थोडक्यात उत्तरे लिहा.
अनुला समाज कसा समजून घ्यायचा आहे, ते थोडक्यात स्पष्ट करा.
Solution
अनूला स्वत:ला प्रत्यक्ष अनुभव घ्यायचे होते. तिला समाज समजून घ्यायचा होता. त्यासाठी ती स्वत:च समाजाच्या व्यवहारांत उतरू पाहत होती. हे तिला स्वत:च्या स्वतंत्र बुद्धीने करण्याची संधी हवी होती. आपल्या बुद्धीवर तिला कोणाचाही प्रभाव नको होता, कोणाच्याही विचारांचे प्रतिबिंब नको होते. तिला समाजाचे खरेखुरे रूप जाणून घ्यायचे होते. नोकरी करणे हा समाजात मिसळण्याचा एक मार्ग तिला दिसत होता. नोकरीचा निर्णय घेतल्यावर तिने विचारपूर्वक नर्सचा पेशा स्वीकारला. इस्पितळ व रुग्ण यांच्या जगात सुख आणि दुःख खऱ्या स्वरूपात भेटतात; जीवनाचे खरेखुरे दर्शन तिथे घडते, माणूस कळतो, असे तिचे मत होते. नर्स रुग्णांच्या भावजीवना पर्यंत पोहोचते. ती त्यांचा ताप व मनस्ताप या दोन्हींचे निवारण करते. म्हणूनच तिच्या मते, समाज समजून घेण्यासाठी नर्सची नोकरी करणे हा योग्य मार्ग होता.