तुमच्या शाळेमध्ये उन्हाळी सुट्टीत ‘हस्ताक्षर सुंदर करूया!’ हे १० दिवसांचे शिबिर आयोजित केले आहे. त्यात तुम्हांला सहभागी करून घेण्याची विनंती करणारे पत्र वर्ग शिक्षकांना लिहा.
Solution
कु. मीना तांबे
१०५, श्रीपाद अपार्टमेंट,
टिळक रोड,
पुणे ४२२ ००३
दिनांक: १८ मे २०१९
प्रति,
माननीय श्री. रवी साळवी,
वर्गशिक्षक, इयत्ता आठवी, तुकडी 'अ',
स्वामी विवेकानंद विद्यालय,
पुणे -४२२ ००३
विषय: 'हस्ताक्षर सुंदर करूया !' शिबिरामध्ये सहभागी होण्याबाबत.
महोदय,
आपल्या शाळेत २० मे ते ३० मे या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या ‘हस्ताक्षर सुंदर करूया !’ या स्पर्धेत मला सहभागी व्हायचे आहे. वार्षिक परीक्षेच्या निकालाच्या दिवशी मी शाळेत उपस्थित राहू शकले नाही त्यामुळे मला या शिबिराच्या आयोजनाची माहिती कळू शकली नाही. कालच मला मैत्रिणीकडून या शिबिराबद्दलची माहिती मिळाली. या शिबिराचे संयोजन तुम्ही करत असल्याचेही समजले. हे शिबिर सुरू व्हायला आता फक्त चार दिवस शिल्लक आहेत आणि त्यासाठी प्रवेशाच्या जागादेखील मर्यादित आहेत. त्यामुळे, शक्य झाल्यास मला या शिबिरात सहभागी होण्याची संधी द्यावी, ही नम्र विनंती.
आपली विश्वासू,
कु. मीना तांबे
तिकीट प्रति, कु. मीना तांबे |