उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. गुण (०७)
आकलन कृती
१. आकृतिबंध पूर्ण करा. (०२)
“तुला सांगतो मी पंत, 'डाएट' कर. बटाटा सोड. बटाट्याचं नाव काढू नकोस.” “हो! 'म्हणजे कुठं राहाता?' म्हणून विचारलं तर नुसतं 'चाळीत राहतो' म्हणा. 'बटाट्याची चाळ' म्हणू नका. वजन वाढेल! खी: खी: खी:!” जनोबा रेगे या इसमाला काय म्हणावे हे मला कळत नाही. नेहमी तिरके बोलायचे म्हणजे काय! पण सोकाजींनी त्याला परस्पर जामून टाकले. “ए इडिअट! सगळ्याच गोष्टींत जोक काय मारतोस नेहमी? मी सांगतो तुला पंत-तू बटाटा सोड.” मी काय काय सोडले असता माझे वजन घटेल याची यादी बटाट्यापासून सुरू झाली. “बटाट्याचं ठीक आहे; पण पंत, आधी भात सोडा.” एक सल्ला. “भातानं थोडंच लठ्ठ व्हायला होतं? आमच्या कोकणात सगळे भात खातात. कुठं आहेत लठ्ठ? तुम्ही डाळ सोडा.” काशीनाथ नाडकर्णी. “मुख्य म्हणजे साखर सोडा.” “मी सांगू का? मीठ सोडा.” “लोणी-तूप सोडा-एका आठवड्यात दहा पाैंड वजन घटलं नाही तर नाव बदलीन. आमच्या हेडक्लार्कच्या वाइफचं घटलं.” “तेल आणि तळलेले पदार्थ आधी सोडा.” बाबूकाका. “दिवसा झोपणं सोडा.” “खरं म्हणजे पत्ते खेळायचं सोडा. बसून बसून वजन वाढतं.” मी मात्र या सर्व जनांचे ऐकून मनाचे करायचे ठरवले होते. पहिला उपाय म्हणून मी 'आहारपरिवर्तन' सुरू केले. |
२. आकलन कृती
कोण ते लिहा. (०२)
अ) लेखकाला तेल व तळलेले पदार्थ सोडायला सांगणारे
आ) उताऱ्याच्या आधारे 'आहारपरिवर्तन' हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.
३. स्वमत (०३)
'लेखकाने ऐकावे जनाचे करावे मनाचे असे ठरवले' लेखकाच्या या मताशी तुम्ही सहमत आहात का?
Solution
१.
२.
अ) बाबू काका
आ) वजन घटवण्याकरता पहिला उपाय म्हणून लेखकाने काय केले?
३. हो. मी लेखकाच्या या मताशी सहमत आहे. लेखकाने डाएट सुरू करायचा निर्धार व्यक्त करताच चाळीतल्या लोकांनी त्यांनी काय खाऊ नये याची ढीगभर मोठी यादीच समोर मांडली. व्यक्ती तितक्या प्रवृत्तीप्रमाणे प्रत्येक शेजाऱ्याने एक वेगळा पदार्थ न खाण्याचा सल्ला दिला. त्यामुळे, नक्की जगण्यासाठी काय खावे असा प्रश्न उपस्थित होणे साहजिकच होते. प्रत्येकाची मते शांतपणे ऐकून घेऊन लेखकाने मात्र स्वत:च स्वत:चे आहारव्रत सुरू करण्याचा निर्णय घेतला. एक ना धड भाराभर चिंध्या होण्यापेक्षा स्वत: विचार करून, वाचन करून, माहिती मिळवून योग्य प्रकारे आहारव्रत पार पाडण्याचा लेखकांचा हेतू येथे स्पष्ट होतो. त्यामुळे, हवी तशी मतं मांडणाऱ्या शेजाऱ्याच्या विचारांना न जुमानता स्वत:चे निर्णय स्वत: घेण्याचा लेखकाचा निर्धार मला पटतो.