Advertisement Remove all ads

टीपा लिहा. खेळणी आणि उत्सव. - History and Civics [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads
Short Note

टीपा लिहा.

खेळणी आणि उत्सव.

Advertisement Remove all ads

Solution 1

उत्सव व खेळणी यांचा प्राचीन काळापासूनच घनिष्ठ संबंध आहे.

  1. विविध संस्कृतीत आणि धर्मांत उत्सवप्रसंगी विविध खेळण्यांनी सजावट केली जाते. लहान मुलांना खेळण्यांचे वाटप केले जाते.
    सांताक्लॉज नाताळ मध्ये मुलांना खेळणीच देऊन जातो.
  2. दीपावलीच्या उत्सवात महाराष्ट्रात मातीच्या किल्ल्यांवर शिवराय व सैनिकांच्या प्रतिमा ठेवतात, ती खेळणीच असतात.
  3. गावोगावच्या जत्रा व उत्सवप्रसंगी बाजारात मोठ्या प्रमाणात खेळण्यांची दुकाने लागतात.
  4. बैलपोळा, नागपंचमी अशा सणांप्रसंगी मातीचे बैल, गाडी, नागोबा अशी खेळणी तयार केली जातात. मुले या खेळण्यांशी खेळतात, स्पर्धा लावतात. संक्रांतीच्या दिवशी मुले पतंग उडवतात.

Solution 2

१. लहान मुलांच्या करमणुकीकरता व शिक्षणाकरता जी रंगीबेरंगी विविध प्रकारची साधने व उपकरणे असतात, त्यांना खेळणी असे म्हणतात.

२. काही खेळणी विशिष्ट उत्सवांच्या दरम्यान वापरली जातात.

३. या खेळण्यांच्या अभ्यासातून धार्मिक व सांस्कृतिक परंपरा माहीत होतात.

४. महाराष्ट्रामध्ये दिवाळीत किल्ले करण्याची फार मोठी परंपरा आहे. मातीचे किल्ले तयार करून त्यावर शिवाजी महाराज व मावळ्यांच्या प्रतिमा ठेवल्या जातात. हा एक प्रकारचा खेळच आहे, ज्याद्वारे महाराष्ट्रातील किल्ल्यांच्या इतिहासाला उजाळा मिळतो. 

Concept: खेळांचे साहित्य आणि खेळणी
  Is there an error in this question or solution?
Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads
Share
Notifications

View all notifications


      Forgot password?
View in app×