उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. गुण (०७)
आकलन कृती
१. कृती पूर्ण करा. (०२)
वाघिणीच्या पिल्लांचे संभाव्य शत्रू –
१. ______
२. ______
’ऑऽव्हऽऽ“ अचानक नाल्याच्या पलीकडून आलेल्या या बारीक आवाजानं मी जागीच थबकलो. माझ्या अंगावर सरसरून काटा आला. एक वर्षाच्या वाघांच्या अभ्यासानं आणि अनुभवानं हे ठाऊक होतं, की हा वाघिणीचा आवाज आहे. ती या आवाजानं आपल्या पिल्लांना बोलवत असावी. अचानक पाण्यात 'धपकन' काहीतरी पडल्याचा आवाज आला. मी पाणवठ्याकडं पाहिलं आणि आश्चर्यानं थक्कच झालो. एका पिल्लानं बाजूच्या जांभळीच्या झाडीतून थेट पाण्यात उडी घेतली होती. लगेच त्याच्या पाठोपाठ उरलेली तीनही पिल्लं धपाधप पाण्यात उतरली. आईचा आश्वासक आवाज त्यांच्याकरता उत्साहाचं वारं भरणारा ठरला होता. वाघीण रात्रीच पिल्लांना नाल्याकाठच्या जांभळीच्या दाट झुडपात लपवून शिकारीसाठी गेली होती. या परिसरात दुसरे नर वाघ, बिबळा रानकुत्री अशा पिल्लांना इतर भक्षकांपासून खूपच धोका असतो. त्यामुळे वाघीण पिल्लांच्या सुरक्षेबद्दल भलतीच दक्ष असते. आता ती रात्रभर जंगलात फिरून पिल्लांजवळ परत आली होती. आईची हाक ऐकताच अजून वर दडून बसलेली पिल्लं खेळकरपणे तिच्याकडं झेपावली होती. तेवढ्यात नाल्याच्या डावीकडच्या विरळ बांबूंमधून मला वाघीण येताना दिसली. ती सरळ पाण्याजवळ आली आणि वळून पाण्यात बसली. रात्रभरच्या वाटचालीनं थकून ती विश्रांती घेत होती; पण पिल्लांच्या उत्साहाला आई बघताच उधाण आलं होतं. त्यांतील एका पिल्लानं तर वाघिणीच्या पाठीवरच उडी घेतली; पण तिथून घसरल्यानं ते धपकन पाण्यात पडलं. तोंडावर पाणी उडताच वाघिणीनं मंदपणे गुरगुरून नापसंती व्यक्त केली; पण पिल्लांना त्याच्याशी काहीच देणं-घेणं नव्हतं. त्यांचा आईच्याभोवती जबरदस्त दंगाधोपा सुरू झाला. |
२.
१. चौकटी पूर्ण करा. (०२)
- वाघिणीचा आवाज – ______
- वाघिणीने शिकारीला जायच्या आधी पिल्ले इथे लपवली – ______
३. वाघीण व तिच्या पिल्लांची भेट हा प्रसंग तुमच्या शब्दांत शब्दबद्ध करा. (०३)
Solution
१.
१. नर वाघ
२. बिबळा
२.
१.
- ऑऽव्हऽऽ
- नाल्याकाठच्या जांभळीच्या दाट झुडपात
३. मुलांपासून दूर गेलेली आई परत आल्यानंतर आई व मुले दोघांनाही खूप आनंद होतो. या पाठातील वाघीण आपल्या पिल्लांना सुरक्षित जागी सोडून रात्री शिकारीला गेलेली होती. सकाळी पिल्लांजवळ परत येताच तिने त्यांना हाक मारली. आईची हाक कानावर पडल्यामुळे पिल्लांना खूप आनंद झाला. लपून बसलेली ती पिल्ले खेळकरपणे पटापट आईकडे झेपावली, तिच्या अंगावरही उड्या मारू लागली. एक पिल्लू तिच्या पाठीवर उडी मारताना घसरून धपकन पाण्यात पडलं; पण आपण पडलोय याचंही त्याला भान नव्हतं. आपली आई खूप थकून आलीय आणि तिला विश्रांतीची गरज आहे याचंही त्यांना भान नव्हतं. थकल्या – भागलेल्या वाघिणीला खरंतर या गोंधळाचा त्रास होत होता; पण ती त्यांच्यावर फारशी रागावली नाही. कदाचित तिलाही त्यांच्या आनंदामुळे जणू सुखच मिळत असावं. आई व मुलांच्या भेटीचा हा प्रसंग मनाला भिडणारा आह