मागणीच्या ऱ्हासाशी संबंधित विधाने
(अ) हा मागणीच्या बदलातील एक प्रकार आहे.
(ब) इतर परिस्थिती जसे उपभोक्त्यांच्या आवडीनिवडी, उपभोक्त्याचे उत्पन्न इत्यादींमध्ये प्रतिकूल बदल होतो तेव्हा मागणीचा र्हास होतो.
(क) या प्रकारामुळे किंमत बदलत नाही.
(ड) मागणी वक्र हा मूळ मागणी वक्राच्या उजवीकडे स्थानांतरित होतो.
Concept: मागणीचे विश्लेषण
निर्देशांकाची वैशिष्ट्ये
(अ) आर्थिक धोरण ठरवण्यासाठी याचा वापर होतो.
(ब) आर्थिक माहिती वास्तव स्वरूपात सादर करण्यात मदत होते.
(क) निर्देशांक हे सांख्यिकीय साधन आहे.
(ड) निर्देशांक हे सरासरी काढण्याचे विशिष्ट साधन आहे.
Concept: निर्देशांक
मागणी वक्र : ______ :: पुरवठा वक्र : वर जाणारा.
Concept: मागणीचे विश्लेषण
______: मूळ वर्ष किंमत :: P१ : चालू वर्ष किंमत
Concept: निर्देशांक
______ : परकीय आक्रमणापासून संरक्षण :: ऐच्छिक कार्ये : सामाजिक सुरक्षा योजनांची तरतूद
Concept: सार्वजनिक वित्त व्यवहार
विशिष्ट काळात विशिष्ट किमतीला बाजारातील सर्व उपभोक्त्यांनी केलेली मागणी.
Concept: मागणीचे विश्लेषण
संख्यांची अशी शृंखला, की जिच्या आधारे काल व स्थान पदमालेतील बदलाचे मापन करता येते.
Concept: निर्देशांक
विसंगत शब्द ओळखा.
सरकारची ऐच्छिक कार्ये:
Concept: सार्वजनिक वित्त व्यवहार
निर्देशांक हा मूलत: या पातळीमधील बदल मोजण्यासाठी विकसित केला होता.
Concept: निर्देशांक
एका चलाच्या साहाय्याने मोजला जाणारा निर्देशांक ______.
Concept: निर्देशांक
राष्ट्राच्या भौगोलिक सीमांच्या अंतर्गत केली जाणारी वस्तू व सेवांची खरेदी-विक्री म्हणजे ______.
Concept: अंतर्गत व्यापार
विधान (अ): सर्व इच्छा म्हणजे मागणी नाही.
तर्क विधान (ब): अर्थशास्त्रीयदृष्ट्या मागणी म्हणजे अशी इच्छा जिला खरेदीशक्तीचे पाठबळ व ते खर्च करण्याची मानसिक तयारी असते.
Concept: मागणीचे विश्लेषण
विधान (अ): अपवादात्मक परिस्थितीत मागणी वक्र डावीकडून उजवीकडे खालून वर जाणारा असतो.
तर्क विधान (ब): अपवादात्मक परिस्थितीत वस्तूंची किंमत वाढते तेव्हा उपभोक्ता अधिक वस्तूंची खरेदी करतो आणि किंमत कमी झाल्यावर कमी वस्तूंची खरेदी करतो.
Concept: मागणीचे विश्लेषण
विधान (अ): निर्देशांक हे सांख्यिकीय साधन आहे.
तर्क विधान (ब): निर्देशांक हा मूलत: किंमत पातळीमधील बदल मोजण्यासाठी विकसित केला होता.
Concept: निर्देशांक
विधान (अ): राष्ट्रीय उत्पन्नात फक्त अंतिम वस्तू आणि उत्पादित सेवांचे मूल्य विचारात घेतले जाते.
तर्क विधान (ब): राष्ट्रीय उत्पन्न नेहमी पैशांत व्यक्त केले जाते.
Concept: राष्ट्रीय उत्पन्न
विधान व तर्क प्रश्न
विधान (अ): व्यापार ही आर्थिक वृद्धीची गुरुकिल्ली आहे.
तर्क विधान (ब): देशाच्या आर्थिक विकासात व्यापार महत्त्वाची भूमिका बजावतो. पर्याय : (१) विधान 'अ' सत्य आहे; पण तर्क विधान 'ब' असत्य आहे.
Concept: अंतर्गत व्यापार
फरक स्पष्ट करा.
वैयक्तिक मागणी पत्रक व बाजार मागणी पत्रक
Concept: मागणीचे विश्लेषण
फरक स्पष्ट करा.
मागणी वक्र व पुरवठा वक्र
Concept: मागणीचे विश्लेषण
फरक स्पष्ट करा.
सार्वजनिक वित्त व्यवहार व खाजगी वित्त व्यवहार
Concept: सार्वजनिक वित्त व्यवहार
फरक स्पष्ट करा.
मागणी ठेवी व मुदत ठेवी
Concept: वित्तीय बाजारपेठ