उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. १) पाठाच्या आधारे वाक्यांचा उर्वरित भाग लिहून वाक्ये पूर्ण करा. अ. एक सांगू? लक, भाग्य, किस्मत,- - Marathi [मराठी]

Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads
Answer in Brief

उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

१) पाठाच्या आधारे वाक्यांचा उर्वरित भाग लिहून वाक्ये पूर्ण करा. (२)

अ. एक सांगू? लक, भाग्य, किस्मत,-

आ. 'माझा दिवस' अखेर आला होता... गिर्यारोहकांच्या चढाईच्या टप्यातले-

आता मी उतरू लागले होते. जेमतेम ४०-५० पावलांवरच माझा ऑक्सिजन साठा संपला... एक सांगू? लक, भाग्य, किस्मत, डेस्टिनी असल्या भाकड शब्दांना मी नाही मानत; पण fortune favours the braves यावर माझा पूर्ण विश्वास आहे... जेव्हा मी गुदमरू लागले, श्वास घेण्याचा प्रयत्न करू लागले, अगदी त्याच वेळी एका ब्रिटिश माणसाने ओझे होते म्हणून फेकून दिलेला जास्तीचा एक ऑक्सिजन सिलिंडर आम्हांला दिसला. माझ्या शेरपाने तो चटकन मला अडकवला. सावकाश आम्ही त्या 'डेथ झोन' मधून सहीसलामत खाली उतरलो. वर चढण्यापेक्षा खाली उतरताना होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण जास्त आहे... आणि आम्ही ते ओलांडून आलो होतो. 'माझा दिवस' अखेर आला होता... गिर्यारोहकांच्या चढाईच्या टप्प्यातले एक महत्त्वाचे शिखर 'एव्हरेस्ट' मी सर केले होते!

गिर्यारोहणाने मला खूप महत्त्वाचे काही धडे दिले. माझ्यात आत्मविश्वास जागवला. नेतृत्व, गटबांधणी यांचे धडे तर मिळालेच; पण एक पोलादी कणखरपणा माझ्यात निर्माण केला. मित्रांनो, आपण आयुष्यात काय मिळवतो हे महत्त्वाचं नाही, तर ही कमाई आपल्याला अधिक चांगली व्यक्ती कशी बनवते, हे महत्त्वाचं वाटतं मला. आपण इतरांशी कसे वागतो यावरून आपण एक उत्तम व्यक्ती आहोत की नाहीत हे ठरतं.

तुम्हां कुमारवयोगटांतल्या मुलामुलींना एक सांगावंसं वाटतं, की आपलं ध्येय साध्य करताना प्रयत्न निष्फळ ठरणे म्हणजे अपयश नसतं, तर जेव्हा ध्येयच कमकुवत असतं, तेव्हा त्याला अपयश म्हटलं जातं..

२) आकृती पूर्ण करा.  (२)

गिर्यारोहणाने अरुणिमाला दिलेले धडे
       

३) स्वमत-  (३)

'आपण आयुष्यात काय मिळवतो हे महत्त्वाचं नाही, तर ही कमाई आपल्याला अधिक चांगली व्यक्ती कशी बनवते, हे महत्त्वाचं वाटतं मला.' या विधानाबाबत तुमचे मत सोदाहरण स्पष्ट करा.

Advertisement Remove all ads

Solution

१) 

अ. एक सांगू? लक, भाग्य, किस्मत,- डेस्टिनी असल्या भाकड शब्दांना मी नाही मानत; पण fortune favours the braves यावर माझा पूर्ण विश्वास आहे.

आ. 'माझा दिवस' अखेर आला होता... गिर्यारोहकांच्या चढाईच्या टप्यातले- एक महत्त्वाचे शिखर 'एव्हरेस्ट' मी सर केले होते!

२)

गिर्यारोहणाने अरुणिमाला दिलेले धडे
आत्मविश्वास जागवला. नेतृत्वाचे धडे मिळाले. गटबांधणीचे धडे मिळाले. पोलादी कणखरपणा निर्माण केला.

३) माणसाच्या आयुष्यात यश, प्रसिद्धी, संपत्ती मिळवण्याचे अनेक मार्ग उपलब्ध असतात. यासाठी चुकीचे मार्ग निवडणारे, झटपट श्रीमंत होणारे, प्रसिद्धीच्या झोतात येणारे लोक एक चांगली व्यक्ती मात्र बनू शकत नाहीत. परिश्रमाने, सत्याच्या आधारावर मिळवलेले यश हे आपल्याला अधिक चांगली व्यक्ती म्हणून जगण्यास पाठबळ देते. याबाबतीत अतिशय प्रसिद्ध असे वाल्या कोळ्याचे उदाहरण देता येईल. लोकांना मारणारा, लुटणारा, त्यांची संपत्ती लुबाडणारा वाल्या कोळी धनवान होता; मात्र कुप्रसिद्ध होता. त्याच वाल्याकोळ्याने केवळ 'रामनाम' जपाने सर्व संपत्तीचा त्याग करून 'रामायणा' सारखे महाकाव्य लिहिले आणि जगप्रसिद्ध वाल्मिकी ऋषी म्हणून लोकांमध्ये आदराचे स्थान मिळवले.

Concept: गोष्ट अरुणिमाची
  Is there an error in this question or solution?

APPEARS IN

SCERT Maharashtra Question Bank 10th Standard SSC Marathi Maharashtra State Board 2021 [मराठी इयत्ता १० वी]
Chapter 11 गोष्ट अरुणिमाची
कृती क्रमांक ५ | Q 1. (अ)
Share
Notifications

View all notifications


      Forgot password?
View in app×