टिपा लिहा.
उपयोजित इतिहास
Solution
१. 'उपयोजित इतिहास' या संज्ञेकरता 'जनांसाठी इतिहास' (पब्लिक हिस्टरी) हा पर्यायी शब्द वापरला जात असून यात इतिहासाद्वारे मिळणाऱ्या भूतकाळातील घटनांसंबंधित ज्ञानाचा उपयोग वर्तमान व भविष्यकाळात करण्याचा विचार केला जातो.
२. वर्तमानकाळातील सामाजिक आव्हानांवर उपाययोजना, सामाजिक उपयुक्ततेचे निर्णय यांकरता भूतकाळातील घटनांचे विश्लेषण करण्यासाठी इतिहासाचे ज्ञान आवश्यक असते.
३. उपयोजित इतिहासाच्या क्षेत्रामध्ये केवळ तज्ज्ञांचाच नव्हे, तर सर्वसामान्यांचाही सहभाग पर्यटन आणि ऐतिहासिक स्थळांचे जतन व संवर्धन या प्रकल्पांच्या माध्यमांतून करून घेता येऊ शकतो.
४. तसेच, या क्षेत्रासंबंधित संग्रहालये व अभिलेखागार, ऐतिहासिक स्थळांचे जतन आणि संवर्धन, पर्यटन आणि आतिथ्य, मनोरंजन व संपर्कमाध्यमे यांसारख्या क्षेत्रात इतिहासाचे ज्ञान पूरक ठरते.
५. या प्रत्येक क्षेत्राच्या व्यवस्थापनाकरता इतिहासकार, स्थापत्यविशारद, अभियंता, पुरातत्त्वज्ञ, संग्रहपाल, समाजशास्त्रज्ञ, अभिलेखागार व्यवस्थापक, कायदेतज्ज्ञ व छायाचित्रणतज्ज्ञ इत्यादी, विशेष कौशल्यधारक मनुष्यबळाची आवश्यकता असते. यामुळे, व्यवसायाच्या अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात.