तुम्ही केलेल्या क्षेत्रभेटीचा अहवाल तयार करा.
Solution
घारापुरी (एलिफंटा) बेटाच्या क्षेत्रभेटीचा अहवाल.
(१) क्षेत्रभेटीचा हेतू :
(अ) 'समुद्री बेट' या संकल्पनेचा प्रत्यक्ष भेटीतून अभ्यास करणे.
(आ) घारापुरी (एलिफंटा) या बेटाविषयी सविस्तर माहिती मिळवणे.
(२) क्षेत्रभेटीद्वारे संकलित केलेली माहिती:
(अ) घारापुरी (एलिफंटा) या बेटाचे स्थान:
- सर्व बाजूंनी पाण्याने वेढलेला जमिनीचा भूभाग, म्हणजे 'बेट' होय.
- घारापुरी (एलिफंटा) हे बेट दक्षिण मुंबईतील ट्रॉम्बेजवळील खाडीतील एक लहानसे बेट आहे.
- घारापुरी (एलिफंटा) या बेटाचे स्थान रायगड जिल्ह्यात आहे.
(आ) घारापुरी (एलिफंटा) या बेटाचे क्षेत्रफळ:
- समुद्राच्या भरतीच्या वेळी घारापुरी (एलिफंटा) या बेटाचे क्षेत्रफळ सुमारे १० चौरस किमी असते.
- समुद्राच्या ओहोटीच्या वेळी घारापुरी (एलिफंटा) या बेटाचे क्षेत्रफळ सुमारे १६ चौरस किमी असते.
(३) घारापुरी (एलिफंटा) या बेटावर पोहोचण्यासाठी वाहतुकीची साधने:
(अ) घारापुरी (एलिफंटा) या बेटावर पोहोचण्यासाठी प्रामुख्याने मुंबईतील 'गेटवे ऑफ इंडिया' पासून प्रवासी बोटीने जावे लागते.
(आ) मुंबईतील 'गेटवे ऑफ इंडिया' पासून घारापुरी (एलिफंटा) या बेटावर पोहोचण्यासाठी सुमारे एक तासाचा कालावधी लागतो.
(इ) या प्रवासादरम्यान मुंबईतील टोलेजंग इमारती, मोठमोठ्या व्यापारी नौका, सीगल पक्ष्यांचे थवे दिसतात.
(४) घारापुरी (एलिफंटा) या बेटावरील पर्यटकांची आकर्षणे:
(अ) घारापुरी (एलिफंटा) या बेटावर पाषाणात खोदलेली अनेक ऐतिहासिक लेणी आढळतात.
(आ) ही लेणी जगप्रसिद्ध आहेत. येथे दरवर्षी अनेक भारतीय व परदेशी पर्यटक भेट देतात.
(५) घारापुरी (एलिफंटा) या बेटावरील लोकजीवन:
(अ) घारापुरी (एलिफंटा) या बेटावर सुमारे १५०० ते २००० लोकांची वस्ती आढळते.
(आ) घारापुरी (एलिफंटा) या बेटावरील लोक मुख्यतः पर्यटन, भातशेती, बोटींची दुरुस्ती व मासेमारी या व्यवसायांत गुंतलेले आढळतात.
(६) घारापुरी (एलिफंटा) या बेटावरील समस्या:
(अ) घारापुरी (एलिफंटा) या बेटावरील स्थानिकांना व पर्यटकांना काही प्रसंगी पिण्याच्या पाण्याच्या टंचाईच्या समस्येस सामोरे जावे लागते.
(आ) घारापुरी (एलिफंटा) या बेटावर पुरेशा प्रमाणात शैक्षणिक व वैद्यकीय सेवा उपलब्ध नाहीत.