उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
एकदा मी पु. ल. देशपांडे यांच्याकडे काही एक निमित्ताने गेलो होतो. काम झाल्या वर मी निघण्याच्या बेतात होतो; तेवढ्यात सुनीताबाईंनी मला थांबवले व विचारले, ‘‘तुम्हांला शाल दिली तर चालेल काय?’’
मी एका पायावर ‘हो’ म्हटले. पु. ल. व सुनीताबाई यांनी मला शाल द्यावी, हा मला मोठा गौरव वाटला. ती शाल मी माझ्या खोलीतल्या सुटकेसमध्ये ठेवून दि ली. वापरली मात्र कधीच नाही.
पुढे वाईला विश्वकोशाचा अध्यक्ष म्हणून मी गेलो. तिथे नदीकाठच्या प्राज्ञ पाठशाळेच्या खोलीत मी राहत असे. खोलीच्या दक्षि णेकडील खिडक्या कृष्णा नदीच्या चिंचोळ्या प्रवाहावर होत्या . थंडीच्या दिवसात एक बाई माझ्या खिडकीखालील घाटाच्या छोट्या तटावर तिचे छोटे मूल एका टोपलीत ठेवून मासे पकडण्याच्या उद्योगात होती. तिचे बाळ कडाक्या च्या थंडीने कुडकुडत रडत होते; पण आई तिकडे बघतही नव्हती. मला मात्र राहवले नाही. मी सुटकेसमधील ‘पुलकित’शाल काढली, पाचपन्नास रुपयांच्या नोटा काढल्या व त्या बाईला हाक मारली. खिडकीतून ते सर्व खाली दिले आणि म्हटले, ‘‘त्या बाळाला आधी शालीत गुंडाळ आणि मग मासे मारत बैस.’’ याघटनेची ऊब पुलकित शालीच्या उबेपेक्षा अधिक होती.
कविवर्य नारायण सुर्वे खूप सभा, संमेलने गाजवत. पुढे ते साहित्य संमेलनाचे अध्यक्षही झाले. परिणामत: त्यांच्या कार्य क्रमांना अहोरात्र भरतीच असे. प्रत्येक कार्य क्रमात सन्मा नाची शाल व श्रीफळ त्यांना मिळत राही. एकदा ते मला म्हणाले, ‘‘या शाली घेऊन घेऊन मी आता ‘शालीन’ बनू लागलो आहे.’’
(१) कोण ते लिहा. ०२
(i) सभा, संमेलने गाजवणारे कवी-
(ii) विश्वकोशाचे अध्यक्ष नात्याने वाईला जाणारे -
(iii) लेखकाचा शाल देऊन गौरव करणारे-
(iv) मासे पकडण्याचा उद्योग करणारी-
(२) का ते लिहा. ०२
(i) बाळ रडत होते कारण....
(ii) लेखकाने सुटकेसमधील ‘पुलकित’ शाल काढली कारण....
(३) खालील शब्दासाठी उताऱ्यात आलेले विरुद्ध अर्थाचे शब्द शोधून लिहा. ०२
(i) वर X ...............
(ii) उद्धट X...........
(iii) ओहोटी X..............
(iv) कमी X.............
(४) स्वमत- ‘‘शाल व शालीनता पाठाच्या आधारे तुम्हाला कळलेला अर्थ स्पष्ट करा. ०२
Concept: गद्य (10th Standard)
अपठित गद्य
प्र.१. (इ) उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
(१) कोण ते लिहा.
(i) रामेश्वरम बेटावरील इंग्रजी जाणणारा एकमेव माणूस -
(ii) कलाम याना वाचनासाठी उत्तेजन देणारे -
(iii) रामनाथपुरमला जाण्यासाठी वडिलांकडे परवानगी मागणारे -
(iv) रामेश्वरम येथील वर्तमानपत्रlचे वितरक -
जलालुद्दीन फारसा शिकला नाही पण त्याने अब्दुल कलामना मात्र शिकण्यासाठी सदैव प्रोत्साहन दिले. रामेश्वरम बेटावर इंग्रजी जाणणारा तो एकटाच माणूस होता. त्यानेच अब्दुल कलामना नवनव्या वैद्यानिक शोधांबद्दल, साहित्याबद्दल, आधुनिक उपचारपद्धतीबद्दल ओळख करून दिली. त्यांच्या गावात एस. टी. आर माणिकन् नावाचे एक माजी क्राांतिकारक राष्ट्रभक्त राहत होते. त्यांच्याकडे पुस्तकांचा संग्रह होता. त्यांनी कलाम याना पुस्तक वाचण्यासाठी सदैव उत्तेजन दिले. शमसुद्दीन नावाच्या दूरच्या भावाचा कलामवर प्रभाव होता. तो रामेश्वरममध्ये वर्तमानपत्राचा वितरक होता. रेल्वेने पंबन गावाहून वर्तमानपत्राचे गठ्ठे येत. पुढे शमसुद्दीन त्याचे वाटप करी. दिनमणी हे सर्वात लोकप्रिय तमीळ वृत्तपत्र होते. १९३९ मध्ये दुसरे महायुद्ध पेटल्यावर पंबनहून येणारी गाडी रामेश्वरमला थांबेनाशी झाली. चालत्या गाडीतून ते गठ्ठे फेकले जात. ते गोळा करण्याच्या कामात शमसुद्दीनला कलाम मदत करू लागला. अब्दुल कलामच्या आयुष्यातील ती पहिली कष्टाची कमाई! दुसरे महायुद्ध संपल्यावर रामेश्वरम सोडून जिल्ह्याच्या ठिकाणी, रामनाथपुरमला शिक्षण घेण्यासाठी कलामांनी वडिलांकडे परवानगी मागितली. वडील म्हणाले, ‘‘अब्दुल, तुला मोठे व्हायचे असेल तर गाव सोडून शिकण्यासाठी बाहेर जायला हवे.’’ शमसुद्दीन आणि जलालुद्दीन कलामबरोबर रामनाथपुरमला गेले. कलामने कलेक्टर व्हावे अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. जलालुद्दीन म्हणाला, ‘‘मनामध्ये नेहमी आशावादी, भविष्याबद्दल चांगलेच विचार आणत जा. त्यामुळे आपल्या विचारांच्या शक्तीचा भविष्यावर चांगला परिणाम होईल.’’
(२) परिणाम लिहा.
(i) दुसरे महायुद्ध पेटले.
(ii) कलाम वृत्त पत्रे गोळा करण्या च्या कामात मदत करू लागले.
(३) विशेषण-विशेष्य यांच्या जोड्या जुळवा.
(४) स्वमत - पाठाच्या आधारे आशावादी विचारांचे महत्त्व तुमच्या शब्दांत लिहा.
Concept: गद्य (10th Standard)
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
“दोन महिन्यांत पन्नास पाैंड वजन कमी करून दाखवीन तर खरा!’’ अशी भीष्मप्रतिज्ञा करून मी आहारशास्त्रावरच्या पुस्तकात डोके घालू लागलो. प्रोटीनयुक्त पदार्थ, चरबीयुक्त द्रव्ये वगैरे शब्दांबद्दलची माझी आस्था वाढू लागली. साऱ्या ताटांतले पदार्थ मला न दिसता नुसत्या 'कॅलरीज' मला दिसू लागल्या आणि आनंदाची गोष्ट अशी, की वजन उतरवण्याच्या शास्त्रात पारंगत झालेले तज्ज्ञ मला रोज डझनवारीने भेटू लागले. इतकेच काय, परंतु ज्या आमच्या चाळीतल्या लोकांनी माझ्या उपासाची अवहेलना केली होती, त्यांनीच मला 'डाएटचा' सल्ला दिला. उदाहरणार्थ - सोकाजी त्रिलोकेकर. “तुला सांगतो मी पंत, 'डाएट' कर. बटाटा सोड. बटाट्याचं नाव काढू नकोस.“ “हो! म्हणजे 'कुठं राहता?' म्हणून विचारलं तर नुसतं 'चाडीत राहतो' म्हणा. 'बटाट्याची चाड' म्हणू नका. वजन वाढेल! खी: खी: खी:!“ जनोबा रेगे या इसमाला काय म्हणावे हे मला कळत नाही. नेहमी तिरके बोलायचे म्हणजे काय? पण सोकाजींनी त्याला परस्पर जामून टाकले. ’ए इडिअट! सगडयाच गोष्टींत जोक काय मारतोस नेमी? मी सांगतो तुला पंत – तू बटाटा सोड.“ |
1. कोण ते लिहा. (2)
- नेहमी तिरके बोलणारे - ______
- बटाटा सोडण्याचा सल्ला देण़ारे - ______
2. कृती पूर्ण करा. (2)
3. पंतांना उपासाबाबत मिडालेल्या विविध सल्ल्यांचे वर्णन तुमच्या शब्दांत लिहा. (3)
Concept: गद्य (10th Standard)
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
आमचे मूळ गाव दक्षिण गोव्यातील माशेल. माझे बालपण तिथेच गेले. माझे मामाही याच गावातले. तिथल्या एका मैदानावर खेळल्याच्या आणि पिंपळकट्ट्यावर बसून निवांतपणा अनुभवल्याच्या पुसटशा आठवणी माझ्या मनात अधूनमधून वाऱ्याच्या लहरीसारख्या येत असतात. माझ्या वयाच्या सहाव्या वर्षी माझे वडील वारले आणि आम्हांला उदरनिर्वाहासाठी आमचे माशेल हे गाव सोडावे लागले. मी आणि माझी आई मुंबईत येऊन पोहोचलो. गिरगावातल्या खेतवाडीतील देशमुख गल्लीमध्ये 'मालती निवासातील' पहिल्या माळयावर छोट्याशा खोल्यांमध्ये आम्ही मायलेक राहत होतो. आर्थिक परिस्थिती पूर्णपणे खालावलेली. दारिद्र्याशी संघर्ष करणारी माझी अल्पशिक्षित आई आणि शिक्षणासाठी आसुसलेला; पण कोणतीच फी भरणे शक्य नसल्याने 'शाळेत कसा जाऊ?' असे प्रश्नचिन्ह घेऊन वावरणारा मी. त्यावेळचं वातावरण हे असं होतं! पण माझ्या आईनं धीर सोळला नाही. ती खचली नाही. वेगवेगळी कष्टाची कामं ती करत होती. त्यातच माशेलहून मुंबईत आलेले माझे मामाही मदतीला आले. त्यांच्यामुळे मला खेतवाडीतील प्राथमिक शाळेत प्रवेश मिळू शकला. ही शाळा महापालिकेची होती. माझ्याप्रमाणेच शाळेचीही परिस्थिती बेताचीच होती; पण इथले शिक्षक मात्र मनानं खूप श्रीमंत होते. पायात चप्पलही घालायला नव्हती अशा परिस्थितीत माझी शाळा सुरू होती. |
1. का ते लिहा. (2)
- डॉ. माशेलकर यांना माशेल हे गाव सोडावे लागले, कारण ______
- 'शाडेत कसा जाऊ? ' असा प्रश्न डॉ. माशेलकर यांच्यापुढे उभा राहिला, कारण ______
2. आकृती पूर्ण करा. (2)
3. स्वमत: (3)
शालेय विद्यार्थ्याच्या भूमिकेतील डॉ. माशेलकर यांचे तुम्हांला जाणवलेले गुणविशेष सोदाहरण लिहा.
Concept: गद्य (10th Standard)
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
संयमाला तुच्छ मानू नका. तुमच्या विकासासाठी तो आहे. समाजाच्या हितासाठी तो आहे. आपण संयम पाळला नाही, तर आपले काम नीट होणार नाही. काम नीट झाले नाही म्हणजे समाजाचे नुकसान होणार. आपण केवळ आपल्या स्वत:साठी नाही. आपण समाजासाठी आहोत, याची जाणीव आपणांस हवी. हा आपला देह, हे आपले जीवन समाजाचे आहे. आपले पोषण सारी सृष्टी करीत आहे. सूर्य प्रकाश देत आहे, मेघ पाणी देत आहेत, वृक्ष फुले-फळे देत आहेत, शेतकरी धान्य देत आहे, विणकर वस्त्र देत आहे. आपण या सर्व सजीव-निर्जीव सृष्टीचे आभारी आहोत. यासाठी हे आपले जीवन त्यांच्या सेवेत अर्पण करणे हे आपले काम आहे. |
1. योग्य जोड्या लावा. (2)
'अ' गट | 'ब' गट | |
i. | सूर्य | पाणी |
ii. | मेघ | वस्त्र |
iii. | शेतकरी | प्रकाश |
iv. | विणकर | धान्य |
2. एका शब्दात उत्तरे लिहा. (2)
- आपल्या विकासासाठी आवश्यक असलेला - ______
- आपले पोषण करणारी -
Concept: गद्य (10th Standard)
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा
माझ्या बालमित्रांनो , मी तुमच्या एवढा होतो तेव्हा अगदी तुमच्या सारखाच खेळकर, खोडकर व उपद्व्यापी होतो. माझा जन्म पुण्यातच एका गरीब कुटुंबात झाला. माझे वडील त्या वेळेस पोलीसखात्या मध्ये तुटपुंज्या पगारावर नोकरी करत होते. तेव्हा साहजिकच गरीब कुटुंबाच्या वाट्याला येणारे सारे कष्ट व दु:खे आम्ही भोगत होतो. अशा परिस्थितीत वडिलांना आम्हां मुलांसाठी खेळणी विकत घेणे शक्यच नव्हते. दुसऱ्या मुलांच्या हातात खेळणी पाहून आम्हांला त्यांचा हेवा वाटत असे. तरी पण गल्ली तील मुलांना जमा करून उन्हातान्हात विटीदांडू खेळणे, पतंग उडवणे, कधीमधी कॅम्प मधील कॅनॉलमध्ये चोरून पोहणे; कैऱ्या , पेरू पाडून त्यांचा यथेच्छ स्वाद घेणे, घरात जळणासाठी आणलेल्या लाकडांतूनच बॅट व स्टं प तयार करणे व कुठून तरी जुन्या पुराणा बॉल पैदा करून क्रिकेट खेळणे असा माझा दिवसभराचा कार्यक्रम असायचा. संध्याकाळी घरी येईपरीयंत माझ्या बद्दल बऱ्याच तक्रारी आईच्या कानांवर आलेल्या असायच्या . दिवसभराच्या खेळाने भूक तर खूपच लागलेली असायची. घरात पाऊल ठेवतो न ठेवतो तोच पाठीवर धम्म कलाडू व चापटपोळ्यांचा यथेच्छ वर्षाव व्हायचा. मग मी घरात एका कोपऱ्यात जाऊन रडत बसायचा ! तिथेच झोप लागायची आणि जागं यायची ती आईच्या प्रेमळ कुशीत.
(१) कारणे लिहा. ०२
(i) लेखकाच्या वडिलांना त्यांच्या मुलांसाठी खेळणी विकत घेणे शक्य नव्ह ते कारण ...........................
(ii) लहानपणी लेखकाच्या पाठीवर घरातल्यांकडून धम्म कलाडू व चापटपोळ्यांचा यथेच्छ वर्षाव व्हायचा कारण ..................................
(२) आकृती पूर्ण करा. ०२
(३) खालील शब्दांसाठी उताऱ्यात आलेले समान अर्थाचे शब्द शोधून लिहा. ०२
(i) दीन
(ii) निद्रा
(iii) श्रम
(iv) हस्त
(४) स्व मत- लेखकाच्या बालपणीच्या आठवणींवरून त्यांच्या तील तुम्हाला जाणवलेल्या गुणवैशिष्ट्यांविषयी मत लिहा. ०२
Concept: पद्य (10th Standard)
कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
झाड बसते ध्यानस्थ ऋषिसारखं मौन व्रत धारण करून तपश्चर्या करत... पक्षी झाडांचे कुणीच नसतात तरीही झाड त्यांचं असतं मुळावर घाव घातला तरी झाड मुकाट सहन करते झाडांच्या पानावरून वहीच्या पानावर अलगद उतरतात दवांचे टपोरे थेंब झाडाकडे टक लावून पाहिलं तर शरीरभर विरघळतो हिरवा रंग रक्त होते क्षणभर हिरवेगार आयुष्य होतं नुकत्याच खुडलेल्या फुलासारखं टवटवीत झाडाचे बाहु सरसावलेले असतात मुसाफिराना कवेत घेण्यासाठी पानझडीनंतर झाड पुन्हा नवीन वस्त्र धारण करतं नव्या नवरीसारखं झाडाला पालवी फुटल्यावर फुटते शरीरभर पालवी अन झटकली जाते मरगळ पक्ष्यांच्या मंजुळ नादात झाडाचंही जीवनाचं एक संथ गाणे दडलेले असते हसावं कसं सळसळत्या पानासारखं मुळावं मुरावं कसं तर? झाडासारखं घट्ट पाय रोवीत जगावं कसं तर? हिरवंगार झाडासारखं रोजचं चिंतन करावं कसं तर झाडासारखं! |
1. चौकटी पूर्ण करा. (2)
- मुळावर घाव घातले; तरी मुकाट सहन करणारे - ______
- अलगद उतरणारे थेंब - ______
2. आकृती पूर्ण करा. (2)
3. प्रस्तुत कवितेतील खालील शब्दांचा अर्थ लिहा. (2)
- मुकाट -
- मुसाफिर -
- संथ -
- मौन व्रत -
4. काव्यसाैंदर्य: (2)
'जगावं कसं तर? हिरव्या झाडासारखं' या ओळीतील अर्थसाैंदर्य स्पष्ट करा.
Concept: पद्य (10th Standard)
खालील कवितेसंबंधी दिलेल्या मुद्दयांच्या आधारे कृती सोडवा.
मुद्दे | 'अंकिला मी दास तुझा' |
1. प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री | |
2. प्रस्तुत कवितेचा विषय | |
3. प्रस्तुत ओळीचा सरळ अर्थ लिहा. | 'अग्निमाजि पडे बाळू । माता धांवें कनवाळू।।' |
4. प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण | |
5. प्रस्तुत शब्दांचा अर्थ लिहा. | i. काज - ii. सवें - iii. पाडस - iv. धेनू - |
Concept: पद्य (10th Standard)
खालील कवितेसंबंधी दिलेल्या मुद्दयांच्या आधारे कृती सोडवा.
मुद्दे | 'स्वप्न करू साकार' |
1. प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री | |
2. प्रस्तुत कवितेचा विषय | |
3. प्रस्तुत ओळीचा सरळ अर्थ लिहा. | 'हजार आम्ही एकी बळकट सर्वांचे हो एकच मनगट।।' |
4. प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण | |
5. प्रस्तुत शब्दांचा अर्थ लिहा. | i. विभव - ii. मंगल - iii. श्रम - iv. हस्त - |
Concept: पद्य (10th Standard)
टीप लिहा: व्युत्पत्ती कोशाचे कार्य.
Concept: स्थूल वाचन (10th Standard)
'स्काय इज द लिमिट' ही परिस्थिती केव्हा निर्माण होऊ शकते हे 'मोठे होत असलेल्या मुलांनो' या पाठाच्या आधारे लिहा.
Concept: स्थूल वाचन (10th Standard)
'थोड्याशा पाण्यावर कसे वाढावे याचा नमुना म्हणजे कॅक्टस!' या विधानाची यथार्थता स्पष्ट करा.
Concept: स्थूल वाचन (10th Standard)
खालील वाक्यांचा प्रकार ओळखा.
तुझ्या शाळेत मराठी दिन साजरा करतात का?
Concept: व्याकरण (10th Standard)
खालील वाक्यांचा प्रकार ओळखा.
रनिंगपेक्षादेखील दोरीवरच्या उड्या मारा.
Concept: व्याकरण (10th Standard)
कंसातील सूचनेनुसार वाक्यरूपांतर करा.
नेहमी खरे बोलावे. (नकारार्थी करा.)
Concept: व्याकरण (10th Standard)
कंसातील सूचनेनुसार वाक्यरूपांतर करा.
तुमची ऊर्जाशक्ती एकत्र करा. (विधानार्थी करा.)
Concept: व्याकरण (10th Standard)
खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
उत्साहाला उधाण येणे
Concept: व्याकरण (10th Standard)
खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
गलका करणे
Concept: व्याकरण (10th Standard)
खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
झोकून देणे
Concept: व्याकरण (10th Standard)
खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा.
पाऊस =
Concept: व्याकरण (10th Standard)