Advertisement Remove all ads

वडिलांच्या वयामध्ये मुलाच्या वयाची दुप्पट मिळवल्यास बेरीज 70 येते आणि मुलाच्या वयामध्ये वडिलांच्या वयाची दुप्पट मिळवल्यास बेरीज 95 येते, तर दोघांची वये काढा. - Mathematics 1 - Algebra [गणित १ - बीजगणित]

Sum

वडिलांच्या वयामध्ये मुलाच्या वयाची दुप्पट मिळवल्यास बेरीज 70 येते आणि मुलाच्या वयामध्ये वडिलांच्या वयाची दुप्पट मिळवल्यास बेरीज 95 येते, तर दोघांची वये काढा.

Advertisement Remove all ads

Solution

समजा, वडिलांचे वय x वर्षे व मुलाचे वय y वर्षे आहे.

दिलेल्या पहिल्या अटीनुसार, वडिलांच्या वयामध्ये मुलाच्या वयाची दुप्पट मिळवल्यास बेरीज 70 येते.

∴ x + 2y = 70   ....(i)

दिलेल्या दुसऱ्या अटीनुसार, मुलाच्या वयामध्ये वडिलांच्या वयाची दुप्पट मिळवल्यास बेरीज 95 होते.

∴ 2x + y = 95   ....(ii)

समीकरण (i) ला 2 ने गुणून,

2x + 4y = 140   ...(iii)

समीकरण (iii) मधून समीकरण (ii) वजा करून,

2x + 4y = 140
2x + y = 95
-     -      -  
3y = 45

∴ y = `45/3 = 15`

y = 15 ही किंमत समीकरण (i) मध्ये ठेवून,

x + 2y = 70

x + 2(15) = 70

∴ x + 30 = 70

∴ x = 70 - 30

∴ x = 40

∴ वडिलांचे आजचे वय 40 वर्षे व मुलाचे आजचे वय 15 वर्षे आहे.

Concept: एकसामयिक समीकरणांचे उपयोजन (Application of simultaneous equations)
  Is there an error in this question or solution?
Advertisement Remove all ads

APPEARS IN

Balbharati Mathematics 1 Algebra 10th Standard SSC Maharashtra State Board [गणित १ इयत्ता १० वी]
Chapter 1 दोन चलांतील रेषीय समीकरणे
सरावसंच 1.5 | Q 3. | Page 26
Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads
Share
Notifications

View all notifications


      Forgot password?
View in app×