Short Note
थोडक्यात उत्तरे लिहा :
वृत्तलेखाची भाषा
Advertisement Remove all ads
Solution
वृत्तलेख बातमीवर आधारित असला, तरी बातमी पेक्षा अधिक सांगण्याचा प्रयत्न करीत असतो. वृत्तलेख लिहिताना वाचकांच्या अभिरुचीचा विचार वृत्तलेखात प्राधान्याने केला जातो. सर्वसाधारण वाचक वर्ग नजरेसमोर ठेवून वृत्तलेखाच्या विषयांची निवड केली जाते. वृत्तलेखाची भाषा देखील सहज, सोपी चटकन विषय लक्षात येईल अशी असणे अपेक्षित असते. भाषेचे स्वरूप सरळ असले, तरी परिणामकारकता असणे गरजेचे असते. वृत्तलेख वाचकांची उत्सुकता वाढवत असल्याने भाषा मनाला भिडणारी असावी. वृत्तलेखातील मजकुरातील शब्दबंबाळपणा टाळणे आवश्यक असते. लहान लहान वाक्यरचना, बोलीभाषेतील शब्द असतील, तर विषय समजण्यास सोपे होते. विषयाचा हेतू लक्षात घेऊन वाचकांची जिज्ञासा शमली जावी, अशा भाषेत वृत्तलेखाची मांडणी असणे अभिप्रेत असते.
Concept: वृत्तपत्रीय लेखन (लेख व अग्रलेख) (12th Standard)
Is there an error in this question or solution?
Advertisement Remove all ads
APPEARS IN
Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads