उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. १) आकृती पूर्ण करा. अरुणिमाने डॉक्टर व सहकार्यांना दिलेला धीर - Marathi [मराठी]

Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads
Answer in Brief

उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

१) आकृती पूर्ण करा.  (२)

अरुणिमाने डॉक्टर व सहकार्यांना दिलेला धीर
____________

 

बरेलीच्या त्या हॉस्पिटलमध्ये ना भूलतज्ज्ञ होता ना मला देण्यासाठी पुरेसे रक्त. सचिंत झालेल्या डॉक्टर व सहकार्यांना मीच धीर दिला, 'डॉक्टर, नाहीतरी माझ्या पायाची चाळण झालेलीच आहे. आता भूल न देताच तुम्ही तो कापलात तरी चालेल.' डॉक्टर व त्यांच्या सहकार्यांनी स्वत:चे एक युनिट रक्त मला दिले आणि माझ्यादेखतच माझा पाय कापला गेला.

इकडे मी जीवनमरणाच्या सीमारेषेवर होते; पण हॉस्पिटलबाहेरच्या जगात एक वेगळेच नाट्य घडत होते. 'फुटबॉल आणि व्हॉलीबॉल चॅम्पियन युवती सात तास जखमी अवस्थेत उपचाराविना पडून राहिली' ही बातमी प्रसारमाध्यमांनी उचलून धरलेली. तत्कालीन क्रीडामंत्र्यांनी मला दिल्लीच्या 'एम्स' मध्ये (AIIMS) हलवले, राष्ट्रीय खेळाडू असल्याने अत्युच्च दर्जाच्या सुविधा मला मिळाल्या... पण... पण शल्य एकच होतं, की प्रसारमाध्यमांमध्ये वाटेल त्या वावड्या उठत होत्या. 'अरुणिमाकडे प्रवासाचं तिकीट नव्हतं म्हणून तिने रेल्वेतून खाली उडी मारली' इथपासून ते 'अरुणिमाने आत्महत्येचा प्रयत्न केला', इथपर्यंत काहीही छापून येत होतं. तब्बल चार महिने 'एम्स' मध्ये (AIIMS) राहिल्यानंतर, शारीरिक जखमांवर मलमपट्टी झाली होती; पण या मानसिक जखमांचे घाव अंतरंग घायाळ करणारे होते.

२) जोड्या जुळवा.  (२)

'अ' गट 'ब' गट
१. बरेलीचे हॉस्पिटल अ. एम्स हॉस्पिटल
२. जीवनमरणाची आ. अंतरंग घायाळ करणारे
३. दिल्ली इ. ना भूलतज्ज्ञ, ना पुरेसे रक्त
४. मानसिक जखमा ई. सीमारेषा

३) स्वमत- (३)

’शारीरिक जखमा मलमपट्टीने बऱ्या होतात; पण मानसिक जखमांचे घाव अंतरंग घायाळ करणारे असतात“ या विधानाचा अर्थ स्वत:च्या शब्दांत लिहा.

Advertisement Remove all ads

Solution

१)

अरुणिमाने डॉक्टर व सहकार्यांना दिलेला धीर
माझ्या पायाची चाळण झालेलीच आहे.
आता भूल न देताच तुम्ही तो कापलात तरी चालेल.

२)

'अ' गट 'ब' गट
१. बरेलीचे हॉस्पिटल इ. ना भूलतज्ज्ञ, ना पुरेसे रक्त
२. जीवनमरणाची ई. सीमारेषा
३. दिल्ली अ. एम्स हॉस्पिटल
४. मानसिक जखमा आ. अंतरंग घायाळ करणारे

३) माणूस हा इतर प्राण्यांच्या तुलनेत शारीरिकदृष्ट्या कमकुवत असूनही त्याने आपल्या मानसिक कणखरतेच्या जोरावर सर्वांवर राज्य गाजवले आहे. शरीराला झालेल्या जखमा योग्य औषधोपचाराने बऱ्या होतात; मात्र आपल्याला एखादा मानसिक धक्का बसला, एखाद्याचे बोलणे मनाला लागले, एखादा प्रसंग, वाईट घटना सतत आठवत राहिली, तर होणाऱ्या वेदनांसाठी कोणतेही औषध नसते. यांचे घाव न भरून येणारे असतात. यामुळे, एखादी व्यक्ती आपला आत्मविश्वास गमावू शकते आणि शारीरिकदृष्ट्या सक्षम असूनही मनाने अपंग बनू शकते. याचाच अर्थ शारीरिक जखमा बऱ्या होतात; पण मानसिक, जखमा अंतरंग घायाळ करतात.

Concept: गोष्ट अरुणिमाची
  Is there an error in this question or solution?

APPEARS IN

SCERT Maharashtra Question Bank 10th Standard SSC Marathi Maharashtra State Board 2021 [मराठी इयत्ता १० वी]
Chapter 11 गोष्ट अरुणिमाची
कृती क्रमांक २ | Q 1. (अ)
Share
Notifications

View all notifications


      Forgot password?
View in app×