Advertisement Remove all ads

उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. १) आकृतिबंध पूर्ण करा. २) कारण लिहा. 1. पुस्तक वाचण्याची वाट पाहण्यात उन्हाळ्याच्या आधीचा काळ लेखिकेला वेड लावायचा, कारण... - Marathi [मराठी]

Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads
Answer in Brief

उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

१) आकृतिबंध पूर्ण करा.  (२)

      सुट्टीची वाट पाहणं तर तेव्हापासून सुरू झालेलंच असायचं. अभ्यासाचा आळस नसायचा. पाठांतर आवडायचं. नेमलेली पुस्तकं गोष्टीच्या पुस्तकांइतकीच परत परत आवडीनं वाचली जायची; पण अभ्यासाचं वही-पुस्तक जरा बाजूला झालं रे झालं, की सुट्टीची आठवण उसळी मारून वर यायची. ते अंगणातलं हजारी मोगऱ्याचं झाड, शनिवारवाड्यात सकाळी सकाळी जाऊन वेचून आणलेली बकुळीची फुलं. माठातलं वाळा घातलेलं पाणी, आई-आत्यांची कुरडया-पापड्यांची घाई, अंगणभर पडणारी वाळवणं, कैरीची डाळ आणि पन्हं, कधीमधी घरची परवानगी मिळाल्यावर चोखायला मिळणारे बर्फाचे गोळे, उसाचा ताजा रस आणि मुख्य म्हणजे खूपच खूप गोष्टीची आणि कवितांची नवी पुस्तकं... सुट्टीची किती वाट पाहत असू आम्ही!
      आमच्या भल्यामोठ्या वाड्यात पुष्कळ बिऱ्हाडं असली, तरी आख्ख्या वाड्याला मिळून असलेला एक चौथा मजला म्हणजे माळाच होता. सुट्टीची वाट पाहताना माळ्यावर जाऊन पुस्तकांच्या गराड्यात बसण्याच्या अद्भुत कल्पनेनं अगदी आतून मन फुलून येई. पुस्तकांची वाट पाहण्यात एक गंमत होती. एक वेगळंच जग तिथे भेटत होतं. न पाहिलेले देश, न पाहिलेली माणसं, न अनुभवलेले प्रसंग, अनोळखी तरीपण आपले वाटणारे. ओळखीचे धागे जुळणारे. न जुळणाऱ्या गोष्टीसुद्धा किती थक्क करणाऱ्या! म्हणजे, जग असंही असतं तर...! मला केवढं तरी नवेपण भेटत होतं आणि शब्दांची जादू कळत होती. मी वाचत होते त्या गोष्टी, तो इतिहास, ती गाणी कुणीतरी रचलेली होती. लिहिलेली होती. ते सुचलं, जे लिहावंसं वाटलं ते कसं लिहू शकली आहेत ही माणसं! मला भाषेची ताकद समजत होती. लेखकाच्या प्रतिभेची ताकद समजत होती, म्हणून पुस्तकं वाचण्याची वाट पाहण्यात उन्हाळ्याच्या आधीचा काळ इतका वेड लावायचा की बस्स!
      आणखी एक वाट पाहणं होतं पोपटांच्या थव्यांचं. आमच्या घरामागे एक मोठ्ठं उंबराचं झाड होतं. उन्हं तापण्याचे दिवस आले, की त्यांचे थवे उंबरावर येऊन उतरायचे. कशातरीच पानांचं, गाठीगाठीचं ते झाड तेव्हा पिक्या उंबरांनी आणि राघूंच्या हिरव्या पंखांनी इतकं सुंदर होऊन जायचं! मी वाट पाहायचे त्या थव्यांची. त्या लालसर गोड झालेल्या उंबरांची. माझ्या मनात जाग्या होणाऱ्या कितीतरी कवितांची...

२) कारण लिहा.  (२)

  1. पुस्तक वाचण्याची वाट पाहण्यात उन्हाळ्याच्या आधीचा काळ लेखिकेला वेड लावायचा, कारण...
  2. उन्हाळ्यात लेखिकेच्या घरामागचं झाड सुंदर व्हायचं ...

३) स्वमत कृती-  (३)

पुस्तकातून न पाहिलेले देश, न पाहिलेली माणसं भेटतात; लेखिकेच्या या मताशी तुम्ही सहमत आहात का? कसे ते स्पष्ट करा.

Advertisement Remove all ads

Solution

१)

लेखिकेला पुस्तकात भेटलेले जग
न पाहिलेले देश न पाहिलेली माणसं न अनुभवलेले प्रसंग ओळखीचे धागे जुळणाऱ्या व न जुळणाऱ्या गोष्टी

२)

  1. पुस्तक वाचण्याची वाट पाहण्यात उन्हाळ्याच्या आधीचा काळ लेखिकेला वेड लावायचा, कारण लेखिकेला भाषेची व लेखकांच्या प्रतिभेची ताकद समजत होती.
  2. उन्हाळ्यात लेखिकेच्या घरामागचं झाड सुंदर व्हायचं कारण उन्हाळ्यातील पिक्या उंबरांनी व पोपटांच्या थव्यांनी.

३) लेखिकेच्या मते पुस्तकातून न पाहिलेले देश, न पाहिलेली माणसं आपल्याला भेटतात हे खरे आहे. आपण आपल्या आयुष्यात कित्येक अनुभव प्रत्यक्ष घेऊ शकत नाही; मात्र हे अनुभव देण्याचं काम पुस्तके करतात. विविध स्वभावाच्या, विविध संस्कृतीच्या, वृत्तीच्या व्यक्तींचा परिचय आपल्याला पुस्तकातून होत असतो. एखादी कादंबरी, नाटक वाचताना आपल्याला त्यातील पात्रे ही आपण कधीही न पाहिलेली माणसं आहेत हे जाणवते. प्रवासवर्णनातून अथवा कथाकादंबऱ्यांमधून, कवितांमधून आपण न पाहिलेले देश-जागा यांचा अनुभव आपल्याला पुस्तके देत असतात. ज्या व्यक्ती अतिशय शूर आहेत किंवा खूप प्रसिद्ध आणि बुद्धिमान आहेत अशा साऱ्या माणसांना अनुभवणे पुस्तकांमुळे शक्य होते.

Concept: गद्य [इयत्ता १० वी]
  Is there an error in this question or solution?
Advertisement Remove all ads

APPEARS IN

SCERT Maharashtra Question Bank 10th Standard SSC Marathi Maharashtra State Board 2021 [मराठी इयत्ता १० वी]
Chapter 8 वाट पाहताना
कृती क्रमांक २ | Q 1. (अ)
Advertisement Remove all ads
Share
Notifications

View all notifications


      Forgot password?
View in app×