Maharashtra State BoardSSC (English Medium) 8th Standard
Advertisement Remove all ads

स्वमत स्पष्ट करा. पोटोबाबद्दलची तक्रार सांगून सर्व इंद्रियांनी ती तक्रार करण्याची कारणे. - Marathi [मराठी]

Answer in Brief

स्वमत स्पष्ट करा.

पोटोबाबद्दलची तक्रार सांगून सर्व इंद्रियांनी ती तक्रार करण्याची कारणे.

Advertisement Remove all ads

Solution

पोटोबाच्या विरोधात जिव्हाताई, कर्णिका, नासिका, नयनकुमार, हस्तकराज, पदकुमार इत्यादी अवयवांच्या तक्रारी होत्या. त्यामागे प्रत्येकाची अशी कारणे होती. पोटामुळे साऱ्याच अवयवांची फरपट होते आणि तरीही सारा मानसन्मान त्या पोटोबालाच मिळतो. शिवाय, आपण सारे काम करत असून पोटोबा मात्र आयते बसून खातात, सगळ्यांवर गुरगुरतात, आपल्यासारखे काही काम करत नाहीत, तरीही सगळी माणसं त्याचेच कौतुक करतात, अशा अनेक तक्रारी या अवयवांनी पोटोबांविरुद्ध केल्या. याचे कारण म्हणजे जिव्हेला पोटोबामुळे तिच्या आवडीचे पदार्थ जास्त खाता येत नव्हते, खाण्यापिण्याची सक्ती तिच्यावर केली जात होती, नासिकेला आपण सतत श्वास व वास घेण्याचे महत्त्वाचे कार्य करतो, मात्र पोटोबा आयते बसून असतात असे वाटत होते. पोटोबा सतत सर्वांवर गुरगुरतो आणि त्याच्यासाठी आपल्याला राबवून घेतले जाते असे पदकुमारांस वाटते नयनकुमारही पाहण्याचे, साैंदर्यांत भर घालण्याचे कार्य करतात व कर्णिका ऐकण्याचे काम करून जीवनव्यवहारास मदत करते, जिव्हाताई गोड बोलते व पदार्थांची चव घेते असे असूनही पोटोबा मात्र केवळ आयते बसून खातात असे या सर्वांना वाटत होते. यामुळे, सर्व अवयव त्याच्या विरोधात उभे राहिले.

Concept: गद्य (8th Standard)
  Is there an error in this question or solution?
Advertisement Remove all ads

APPEARS IN

Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads
Share
Notifications

View all notifications


      Forgot password?
View in app×