टिपा लिहा.
इतिहासकार
Solution
इतिहासकार:
१. इतिहासातील उपलब्ध पुराव्यांचे चिकित्सापूर्वक संशोधन करून भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची मांडणी करण्याच्या लेखन पद्धतीला इतिहासलेखन असे म्हणतात. इतिहासातील घटनांची चिकित्सापूर्वक मांडणी करणाऱ्या संशोधकाला इतिहासकार म्हटले जाते.
२. भूतकाळातील उपलब्ध पुराव्यांचे चिकित्सकपणे संशोधन करून इतिहासकार इतिहासाची मांडणी करतो.
३. घडलेल्या प्रत्येक घटनेची नोंद करून तिचे ज्ञान मिळवण्यास मर्यादा येतात. त्यामुळे, इतिहासकार त्याला वाचकांपर्यंत जे पोहोचवायचे आहे, त्या दृष्टिकोनाच्या चौकटीत बसतील अशा काही घटनांची निवड करतो.
उदा. एखाद्या इतिहासकाराला शिवाजी महाराजांचा इतिहास वाचकांपर्यंत पोहोचवायचा असेल, तर तो त्यांच्या समकालीन राज्यकर्त्यांचा अभ्यास करतोच; मात्र इतिहासाची मांडणी करताना तो शिवाजी महाराजांना केंद्रस्थानी ठेवून तत्कालीन कालखंडाची मांडणी करतो.
४. विशिष्ट वैचारिक दृष्टिकोनातून इतिहासकार निवडक घटनांची मांडणी करतो. या सर्व गोष्टींवर त्याची लेखनाची शैली निश्चित होते.