स्वमत.
पाठातील विनोद निर्माण करणारी पाच वाक्ये शोधा. ती तुम्हांला का आवडली ते सकारण लिहा.
Solution
दंतकथा हा वसंत सबनीस यांचा बहारदार विनोदी लेख आहे. दातदुखी हा तसे पाहिले तर कारुण्यपूर्ण, वेदनादायक आणि गंभीर असा विषय. पण लेखकांनी नर्मविनोद, प्रसंगनिष्ठ विनोद, अतिशयोक्ती, कोट्या अशा अनेक साधनांच्या साहाय्याने अत्यंत प्रसन्न व वाचनीय असा लेख निर्माण केला आहे. त्यातली काही उदाहरणे आपण पाहू.
मराठी भाषेलाही दातांबद्दल आदर नाही; कारण मराठी भाषेत अशी म्हण किंवा शब्दप्रयोग नाही ज्यांत दातांबद्दल मंगल भावना व्यक्त झाली आहे. लेखकांची ही दोन वाक्ये पाहा. त्यांना दातदुखीचा खूपच त्रास झाला होता. यामुळे त्यांच्या मनात दातांबद्दल प्रेम नाही. किंबहुना काहीसा रागच आहे. हा राग व्यक्त करण्यासाठी त्यांनी मराठी भाषेचा किती चपखल उपयोग केला आहे पाहा. मराठी भाषेत दातांबद्दल मंगल भावना व्यक्त करणारी म्हण नाही. हे त्यांचे म्हणणे पहिल्यांदा वाचताना जरा गंमत वाटते. थोडे बारकाईने पाहिल्यावर, अनेक म्हणी आठवल्यावर लेखकांचे म्हणणे खरे असल्याचे लक्षात येते.
डोळे, रंग, ओठ, एखादा तीळ, एखादी खळी माणसाला गुंतवतात; पण दात पाहून वेडा झालेला प्रियकर मला अजून भेटायचा आहे. हेसुद्धा एक गमतीदार वास्तव आहे. लेखकांच्या सूक्ष्म निरीक्षणशक्तीचा येथे प्रत्यय येतो. दात पाहून वेडा झालेला प्रियकर हा उल्लेख नुसता वाचताक्षणी हसू आल्याशिवाय राहत नाही.
दातदुखीतल्या ठणक्याची तीव्रता सांगताना लेखकांनी दिलेले उदाहरण लक्षणीय आहे. ते लिहितात, "एखादा लाकूडतोड्या माझ्या दाताच्या मुळाशी खोल बसलेला असतो आणि तो एकामागून एक घाव घालीत असतो." हा दाखलासुद्धा अप्रतिम आहे. हे उदाहरण चमत्कृतीपूर्ण आहे. दातदुखीच्या वेदनेचा ठणका हे उदाहरण वाचतानाही आपण अनुभव.
लेखकांचे हे विनोद निर्मितीचे कौशल्य विलक्षणच आहे.