Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads
Short Note
टिपा लिहा.
क्षेत्रभेटीची आवश्यकता
Advertisement Remove all ads
Solution
- प्रत्यक्ष माहिती मिळवणे: प्रत्यक्ष माहिती मिळण्याच्या उद्देशाने विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली एखाद्या ठिकाणाला उदा. भौगोलिक प्रदेश, कारखाना, शेत, संग्रहालय यांस भेट देणे म्हणजे क्षेत्रभेट होय.
- प्रत्यक्ष अनुभव घेणे: क्षेत्रभेट ही भूगोलाच्या प्रात्यक्षिक अभ्यासासाठीची एक महत्त्वाची अभ्यासपद्धती आहे. भौगोलिक वैशिष्ट्यांचा प्रत्यक्ष अनुभव क्षेत्रभेटीच्या वेळी घेता येतो. तसेच, भौगोलिक घटकांचे नमुनेही गोळा करता येतात. त्यामुळे, विषयाचे आकलन अधिक चांगल्याप्रकारे होते.
- एखाद्या प्रदेशाची भौगोलिक व सामाजिक स्थिती जाणून घेणे: प्रत्येक प्रदेशाची भौगोलिक व सामाजिक स्थिती जाणून घेण्यासाठी क्षेत्रभेट उपयुक्त ठरते. विविध भौगोलिक संकल्पना आणि घटक क्षेत्रभेटीद्वारे सहजपणे समजून घेता येतात.
- लोकांशी थेट संवाद साधणे: क्षेत्रभेटीमुळे स्थानिक लोकांशी थेट संवाद साधून त्यांचे प्रश्न जाणून घेता येतात. एखाद्या प्रदेशातील मानव आणि पर्यावरण यांमधील सहसंबंध जाणून घेण्यासाठी क्षेत्रभेट अत्यंत उपयुक्त ठरते.
Concept: क्षेत्रभेट
Is there an error in this question or solution?
Advertisement Remove all ads
APPEARS IN
Advertisement Remove all ads