Advertisement Remove all ads

ताणतणाव कमी करण्याचे विविध मार्ग कोणते? - Science and Technology 2 [विज्ञान आणि तंत्रज्ञान २]

Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads
Answer in Brief

ताणतणाव कमी करण्याचे विविध मार्ग कोणते?

Advertisement Remove all ads

Solution

ताणतणाव कमी करण्यासाठी पुढील मार्ग आहेत:

  1. हास्यमंडळ: एकत्र जमून मोठमोठ्याने व मनमोकळे हसून आपला ताण हलका करता येतो.
  2. सुसंवाद: मित्र-मैत्रिणी, समवयस्क, भाऊ-बहिणी, शिक्षक व पालक या सर्वाशी सुसंवाद साधणे म्हणजेच आपले मन मोकळे करणे याने ताणतणाव कमी होतो.
  3. लेखन: मनातले विचार लिहून काढले आणि आपल्या चुकीच्या विचारांचे विश्लेषण केले तरीही ताण कमी होतो.
  4. छंद जोपासणे: वस्तूंचा संग्रह करणे, छायाचित्रण, दर्जेदार पुस्तकांचे वाचन, पाककला, शिल्पकला, चित्रकला, रांगोळी, नृत्य इत्यादी छंद मनाला लावून घेतले तर ताण येत नाही आणि रिकामा वेळदेखील सत्कारणी लागतो. सकारात्मक गोष्टींकडे ऊर्जा व मन वळवावे. त्यामुळे नकारात्मक भावना कमी होतात.
  5. संगीत: संगीत शिकणे, ऐकणे, गाणी म्हणणे यांमुळे आनंद मिळून ताण हलका होतो. संगीतात मनःस्थिती बदलण्याची ताकद असते.
  6. मैदानी खेळ व व्यायाम: मानसिक आणि शारीरिक आरोग्य मैदानी खेळांमुळे सुधारते. खेळांमुळे शारीरिक व्यायाम, शिस्त, इतरांशी आंतरक्रिया, संघभावना वाढणे, एकाकीपणा संपून व्यक्ती समाजाभिमुख होणे असे अनेक फायदे असतात. योगाचा पण सराव असावा.
  7. निसर्ग भ्रमण, पक्षी निरीक्षण, पाळीव प्राण्याचे संगोपन यानेही ताण कमी होतो.
Concept: ताणतणाव व्यवस्थापन (Stress Management)
  Is there an error in this question or solution?
Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads
Share
Notifications

View all notifications


      Forgot password?
View in app×