युरोपातील धर्मयुद्धाच्या अपयशाची कारणे आणि परिणाम स्पष्ट करा. - History [इतिहास]

Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads
Answer in Brief

युरोपातील धर्मयुद्धाच्या अपयशाची कारणे आणि परिणाम स्पष्ट करा.

Advertisement Remove all ads

Solution

११ व्या - १२ व्या शतकांत युरोपात ख्रिश्चन आणि मुस्लीम धर्मीयांमध्ये झालेल्या युद्धांना 'धर्मयुद्धे' असे म्हणतात. या युद्धांत ख्रिस्ती धर्म योद्ध्यांना अपयश आले.

(अपयशाची कारणे :

(१) युरोपातील सत्ताधीश आणि पोप यांनी या युद्धांकडे आपला प्रभाव वाढेल, अशा संकुचित हेतूंनी पाहिले.

(२) धर्मावरील श्रद्धा उतरणीस लागली होती.

(३) युरोपातील विविध राजांमध्ये एकीचा अभाव होता.

(४) पोप आणि जर्मन सम्राट यांच्यात अधिकारांसाठी वितुष्ट होते.

(५) बायॉन्टाईन सम्राटांचा या संघर्षात सहकार्याचा अभाव होता.

(धर्मयुद्धांचे परिणाम :

(१) धर्मयुद्धांमुळे युरोपातील सरंजामशाहीचा अंत झाला.

(२) पोपवरील लोकांची श्रद्धा कमी झाली.

(३) मध्य आशियाबरोबर वाढलेल्या व्यापारामुळे इटलीतील आणि जर्मनीतील शहरांना नवी क्षेत्रे खुली झाली, त्यामुळे नवा व्यापारी वर्ग उदयाला आला.

(४) किल्ले बांधणी, किल्ल्यांचा लढाईचे ठाणे म्हणून उपयोग, लष्कराच्या वाहतुकीसाठी पूलबांधणी, शत्रूचे मार्ग उद्ध्वस्त करणे इत्यादी युद्धतंत्रात युरोपीय राष्ट्रांनी प्रावीण्य मिळवले.

(५) लढाईचा खर्च भागवण्यासाठी युरोपातील राजांनी नवे कर लागू केले.

(६) युरोपीय लोकांना अपरिचित असलेल्या वनस्पती, अत्तरे, फळे, पोषाखाचे विविध प्रकार, साखर, सुती व रेशमी कापड, मसाल्याचे पदार्थ, औषधे इत्यादी गोष्टींचा परिचय झाला.

(७) अरबांशी झालेल्या संपर्कातून रसायन, संगीत, व्यापार या क्षेत्रांतील अनेक अरबी शब्द युरोपियनांना माहीत झाले.

Concept: युरोपातील धर्मयुद्धे (क्रुसेडस) आणि त्याचे दूरगामी परिणाम
  Is there an error in this question or solution?

APPEARS IN

Balbharati History 12th Standard HSC Maharashtra State Board [इतिहास इयत्ता १२ वी]
Chapter 1 युरोपातील प्रबोरन आणि विज्ञानाचा विकास
स्वाध्याय | Q ७.१ | Page 9
Share
Notifications

View all notifications


      Forgot password?
View in app×