Advertisement Remove all ads

तू निघालास तेव्हा काळोखाचं राज्य होतं. सूर्यफुलांनी पाठ फिरविली होती. मळवाटेने जायचे नाकारलेस तेव्हा खाचखळग्यांनी तुझे स्वागत केले. - Marathi [मराठी]

Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads
Answer in Brief

पुढील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

1. आकृत्या पूर्ण करा. (२)

  1. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नाकारलेली गोष्ट - ___________
  2. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वागत करणारे - ___________

2. सत्य विधान ओळखा. (२)

  1. बाबासाहेब निघाले तेव्हा सूर्यफुलांनी त्यांचे स्वागत केले.
  2. बाबासाहेब बोलक्या जिवांचे नायक झाले.
  3. चवदार तळ्यावर बाबासाहेबांनी गुलामांच्या पायात बेड्या चढवल्या.
  4. विषम परिस्थितीवर स्वार होत बाबासाहेबांनी नवा इतिहास घडवला.

तू निघालास तेव्हा काळोखाचं राज्य होतं.
सूर्यफुलांनी पाठ फिरविली होती.
मळवाटेने जायचे नाकारलेस तेव्हा
खाचखळग्यांनी तुझे स्वागत केले.

तू झालास परिस्थितीवर स्वार
आणि घडविलास नवा इतिहास
तू झालास मूक समाजाचा नायक
आणि जागा केलास उभा बहिष्कृत भारत.

तू फुंकलेस रणशिंग अगाध ज्ञानाच्या बळावर
तू तोडल्यास गुलामांच्या पायांतल्या बेड्या
आणि केलेस उभे चवदार तळ्याच्या काठावर
युद्धात जवानांना उभे करावे तसे.

तुझे शब्द जसे की
महाकाव्ये तुझ्या पायाजवळ गळून पडावीत
तुझा संघर्ष असा की
काठ्यांच्या संगिनी व्हाव्यात.
तुझ्या डरकाळीने हादरलं आकाश; डचमळली पृथ्वी
आणि बघता बघता चवदार तळ्याला आग लागली.

आज पन्नास वर्षांनी अनुभवतोय
सूर्यफुले तुझा ध्यास घेतायत
बिगूल प्रतीक्षा करतोय
चवदार तळ्याचं पाणी, तेही आता थंड झालंय.

3. ओळींचा सरळ अर्थ लिहा. (२)

'तू झालास मूक समाजाचा नायक आणि जागा केलास उभा बहिष्कृत भारत' या ओळींचा सरळ अर्थ लिहा.

4. विचार साैंदर्य लिहा. (२) ‚

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कवितेतून जाणवलेले कर्तृत्व तुमच्या शब्दांत लिहा.

Advertisement Remove all ads

Solution

1. 

  1. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नाकारलेली गोष्ट - मळवाट
  2. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वागत करणारे - खाचखळगे

2. विषम परिस्थितीवर स्वार होत बाबासाहेबांनी नवा इतिहास घडवला.

3. बिकट परिस्थितीवर स्वार होऊन तू नवा इतिहास घडवलास. मूक बनून जगणाऱ्या समाजाचा, तू नेता बनलास आणि बहिष्कृत केलेल्या समाजाला तू जागृत केलेस.

4. 'तू झालास मूक समाजाचा नायक' या कवितेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पन्नास वर्षांपूर्वी आपल्या अनुयायांसह महाड येथे चवदार तळ्याचा सत्याग्रह घडवून आणला, त्याविषयी त्यांचा गौरव केला आहे. त्यांच्या कार्याचे वर्णन यात केले आहे. ज्या समाजाने न्यायाचा, ज्ञानाचा प्रकाश कधी पाहिलाच नव्हता, अशा समाजाला त्यांनी जागे केले. या मुक्या समाजाला वाचा दिली. अन्यायाविरुद्ध विद्रोह करण्याची, अन्यायाला, अज्ञानाला नकार देण्याची वृत्ती निर्माण केली. पारंपरिक वाटेला नकार देत, विषम सामाजिक व्यवस्थेला नाकारले आणि नव्या समाजाचा पाया उभारला.
         दलित बांधवांना चवदार तळ्याचे पाणी नाकारणाऱ्या व्यवस्थेविरुद्ध बंड पुकारले. माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी, मानवी हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी हा लढा उभा केला. या बांधवांना त्यांचे मानवी हक्क मिळवून देण्यासाठी, त्यांना माणूस म्हणून जगता यावे यासाठी आंबेडकरांनी आपले आयुष्य वेचले. आपल्या अगाध ज्ञानाचा वापर त्यांनी समाजाकरता केला. त्यांचे हे असामान्य कर्तृत्व या कवितेतून नेमकेपणाने मांडले आहे.

Concept: पद्य [इयत्ता १० वी]
  Is there an error in this question or solution?
Advertisement Remove all ads

APPEARS IN

SCERT Maharashtra Question Bank 10th Standard SSC Marathi Maharashtra State Board 2021 [मराठी इयत्ता १० वी]
Chapter 19 तू झालास मूक समाजाचा नायक
कृती क्रमांक १ | Q 2. (अ)
Advertisement Remove all ads
Share
Notifications

View all notifications


      Forgot password?
View in app×