Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads
Answer in Brief
व्युत्पत्ती कोश या विषयावर टीप लिहा.
Advertisement Remove all ads
Solution
व्युत्पत्ती सांगणे म्हणजे एखाद्या शब्दाच्या मुळाविषयी माहिती देणे हे व्युत्पत्ती कोशाचे कार्य होय. व्युत्पत्ती कोशाचे कार्य हे प्रामुख्याने चार प्रकारचे असते, ते पुढीलप्रमाणे:
- शब्दाचे मूळ रूप दाखवणे: भाषेतील बदलत गेलेल्या शब्दांचे मूळ आपल्याला व्युत्पत्ती कोशाच्या माध्यमातून शोधता येते.
उदाहरणार्थ: मराठी भाषेतील 'आग' हा शब्द संस्कृतमधील 'अग्नि' या शब्दापासून आला आहे. - अर्थांतील बदल स्पष्ट करणे: काळानुसार, शब्दांच्या स्वरूपात, अर्थात व त्यांच्या परस्परसंबंधात बदल होतात. काहीवेळा मूळ अर्थासोबतच अधिकचा एखादा अर्थ त्या भाषेत रूढ होतो.
उदाहरणार्थ: व्युत्पत्ती कोशानुसार शहाणा म्हणजे हुशार, बुद्धिमान; पण सध्या 'शहाणा' म्हणजे 'अतिशहाणा' हा अर्थदेखील रूढ होत आहे. समान दिसणाऱ्या शब्दांचे वेगवेगळे अर्थदेखील व्युत्पत्ती कोशातून उलगडतात.
उदाहरणार्थ: पाठ. शरीराचा अवयव किंवा पुस्तकातील धडा. - उच्चारातील बदल व फरक दाखवणे: एखाद्या शब्दाचे मूळ रूप, त्याचा इतिहास, अन्य भाषांत तो शब्द कसा आला आहे हेही व्युत्पत्ती कोशात दाखवलेले असते.
उदाहरणार्थ: दीपावली हा मूळ संस्कृत शब्द; मराठीत त्याचा दिवाळी हा शब्द बनला आहे. - बदलांचे कारण स्पष्ट करणे: भाषेत बदल होण्यामागे बहुतेकदा सुलभीकरणाची म्हणजेच सोपे करण्याची प्रवृत्ती असते किंवा कोणत्याही दोन भाषा बोलणारे भाषिक एकमेकांच्या संपर्कात आल्यामुळे त्यांच्या भाषांतील शब्दांची देवाणघेवाण होते. या सर्व बदलांमागच्या कारणांची नोंद व्युत्पत्ती कोशाचे कार्य आहे.
Concept: स्थूल वाचन (10th Standard)
Is there an error in this question or solution?
Advertisement Remove all ads
APPEARS IN
Advertisement Remove all ads