Short Note
टीपा लिहा.
एकशिंगी गेंडा
Advertisement Remove all ads
Solution
'काझीरंगा' या पाठात लेखक वसंत अवसरे यांनी काझीरंगा अभयारण्यातील जंगलसफारीचे रोमांचक शब्दांत वर्णन केले आहे. भारतातील आसाम राज्य ओळखले जाते ते येथील काझीरंगा अभयारण्यातील एकशिंगी गेंड्यासाठी. आसाम वगळता तो भारतात इतरत्र कोठेही आढळत नाही. त्यामुळे, आसाम राज्य सरकारने एकशिंगी गेंड्यास आसामचे प्रतीक केले असून, आसाममध्ये ठिकठिकाणी त्याचे पुतळे उभारले आहेत. वरवर पाहता हा प्राणी निर्बुद्ध वाटतो; पण प्रथमदर्शनी वाटतो तितका काही तो टाकाऊ नाही. जगातील प्रचंडकाय प्राण्यांत भारतातील या एकशिंगी गेंड्याचा चौथा क्रमांक लागतो. याच्या नाकावरील शिंगाची बाजारातील किंमत सुमारे दोन हजार रुपये इतकी असते.
Concept: स्थूल वाचन (9th Standard)
Is there an error in this question or solution?
Advertisement Remove all ads
APPEARS IN
Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads