उपयोजित इतिहासाचा वर्तमानकाळाशी कसा संबंध असतो?
Solution
प्रस्तावना: उपयोजित इतिहास म्हणजेच 'जनांसाठीचा इतिहास'. यामध्ये इतिहासाबाबतच्या गैरसमजांवर मात करत त्याची नाळ लोकांच्या वर्तमानातील जीवनाशी जोडली जाते.
१. भूतकाळातील घटनांचा वर्तमान व भविष्यामध्ये सर्वसामान्य लोकांना उपयोग कसा होईल, याचा विचार, उपयोजित इतिहास या विषयात केला जातो.
२. भूतकालीन घटनांचे मूर्त आणि अमूर्त अशा स्वरूपातील अनेक अवशेष वर्तमानकाळात अस्तित्वात असतात. त्यामुळे, आपल्याला या सर्वांविषयक कुतूहल व आत्मीयता असते.
३. याशिवाय, इतिहासाचे ज्ञान सर्व गोष्टींच्या उगमाकडे नेणारे असल्याने पुढील पिढ्यांकरता या सांस्कृतिक वारशाचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी उपयोजित इतिहासाचा आधार घ्यावा लागतो. त्यामुळे, व्यवसायाच्या अनेक संधीदेखील निर्माण होतात.
उदा. इतिहासकार, पुरातत्त्वज्ञ, संग्रहपाल, स्थापत्य-विशारद, अभियंता, समाजशास्त्रज्ञ, कायदेतज्ज्ञ, छायाचित्रण तज्ज्ञ इत्यादी.
निष्कर्ष: अशाप्रकारे, इतिहासाच्या आधारे वर्तमानकाळाचे यथायोग्य आकलन आणि भविष्यकाळासाठी दिशादर्शन करण्याचे कार्य उपयोजित इतिहासाद्वारे केले जाते.