Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads
Short Note
टीपा लिहा.
विश्वकोश
Advertisement Remove all ads
Solution 1
- महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी १९६० साली 'महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळा'ची स्थापना केली.
- मराठी भाषा व साहित्य यांच्या विकासासाठी मराठी विश्वकोश निर्मितीस चालना देणे हा त्यामागे उद्देश होता.
- या मंडळाने तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांची विश्वकोशाच्या प्रमुख संपादकपदी नेमणूक केली. विश्वकोशाचे आजपर्यंत २० खंड प्रसिद्ध झाले आहेत.
- मराठी विश्वकोश हा सर्व विषय संग्राहक असून जगभरातील ज्ञान साररूपाने त्यात आलेले आहे. इतर विषयांप्रमाणेच इतिहास विषयाशी निगडित असणाऱ्या महत्त्वाच्या नोंदीदेखील विश्वकोशात करण्यात आलेल्या आहेत.
Solution 2
१. विश्वकोश हा कोशवाड्मयाचा एक प्रकार आहे.
२. विश्वकोशाचे प्रामुख्याने दोन प्रकार पडतात - सर्वसंग्राहक विश्वकोश ज्यामध्ये सर्व विषयांचा समावेश असतो. उदा. एनसायक्लो पीडिया ब्रिटानिका, महाराष्ट्रीय ज्ञानकोश, मराठी विश्वकोश इ. तर विशिष्ट विषयावर कोश हे एखाद्या विषयाला वाहून घेतलेले असतात. उदा. भारतीय संस्कृती कोश, व्यायाम ज्ञानकोश इ.
३. मराठी भाषा व साहित्य यांच्या अभिवृद्धीकरता महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी 'महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळा' च्या वतीने मराठी विश्वकोश निर्मितीला चालना दिली आणि तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या नेतृत्वाखाली मराठी विश्वकोश निर्मितीला सुरुवात झाली.
४. जगभरातील ज्ञान साररूपाने यात असून इतिहासविषयासंबंधित महत्त्वाच्या नोंदी देखील आहेत.
Concept: कोशवाङ्मय
Is there an error in this question or solution?
Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads