Advertisement Remove all ads

या देशाच्या मातीवरती अमुचा रे अधिकार नव्या पिढीचे, नव्या युगाचे स्वप्न करू साकार।। फुलामुलांतून हसतो श्रावण मातीचे हो मंगल तनमन चैतन्याचे फिरे सुदर्शन शेतामधुनी पिकवू मोती - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads
Long Answer

पद्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. गुण (०८)

आकलन कृती

 १. जोड्या जुळवा. (०२)

क्र. 'अ' 'ब'
१. सुदर्शन चक्र शुभंकर
२. मंत्र शक्ती
३. नौबत चैतन्य
४. हस्त श्रमशक्ती

 

या देशाच्या मातीवरती अमुचा रे अधिकार

नव्या पिढीचे, नव्या युगाचे स्वप्न करू साकार।।

फुलामुलांतून हसतो श्रावण

मातीचे हो मंगल तनमन

चैतन्याचे फिरे सुदर्शन

शेतामधुनी पिकवू मोती, धन हे अपरंपार।।

या हातांनी यंत्र डोलते

श्रमशक्तीचे मंत्र बोलते

उद्योगाचे चक्र चालते

आभाळावर उत्क्रांतीचा घुमवू या ललकार।।

हजार आम्ही एकी बळकट

सर्वांचे हो एकच मनगट

शक्तीचीही झडते नौबत

घराघरांतून जन्म घेतसे तेज नवा अवतार।।

या विश्वाची विभव संपदा

जपू वाढवू आम्ही लाखदा

हस्त शुभंकर हवा एकदा

भविष्य उज्ज्वल या देशाचे करूया जयजयकार।।

२. एका वाक्यात उत्तरे लिहा. (०२)

१. कोणाचे स्वप्न साकार करायचे आहे?

२. शेतातील धान्याला कशाची उपमा दिली आहे?

३. कवितेत आलेल्या खालील शब्दांचा अर्थ लिहा. (०२)

१. मंगल -

२. तन -

३. ललकार -

४. विभव -

४. खालील पंक्तींमधून सूचित होणारा अर्थ लिहा. (०२)

या विश्वाची विभव संपदा

जपू वाढवू आम्ही लाखदा

भविष्य उज्ज्वल या देशाचे करूया जयजयकार।।

Advertisement Remove all ads

Solution

१.

क्र. 'अ' 'ब'
१. सुदर्शन चक्र चैतन्य
२. मंत्र श्रमशक्ती
३. नौबत शक्ती
४. हस्त शुभंकर

२.

१. नव्या पिढीचे स्वप्न साकार करायचे आहे.

२. शेतातील धान्याला मोत्यांची उपमा दिली आहे.

३.

१. पवित्र, शुभ

२. शरीर, काया

३. पुकारा

४. ऐश्वर्य, संपत्ती

४. 'स्वप्न करू साकार' या कवितेत कवी किशोर पाठक यांनी देशाच्या उज्ज्वल भविष्याचे स्वप्न चित्रित केले आहे. प्रस्तुत कवितेद्वारे कृषिसंस्कृती, श्रमप्रतिष्ठा, एकतेचे सामर्थ्य या मूल्यांचे महत्त्व अधोरेखित केले आहे.
या जगात सर्वत्र ऐश्वर्य, वैभव नांदत आहे. त्या ऐश्वर्याचे, संपदेचे आम्ही रक्षण करू, संवर्धन करू, लाखपटीने हे वैभव आम्ही वाढवू, असा आशय वरील काव्यपंक्तींतून व्यक्त होतो. आपल्या कर्तृत्वाने जगाचे वैभव वाढवण्याची स्फूर्ती या पंक्तींमधून कवी देत आहे. या पंक्ती प्रेरणादायी, सकारात्मक व आत्मविश्वासपूर्ण अशा आहेत.

Concept: पद्य (10th Standard)
  Is there an error in this question or solution?
Advertisement Remove all ads

APPEARS IN

SCERT Maharashtra Question Bank 10th Standard SSC Marathi Second Language Maharashtra State Board 2021
Chapter 16.1 स्वप्न करू साकार
स्वाध्याय | Q २. अ.
Advertisement Remove all ads
Share
Notifications

View all notifications


      Forgot password?
View in app×