Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads
Answer in Brief
टिपा लिहा.
भारत व ब्रझील नागरीकरण तुलना
Advertisement Remove all ads
Solution
- नागरीकरणाची वाढ: भारतातील नागरीकरणाचा वेग हा ब्राझीलच्या नागरीकरणाच्या तुलनेत कमी आहे.
- अधिक नागरीकरण:
- भारतात उत्तरेच्या तुलनेत दक्षिणेकडे नागरीकरण अधिक झालेले आहे. गोवा या राज्यात ६२%, तर दिल्ली या राज्यात ८०% नागरीकरण झाले आहे. याशिवाय तमिळनाडू, महाराष्ट्र, गुजरात व केरळ या राज्यांमध्येही नागरीकरण अधिक झाले आहे.
- ब्राझीलमध्ये अंतर्गत भागापेक्षा किनारी भागात नागरीकरण जास्त झाले आहे. देशात उत्तरेकडील राज्यांपेक्षा गोइआस, सावो पावलो, रिओ दी जनेरिओ या राज्यांमध्ये नागरी लोकसंख्या अधिक आहे.
- कमी नागरीकरण:
- भारतातील हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, बिहार, राजस्थान या राज्यांमध्ये नागरीकरण कमी झालेले आहे.
- ब्राझीलमध्ये उच्चभूमी प्रदेश आणि ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात लोकसंख्या कमी असल्याने येथे नागरीकरण कमी आहे; मात्र निग्रो व ॲमेझॉन या नद्यांच्या संगमावरील मॅनॉस हे बंदर याला अपवाद असून या ठिकाणी नागरीकरण अधिक आहे.
Concept: भारत-नागरीकरण
Is there an error in this question or solution?
Advertisement Remove all ads
APPEARS IN
Advertisement Remove all ads