थोडक्यात टिपा लिहा.
समस्थानकांचे मेंडेलीव्हच्या व आधुनिक आवर्तसारणीतील स्थान
Solution
मेंडेलीव्हने आवर्तसारणी मांडल्यानंतर खूप काळाने समस्थानिकांचा शोध लागला. समस्थानिकांचे रासायनिक गुणधर्म समान, तर अणुवस्तुमान भिन्न असल्याने मेंडेलीव्हच्या आवर्त-सारणीत जागा कशा प्रकारे दयावयाची हे एक मोठे आव्हान उभे होते.
मोजलेने अणुवस्तुमान हा मूलद्रव्यांचा गुणधर्म नसून अणुअंक हा मूलद्रव्यांचा गुणधर्म आहे असे शोधून काढले. कोणत्याही मूलद्रव्याचा अणुअंक त्याच्या अगोदर असलेल्या मूलद्रव्य पेक्षा एक क्रमांकाने वाढलेला दिसतो. आधुनिक आवर्तसारणी मूलद्रव्यांची मांडणी त्यांच्या अणुअंकांप्रमाणे करण्यात आली त्या वेळी मेंडेलीव्हच्या आवर्तसारणीतील मूलद्रव्यांची जोड्यांमध्ये (समस्थानिकांमध्ये) आढळलेली विसंगती दूर झाली.
\[\ce{^35_17 C 1}\] व \[\ce{^37_17 C 1}\]
क्लोरीनच्या समस्थानिकांना आधुनिक आवर्तसारणीत एकाच स्थानात ठेवण्यात आले. या दोन्हींचा अणुअंक हा एकच आहे.