला, अगदी आभाळाच्या निरभ्र तुकड्यासारखा! सगळे 'आ' वासून पाहत होते आणि त्या निळया तुकड्याच्या मधोमध दोन पावलं उमटली... एकदम चंदेरी वर्खात मढलेली आणि खाली इंग्रजीत शब्द उमटले... 'सिल्व्हर फूटप्रिन्ट्स! दि मोस्ट क्लीन फूटप्रिन्ट्स!!'

“वाऽ पाह्यलंत रेखा मावशींचे पाय चंदेरी आहेत. एकदम स्वच्छ. झऱ्याच्या स्पटिक स्वच्छ पाण्यासारखे,” सुमित ओरडला. “ह्याऽ हे भलतचं!” रेखामावशींच्या पाायाकडे पाहत पावडेकाका म्हणाले.

सुमितनं हलकेच पावडेकाकांच्या गोजिर्या तळव्यांकडे पाहिले आणि म्हणाला, “काका, आपण तुमच्या पायाचं पाहूया का?”

“त्यात पाह्यचं काय? हे बघ, माझे पाय किती स्वच्छ आणि मऊसूत आहेत....!” पावडेकाका पाय सगळ्यांना दाखवत म्हणाले. “पण मला काय सांगतंय तुमचं ॲप, ते तरी पाहूया,” त्यांनी पुस्ती जोडली.

२. आकृती पूर्ण करा (०२)

अ)

आ)

३. स्वमत (०३)

जागतिक तापमान वाढ नियंत्रित करण्यासाठी कोणती उपाययोजना करणे आवश्यक आहे असे तुम्हांला वाटते ते तुमच्या शब्दांत लिहा.

[0.01] गद्य
Chapter: [0.01] गद्य
Concept: गद्य (10th Standard)

उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. गुण (०७)

आकलन कृती

१. पावडेकाका व रेखा मावशी यांच्या पावलांमधील फरक खालील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा. (०२)

व्यक्ती पावलांचा रंग पावलांच्या रंगाचे कारण
रेखा मावशी    
पावडेकाका    

 

“काका, हे एक शास्त्रीय सत्य आहे. तुमच्या कार्बन सोडण्याच्या प्रमाणावरून तुमच्या पावलांचा काळा रंग ठरतो. रेखा मावशींच्या रोजच्या जगण्यात कार्बन उत्सर्जनाला वावच नाही, म्हणून तर त्यांची पावलं आपल्यापेक्षा अधिक सुंदर, चंदेरी आहेत”, सुमित बोलत होता. “बापरे, आपण फरशी घाण होण्याची गोष्ट करतो; पण आपण तर अवघं वातावरणच घाण, प्रदूषित करत असतो. किती प्रचंड कार्बन चिकटलेला असतो, आपल्या पायांना! ग्लोबल वॉर्मिंगला हातभार लावतो आपण. तापानं फणफणलीय आपली धरती, आपल्या पायाला चिकटलेला हा कार्बन आपल्याला धुवायला हवा. मी ठरवलंय, मी कॉलेजला जाताना सायकल वापरणार. मला माझे पाय रेखा मावशींसारखे चंदेरी हवेत”, स्नेहल गहिवरून म्हणाली.

अभिषेक भारावून म्हणाला, “माझ्या तर कॉलेजसमोरच बसस्टॉप आहे. आजपासून मी बसनंच ये-जा करणार. ठरलं एकदम!”

“खरंय पोरांनो, आजकाल चालणं, सायकल वापरणं विसरूनच गेलोय आपण. अगदी कोपऱ्यावरून भाजी जरी आणायची असली तरी आपण बाईकला किक मारतो आणि पुन्हा व्यायामाकरता वेगळ मॉर्निंग वॉकचं नाटक करतो. बसनं प्रवास करणं तर आपल्याला कमीपणाचं वाटतं; पण आपल्या पायांना चिकटलेला कार्बन प्रमाणात ठेवण्याकरता पब्लिक ट्रान्सपोर्ट इज अ मस्ट”, अभिषेकचे बाबा म्हणाले.

२. आकृती पूर्ण करा. (०२)३. स्वमत (०३)

तुमची शाळा व शाळेचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी तुम्ही कोणकोणत्या उपाययोजना कराल ते तुमच्या शब्दांत लिहा.

[0.01] गद्य
Chapter: [0.01] गद्य
Concept: गद्य (10th Standard)

उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. गुण (०७)

आकलन कृती

१.

 १. आकृती पूर्ण करा. (०१)

 २. 'आई हीच प्रत्येक मुलाची पहिली शिक्षक असते.' हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा. (०१)

शाळा आणि शिक्षक असा विषय निघाला, की मला माझी मुंबईतील शाळा आणि शालेय जीवनातील शिक्षकांची आठवण येते. गिरगावातील युनियन हायस्कूल आणि माझ्या शाळकरी वयात आपुलकीनं संस्कार करणारे भावे सर, जोशी सर, शिर्के सर या साऱ्याचे माझ्यावर फार मोठे ऋण आहे; पण त्याचवेळी हेही सांगितलं पाहिजे, की या शाळेशी आणि या संस्कार देणाऱ्या शिक्षकांशी माझा जो संपर्क आला, तो जिच्यामुळे आला ती माझी परमप्रिय आई आणि माझे मामा यांचे ऋण मी कसे व्यक्त करणार? आई हीच प्रत्येक मुलाची पहिली शिक्षक असते. माझ्या बाबतीत तर आई ही माझी केवळ शिक्षक नव्हती, तर माझे सर्वस्व होती. आमचे मूळ गाव दक्षिण गोव्यातील माशेल. माझे बालपण तिथेच गेले. माझे मामाही याच गावातले. तिथल्या एका मैदानावर खेळल्याच्या आणि पिंपळकट्ट्यावर बसून निवांतपणा अनुभवल्याच्या पुसटशा आठवणी माझ्या मनात अधूनमधून वाऱ्याच्या लहरीसारख्या येत असतात. माझ्या वयाच्या सहाव्या वर्षी माझे वडील वारले आणि आम्हांला उदरनिर्वाहासाठी आमचे माशेल हे गाव सोडावे लागले. मी आणि माझी आई मुंबईत येऊन पोहोचलो. गिरगावातल्या खेतवाडीतील देशमुख गल्लीमध्ये 'मालती निवासा' तील पहिल्या माळयावर छोट्याशा खोल्यांमध्ये आम्ही मायलेक राहात होतो.

आर्थिक परिस्थिती पूर्णपणे खालावलेली. दारिद्र्याशी संघर्ष करणारी माझी अल्पशिक्षित आई आणि शिक्षणासाठी आसुसलेला; पण कोणतीच फी भरणे शक्य नसल्याने 'शाळेत कसा जाऊ?' असे प्रश्नचिन्ह घेऊन वावरणारा मी. त्यावेळचं वातावरण हे असं होतं!

२. आकृती पूर्ण करा. (०२)

३. स्वमत (०३)

'तुमच्या जीवनातील शिक्षकांचे स्थान' या विषयावर तुमचे विचार लिहा.

[0.01] गद्य
Chapter: [0.01] गद्य
Concept: गद्य (10th Standard)

उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. गुण (०७)

आकलन कृती

१.

१. कोण ते लिहा.  (०१)

 अ) लेखकाला जीवनाचं तत्त्वज्ञान शिकवणारे – ______

आ) लेखक पुन्हा मनोमनी जातो ते ठिकाण – ______

२. आकृती पूर्ण करा. (०१)

याच हायस्कूलमध्ये मला भावे सर भेटले. ते आम्हांला भौतिकशास्त्र शिकवत. विज्ञानातील हा विषय शिकवताना त्यांनी केवळ शास्त्र शिकवलं नाही, तर त्या विषयाची गोडी लावली आणि त्याचबरोबर जीवनाचं फार मोठं तत्त्वज्ञान शिकवलं.

एके दिवशी शाळेत त्यांनी एक प्रयोग करून दाखवला. भिंगाच्या साहाय्यानं सूर्यकिरणांची शक्ती कागदावर एकत्र केल्यास कागद जळतो हे त्यांनी दाखवलं आणि माझ्याकडे बघून ते म्हणाले, “माशेलकर, तुमची ऊर्जाशक्ती एकत्र करा, काहीही जाळता येईल.” एकीकडे मला एकाग्रतेचा मंत्र मिळाला आणि दुसरीकडे विज्ञान समजलं.

आयुष्याचं फार मोठं तत्त्वज्ञान मला भावे सरांच्या या शिकवणुकीतून गवसलं. त्यांना मी कसा विसरू शकेन? भावे सरांप्रमाणेच माझ्या शालेय आणि पुढील शैक्षणिक जीवनात जोशी सर, शिर्के सर, श्री. मालेगाववाला या सर्वांनीच माझ्या व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीसाठी उत्तम मार्गदर्शन केलं, संस्कार केले. आयुष्याच्या उभारणीसाठी मला याच शाळेने आणि याच शिक्षकांनी भरपूर शिदोरी दिली. संघर्षासाठी आत्मविश्वास मिळवून दिला. जगण्याचे भान दिले. आजही फिरून ते शाळेचे दिवस आठवताना एकीकडे, प्रचंड दारिद्र्याचा सामना करतानाचे क्षण न् क्षण आठवतात आणि त्याचवेळी माझी आई, माझे शिक्षक, माझी शाळा हे ‘माझे संस्कार केंद्र’ डोळयांसमोर उभे राहते. मी पुन्हा मनोमनी शाळेत जाऊ लागतो.

२. एका वाक्यात उत्तरे लिहा. (०२)

 अ) कागद कशामुळे जळाला?

 आ) लेखकाची संस्कार केंद्रे केणती?

३. स्वमत (०३)

'आई हीच प्रत्येक मुलाची पहिली शिक्षक असते' याविषयी तुमचे विचार स्पष्ट करा.

[0.01] गद्य
Chapter: [0.01] गद्य
Concept: गद्य (10th Standard)

उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. गुण (०७)

आकलन कृती

१. लेखकाने बिबळयाची ताजी पावलं पाहिल्यानंतरच्या कृतींचा घटनाक्रम लिहा.

१. जंगलाच्या कोपऱ्यात हालचाल जाणवली

२.

३.

४. तिथं तेंदूच्या झाडाखाली बांबूमध्ये बिबळया बसला होता

५.

६.

७. वनरक्षकाचा पाय काटकीवर पडला

ता.२७ मे १९९७, वेळ-सकाळी ६ ते ९.३०, कोळसा परिक्षेत्र, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर.

आज पहाटेच कोळसावन विश्रामगृहातून बाहेर पडलो.

गावातून टोंगे वनरक्षक आणि त्यांचा सहकारी वनमजूर येताना दिसले. वनरक्षक येताच आम्ही डावीकडं जाणारा झरी रस्ता धरला. समोर चालणारा वनमजूर अचानक थबकला. मी प्रश्नार्थक नजरेनं पाहिलं, तर त्यानं रस्त्याकडं बोट रोखलं. नुकत्याच गेलेल्या एका मोठ्या बिबळयाची ताजी पावलं तिथं उमटली होती. हा एक नर असून आम्ही पोहोचण्याच्या तासाभराआधीच इथून गेला असावा. मी चौफेर पाहिलं; पण मला तरी काही दिसलं नाही.

अचानक मला जंगलाच्या कोपऱ्यावर थोडीशी हालचाल जाणवली. मी सगळयांना हातानंच थांबायची खूण केली. दुर्बीण डोळयांना लावल्यावर ती हालचाल स्पष्ट झाली. तिथं एका तेंदूच्या झाडाखाली, बांबूमध्ये बिबळा बसला होता; पण त्याचा रंग आसपासच्या परिसराशी एवढा मिसळून गेला होता, की त्याची शेपूट जर हलली नसती, तर तो मला मुळीच दिसला नसता. त्याची पाठ आमच्याकडं होती, त्यामुळे त्यानं अद्याप आम्हांला पाहिलं नव्हतं, पण तेवढ्यात टोंगे वनरक्षकांचा पाय एका वाळक्या काटकीवर पडला आणि 'कट्' असा आवाज झाला.. तिखट कानांच्या बिबळयानं तो आवाज ऐकताच वळून पाहिलं आणि एकाच झेपेत तो जंगलात अदृश्य झाला.

२.

१. चौकट पूर्ण करा. (०१)

  1. प्रकल्पाचे नाव- ______
  2. विश्रामगृहाचे नाव - ______

२. कारण द्या. (०१)

चालताना वनमजूर अचानक थबकला; कारण ...

3. स्वमत (०३)

भारतातील तुमच्या आवडीच्या अभयारण्यासंबंधित तुमचे मत थोडक्यात स्पष्ट करा.

[0.01] गद्य
Chapter: [0.01] गद्य
Concept: गद्य (10th Standard)

उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. गुण (०७)

आकलन कृती

१. कृती पूर्ण करा. (०२)

वाघिणीच्या पिल्लांचे संभाव्य शत्रू –

१. ______ 

२. ______

’ऑऽव्हऽऽ“ अचानक नाल्याच्या पलीकडून आलेल्या या बारीक आवाजानं मी जागीच थबकलो. माझ्या अंगावर सरसरून काटा आला. एक वर्षाच्या वाघांच्या अभ्यासानं आणि अनुभवानं हे ठाऊक होतं, की हा वाघिणीचा आवाज आहे. ती या आवाजानं आपल्या पिल्लांना बोलवत असावी. अचानक पाण्यात 'धपकन' काहीतरी पडल्याचा आवाज आला. मी पाणवठ्याकडं पाहिलं आणि आश्चर्यानं थक्कच झालो. एका पिल्लानं बाजूच्या जांभळीच्या झाडीतून थेट पाण्यात उडी घेतली होती. लगेच त्याच्या पाठोपाठ उरलेली तीनही पिल्लं धपाधप पाण्यात उतरली. आईचा आश्वासक आवाज त्यांच्याकरता उत्साहाचं वारं भरणारा ठरला होता.

वाघीण रात्रीच पिल्लांना नाल्याकाठच्या जांभळीच्या दाट झुडपात लपवून शिकारीसाठी गेली होती. या परिसरात दुसरे नर वाघ, बिबळा रानकुत्री अशा पिल्लांना इतर भक्षकांपासून खूपच धोका असतो. त्यामुळे वाघीण पिल्लांच्या सुरक्षेबद्दल भलतीच दक्ष असते. आता ती रात्रभर जंगलात फिरून पिल्लांजवळ परत आली होती. आईची हाक ऐकताच अजून वर दडून बसलेली पिल्लं खेळकरपणे तिच्याकडं झेपावली होती. तेवढ्यात नाल्याच्या डावीकडच्या विरळ बांबूंमधून मला वाघीण येताना दिसली. ती सरळ पाण्याजवळ आली आणि वळून पाण्यात बसली. रात्रभरच्या वाटचालीनं थकून ती विश्रांती घेत होती; पण पिल्लांच्या उत्साहाला आई बघताच उधाण आलं होतं. त्यांतील एका पिल्लानं तर वाघिणीच्या पाठीवरच उडी घेतली; पण तिथून घसरल्यानं ते धपकन पाण्यात पडलं. तोंडावर पाणी उडताच वाघिणीनं मंदपणे गुरगुरून नापसंती व्यक्त केली; पण पिल्लांना त्याच्याशी काहीच देणं-घेणं नव्हतं. त्यांचा आईच्याभोवती जबरदस्त दंगाधोपा सुरू झाला.

२.

१. चौकटी पूर्ण करा. (०२)

  1. वाघिणीचा आवाज – ______
  2. वाघिणीने शिकारीला जायच्या आधी पिल्ले इथे लपवली – ______

३. वाघीण व तिच्या पिल्लांची भेट हा प्रसंग तुमच्या शब्दांत शब्दबद्ध करा. (०३)

[0.01] गद्य
Chapter: [0.01] गद्य
Concept: गद्य (10th Standard)

उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. गुण (०७)

आकलन कृती

१. कृती पूर्ण करा. (०२)

यापैकी एकाची वाघिणीने शिकार साधली असावी.

१. ______  २. ______

३. ______ ४. ______

साधारणत: कुत्रयापेक्षा लहान आकाराची ही पाच महिन्यांची पिल्लं होती. या वयात लहान मुलं जशी खेळकर असतात, तशीच ही खेळकर होती. एकमेकांचा पाठलाग करणं, मारामारी करणं, पाण्यात उड्या घेणं असे खेळ सुरू झाले. मध्येच आई वळून एखाद्या पिल्लाला मायेने चाटत होती. थोडा वेळ बसल्यावर ती पटकन उभी राहिली. डोकं वळवून तिनं हळूच 'ऑऽवऽ' असा आवाज केला. हा पिल्लांना मागं येण्याबद्दलचा इशारा होता. लगेच वळून ती चालायला लागली. हिनं जंगलात कुठंतरी नक्कीच एखादं सांबर, रानगवा, नीलगाय, रानडुकराची शिकार साधली असावी; पण अशी शिकार जड असल्यानं ती उचलून पिल्लापर्यंत आणणं शक्य नसतं. त्यामुळे पिल्लांजवळ येऊन घटकाभर पाण्यात बसून तिनं विश्रांती घेतली होती आणि आता ती पिल्लांना त्या शिकारीकडं घेऊन जात होती. या चार पिल्लांसोबतच स्वत:चं पोट भरण्यासाठी तिला सतत कोणती-कोणती शिकार करणं आवश्यकच होतं. त्या कलेत ही चांगली पारंगत होती.

वाघिणीनं नाला पार करून बांबूच्या गंजीत पाय ठेवला. आत शिरण्याआधी तिनं वळून पिल्लं सोबत येताहेत की नाही हे पाहून घेतलं. दोन पिल्लं तिच्या मागोमाग निघाली होती; पण दोघांना अद्याप भान नव्हतं. ती पाण्यातच एकमेकांशी खेळण्यात दंग झाली होती. वाघिणीनं परत त्यांना बोलावणारा आवाज काढला. आईच्या या आवाजाबरोबर दोन्ही पिल्लांनी आपला खेळ थांबवला आणि पळत सुटली. दोनच मिनिटांत पिल्लांना घेऊन वाघीण जंगलात दिसेनाशी झाली. आज मी वाघिणीतल्या आईची एक वेगळीच झलक बघितली होती. माझ्या व्याघ्रअनुभवात मोलाची भर घालणारा हा अनुभव होता.

२. आकलन

चौकटी पूर्ण करा. (०२)

वाघिणीच्या पिल्लांचे खेळ

१ . ______  २.______

३. स्वमत (०३)

'लेखकाला वाघिणीतील आईची झलक जाणवली' हे विधान उताऱ्याच्या आधारे स्पष्ट करा. 

[0.01] गद्य
Chapter: [0.01] गद्य
Concept: गद्य (10th Standard)

उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. गुण (०७)

आकलन कृती

१. कोष्टक पूर्ण करा

निरंजन आज भल्या पहाटेस उठून अभ्यासाला बसला होता. आज शेवटचा, नागरिकशास्त्राचा पेपर. तो झाला, की संपलीच परीक्षा. इतिहास, भूगोल आणि नागरिकशास्त्र, तिन्ही विषयांचा केवढा अभ्यास करावा लागतो. त्यात हे नागरिकशास्त्र जरा अवघडच.

पहाटेची, सकाळची वेळ अभ्यासाला योग्य असते, हा भडसावळे गुरुजींनी दिलेला सल्ला अगदी योग्य होता. सकाळच्या टवटवीत आणि प्रसन्न वातावरणात अभ्यास खूप छान होतो. शरीरही पुरेशा विश्रांतीमुळे ताजंतवानं बनलेलं असतं. प्रसन्न वातावरणामुळे मनही अभ्यासात चटकन लागू शकतं. हवेत सुखद गारवा असतो. दुरून एखादी भूपाळी किंवा रेडिओवरचं आवडतं भक्तिगीत ऐकू येत असतं. ते नसेल तर पक्ष्यांचं सुमधुर संगीत साथीला असतंच. अशा आल्हाददायक वातावरणात संस्कृतचा एखादा श्लोक चटकन पाठ होतो. एरवी न कळलेलं गणित चटकन कळतं. त्याची रीतही लक्षात राहते, हा निरंजनचा अनुभव. त्यामुळेच भडसावळे गुरुजींचा हा सल्ला त्याला मोलाचा वाटे.

निरंजनची गुरुजींवर अपार श्रद्धा होती. तसं गुरुजींचंही निरंजनवर खूप प्रेम होतं. तो त्यांचा लाडका विद्यार्थी होता, कारण तो अतिशय प्रामाणिकपणे काम करायचा आणि अभ्यासही. या जगात त्याचं असं कुणी नव्हतंच. दूरदूरच्या नात्यातल्या एका मावशीच्या घरी चिपळूण शहरालगतच्या एका उपनगरात तो राहायचा. गावापासून दूर डोंगराच्या पायथ्याशी हे मावशीचं घर होतं. आईवडील लहानपणीच वारले. काही दिवस मामाने सांभाळ केला आणि मग कामासाठी म्हणून चिपळूणला आणलं. या मावशीकडे आणून सोडलं आणि तोही मुंबईला निघून गेला तो कायमचाच. जाताना मोलाचा सल्ला मात्र देऊन गेला - 'रडत बसू नको. शेण, गोठा वगैरे जी पडतील ती सारी कामं कर. मावशी देईल ते खा आणि इथंच रहा. मावशी तुला शाळेतही घालणार आहे.'

२. आकलन कृती 

 १. कारण लिहा. (०१)

 निरंजन हा भडसावळे गुरुजींचा लाडका विद्यार्थी होता, कारण - ______

 २. खालील दोन गोष्टींसाठी परिच्छेदात आलेला एक शब्द म्हणजे - (०१)

या विषयाचा पेपर झाला की परीक्षा संपली ______

हा विषय जरा अवघड होता ______

३. स्वमत (०३)

निरंजनचा मामा त्याच्याशी कसा वागला हे परिच्छेदाच्या आधारे लिहा. 

[0.01] गद्य
Chapter: [0.01] गद्य
Concept: गद्य (10th Standard)

उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. गुण (०७)

आकलन कृती

१. चौकट पूर्ण करा. (०२)

मामा गेला तो पुन्हा परतला नाही; मात्र लहानगा निरंजन मावशीच्या घरी प्रामाणिकपणे काम करायचा. घरातल्या सर्वांशी त्याने जमवून घेतलं आणि शाळेत नाव दाखल केलं. मावशीची परिस्थिती यथातथाच असल्याने निरंजन वार लावून जेवायचा. पहिल्याच वर्षी त्याची अभ्यासातली प्रगती पाहून भडसावळे गुरुजींनी त्याला थोरामोठ्यांच्या घरी वार लावून दिले. दररोज एकाच्या घरी दुपारी निरंजन पाहुणा म्हणून जेवायला जायचा, मग तिथून शाळेत. संध्याकाळी मात्र मावशीकडे जे काही मिळेल त्यावर रहायचा. सकाळी लवकर उठून घरातली, गोठ्यातली सारी कामं आटपून अभ्यासाला बसायचा. गुरुजींवर श्रद्धा ठेवायचा आणि परीक्षेत पहिला नंबर पटकवायचा. त्याच्या वह्या-पुस्तकांचा खर्च भडसावळे गुरुजीच करायचे. गुरुजींनी त्याला सांगितलं, की 'जोपर्यंत तुझा पहिला नंबर आहे, तोपर्यंतच मी सारा खर्च करीन आणि वारही लावून देईन. नाहीतर नाही.' गुरुजींचं हे वाक्य लक्षात ठेवून निरंजन झटून अभ्यास करायचा.

आज नागरिकशास्त्राचा अभ्यास करत असताना आधीचे सगळे पेपर्स चांगले गेले असल्याने तो मनोमन खूश होता. नागरिकांची कर्तव्ये कोणती? उत्तम नागरिक कुणाला म्हणावे? लोकसभा म्हणजे काय? ग्रामपंचायतीचा प्रमुख कोण असतो? साऱ्या प्रश्नांची उत्तरे त्याला धडाधड येत होती. अभ्यास करता करता किती वेळ लोटला कुणास ठाऊक. निरंजन ताडकन उठून उभा राहिला. नऊ वाजून गेले होते. साडेदहाची परीक्षा. त्याआधी देशमुखांकडे जायचं होतं. केवढंतरी लांब चालायचं होतं. भराभर आवरून तो निघाला.

२.आकलन कृती 

  कारण लिहा. (०२)

  1. निरंजन वार लावून जेवायचा, कारण -______
  2. निरंजन मनातल्या मनात उजळणी करत होता, कारण - ______

३. स्वमत (०३)

हक्काचे घर नसले की इतरत्र राहताना लहानपणीच परिस्थितीशी जुळवून घ्यायला मुले शिकतात. तुमचे मत स्पष्ट करा.

[0.01] गद्य
Chapter: [0.01] गद्य
Concept: गद्य (10th Standard)

उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. गुण (०७)

आकलन कृती

१. शब्दजाल पूर्ण करा. (०२)

१. ______

२. ______ स्टेशनवर गेल्याने निरंजनचे होणारे नुकसान

३. ______

४. ______

मावशीचं घर गावाबाहेर डोंगरपायथ्याशी. मध्ये एक नदीही लागायची. पूर्वी ही नदी पाण्यात उतरूनच चालत चालत पार करायला लागायची; परंतु आता कोकण रेल्वे आल्याने रेल्वेचा छान पूल नदीवर आला. पुलाच्या एका बाजूने लोकांसाठी पायवाटही ठेवली होती. या पुलामुळं आता जाणं-येणं सोपं झालं होतं. निरंजन अभ्यासाची मनातल्या मनात उजळणी करत झपाझप चालला होता. वाटेत त्याला भला मोठा दगड पडलेला दिसला. कुणीतरी कामासाठी घेतला असेल आणि पुन्हा तसाच ठेवून दिला असेल. निरंजनने तो दगड उचलून बाजूला ठेवला. त्याला लोकांच्या या बेफिकीर प्रवृत्तीचा भयंकर राग येई. तुम्ही विसरलात; पण दुसरा ठेचकाळून जिवाला मुकतो त्याचं काय! असंच त्याचं म्हणणं. निरंजन पुलावर पोहोचला तेव्हा साडेनऊ वाजून गेले असावेत. आता नऊ पन्नासची गाडी येईल. धाड्धाड् आवाज करत दिमाखात पुलावरून जाईल. ही कोकण गाडी किती छान दिसते; पण दिसते न दिसते तोच लगेच बोगद्यात शिरते. काय मजा येत असेल नाही गाडीतून जायला? आपणही मोठं झाल्यावर गाडीतून फिरू, या विचाराने तो हुरळून गेला. तोच त्याचं लक्ष डाव्या बाजूस रुळाखाली पडलेल्या भल्या मोठ्या भगदाडाकडे गेलं. हे छिद्र कसलं? रोज नसतं बुवा, असं म्हणत त्यानं जवळ जाऊन पाहिलं तो कुणीतरी काँक्रीट फोडून रेल्वेचे रूळ वेडेवाकडे करून ठेवल्याचं त्याच्या ध्यानी आलं. निरंजनला आश्चर्यच वाटलं. 

२. आकलन कृती 

  १. चूक की बरोबर ते लिहा. (०१)

  1. मावशीचे घर गावाबाहेर होतं.
  2. निरंजन स्टेशनबाहेर पोहोचला तेव्हा दहा वाजले होते.

  २. चौकट पूर्ण करा. (०१)

निरंजन सावध होताच या गोष्टी विसरला -

१ ______ २ ______

३. स्वमत (०३)

आपण जे शिकलो ते आपण आचरणात आणले पाहिजे तरच खऱ्या अर्थाने शिक्षण म्हणता येईल, तुमचे मत स्पष्ट करा.

[0.01] गद्य
Chapter: [0.01] गद्य
Concept: गद्य (10th Standard)

उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. गुण (०७)

आकलन कृती

१.

 १. उताऱ्याच्या आधारे पाच हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा. (०१)

 २. कोष्टक पूर्ण करा. (०१)

रात्री दोन वाजता शेवटची गाडी इथून जाते. त्यानंतर पहाटेस कुणीतरी हा उपद्व्याप जाणीवपूर्वक केला असावा. आता प्रवाशांनी भरलेली नऊ पंन्नासची गाडी येईल. निरंजन एकदम सावध झाला. गाडी आली तर भयंकर अपघात होईल, हे त्याच्या लक्षात आलं. निरंजन नागरिकशास्त्राचा पेपर, देखमुखांकडचं जेवण सारं विसरला. त्याच्या डोळयांसमोर धाड्धाड् आवाज करत येणारी रेल्वेगाडी दिसू लागली. कानठळया बसवणारा आवाज आणि लोकांच्या किंकाळया कानांत घुमू लागल्या. स्टेशन इथून खूप दूर होतं. तीन-चार किलोमीटर तिथपर्यंत सांगायला जायचं तर परीक्षा बुडणार होती. मग नापास. भडसावळे गुरुजींची मदत बंद. शिक्षणही बंद. रेल्वेने फिरायचं स्वप्न अपुरंच राहणार होतं; परंतु मन मानायला तयार नव्हतं. त्याने क्षणभर विचार केला आणि स्टेशनच्या दिशेने धाव घेतली. तो स्टेशनात शिरला तेव्हा नऊ पन्नासची गाडी नुकतीच आली होती. आता पाच मिनिटांतच ती सुटणार होती.

निरंजनने धावतच स्टेशनमास्तरांना गाठलं. त्यांना पुलावरच्या खराब झालेल्या रुळांबद्दल सांगितलं; पण ते त्यांना खरंच वाटेना. अखेर निरंजनने आर्जवं केली, की निदान पाहून आल्याशिवाय तरी गाडी सोडू नका. मी खोटं बोलत असेन, तर मला पोलिसांच्या ताब्यात द्या. एवढं बोलल्यावर स्टेशनमास्तरांनाही त्याच्या बोलण्यात तथ्य वाटू लागलं. उगाच धोका नको म्हणून गाडी थांबवायला सांगून ते पुलाकडे निघाले. निरंजनने नेमकी जागा दाखवली.

 २. आकलन कृती  

१. घटनाक्रम लावा. (०२)

१. निरंजनने धावतच स्टेशन मास्तरांना गाठलं.

२. निरंजनने आर्जवं केली.

३. पुलावरच्या खराब झालेल्या रुळांबद्दल सांगितलं.

४. नऊ पन्नासची गाडी नुकतीच आली होती.

३. स्वमत (०३)

कधी कधी छोटी मुलेही समाजोपयोगी असे मोठे काम करतात. तुमचे विचार स्पष्ट करा.

[0.01] गद्य
Chapter: [0.01] गद्य
Concept: गद्य (10th Standard)

उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. गुण (०७)

आकलन कृती

१. आकृती पूर्ण करा. (०२)

अ)

ब)

फारच भयंकर! कल्पना करता येणार नाही, असा भयंकर अपघात झाला असता. स्टेशनमास्तरांनी लगेचच गाडी दीर्घकाळ थांबवण्याचा आदेश दिला आणि ते या घटनेचा पंचनामा करायला लागले. घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, सारे अधिकारी तत्काळ त्या ठिकाणी जमा झाले. पहिली खबर देणारा म्हणून निरंजनलाही थांबावं लागलं. एवढा मोठा अपघात त्याच्या चाणाक्षपणामुळे टळला म्हणून त्याचं कौतुकही झालं; परंतु त्या वेळी निरंजन मात्र दूर एका झाडाखाली बसला होता. तो निराश झाला होता. त्याचा नागरिकशास्त्राचा पेपर चुकला होता. तो नापास होणार होता. त्याला गुरुजींकडून मिळणाऱ्या सगळया सवलती रद्द होणार होत्या. निरंजनच्या जवळ येऊन वार्ताहरांनी त्याचं नाव विचारलं. फोटोही काढला. निरंजन उदास मनाने घरी परतला.

२. आकलन कृती 

 १. कृती पूर्ण करा. (०२)

i. घटनेचे गांभीर्य ओळखून तत्काळ त्या ठिकाणी जमा झालेले -

१. ______ २. ______ ३.______ ४. ______

ii. उदास मनाने घरी परतणारा - ______

३. स्वमत (०३)

कधी कधी दुसऱ्याचे भले होण्यासाठी आपल्याला काही नुकसान सहन करावे लागते. आपले मत व्यक्त करा.

[0.01] गद्य
Chapter: [0.01] गद्य
Concept: गद्य (10th Standard)

उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. गुण (०७)

आकलन कृती

१. आकृतिबंध पूर्ण करा. (०२)

दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रात निरंजनाची स्तुती फोटोसकट छापून आली होती. भीषण अपघात टाळल्याचं श्रेय त्यालाच देण्यात आलं होतं. त्या दिवशी मावशीच्या घराकडे मोठमोठी माणसं आली. खुद्द जिल्हाधिकारी आले. शाळेचे मुख्याध्यापक आणि भडसावळे गुरुजीही आले. निरंजनने धावत पुढे होऊन गुरुजींचे पाय धरले. रडत रडत तो म्हणाला, “गुरुजी, मी नापास होणार. माझा कालचा नागरिकशास्त्राचा पेपर बुडाला.”

“नाही रे बाळा. तू उत्तम नागरिक आहेस. शेकडो माणसांचा जीव वाचवलास आणि नागरिकशास्त्राच्या खऱ्याखुऱ्या परीक्षेत पास झालास. तुझं वर्ष कसं वाया जाईल? हे बघ, शाळेचे सगळे अधिकारी आलेत. खास बाब म्हणून तुझी नागरिकशास्त्राची परीक्षा उद्या घेतली जाणार आहे, जिल्हाधिकाऱ्यांनी तुला सरकारी वसतिगृहात प्रवेश द्यायचं ठरवलंय आणि वर वह्यापुस्तकांच्या खर्चासाठी शिष्यवृत्ती मिळणार आहे. आता नको हं तुला वार लावून जेवायला.”

असं म्हणून गुरुजींनी निरंजनला हृद्याशी धरलं, तेव्हा साऱ्यांचेच डोळे पाणावले.

२. आकलन कृती (०२)

  १. खऱ्या नागरिकाची कर्तव्ये

    १. ______

    २. ______

    ३. ______

    ४. ______

३. स्वमत (०३)

'निरंजनच खरा नागरिक' हे तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.

[0.01] गद्य
Chapter: [0.01] गद्य
Concept: गद्य (10th Standard)
< prev  1 to 20 of 270  next > 
Advertisement Remove all ads
Share
Notifications

View all notifications


      Forgot password?
View in app×