स्वमत:
बोर्डिंगात शिकत असलेल्या व शिकून गेलेल्या विद्यार्थ्यांचे बापू गुरुजींबद्दल असलेले प्रेम तुमच्या शब्दांत लिहा.
Solution
बोर्डिंगातल्या मुलांवर गुरुजींची खूप माया होती. त्याप्रमाणेच मुलांचेही ते खूप लाडके होते. त्यांच्या शब्दाला विद्यार्थ्यांच्या मनात खूप मान होता. त्यांचा शब्द ते कधी खाली पडू देत नसत. गुरुजींच्या मताप्रमाणे वागण्यासाठी सगळेजण धडपडत होते. गुरुजींचाही त्यांच्यावर जीव होता. रोज रात्री मुलांना कंदिलाच्या प्रकाशात घेऊन बसत. त्यांचा अभ्यास घेत; पहाटे उठूनही अभ्यास घेत, गुरुजींचा मुलगा वारला, तेव्हा मुले दुःखाच्या सागरात बुडून गेले.
सातवी पास झाल्यावर विद्यार्थी साहजिकच शाळा सोडत. काही शिकलेल्यांना बापूंनी अन्य गावच्या शाळांत शिक्षक पदावरची नोकरी मिळवून दिली होती. आपली उदरनिर्वाहाची सोय झाली, तरी विद्यार्थी गुरुजींना विसरले नाहीत. गुरुपौर्णिमेच्या दिवशी ते आठवणीने गुरुजींना भेटत. श्रीफळ देऊन त्यांच्या पाया पडत. त्यांचा आशीर्वाद घेत. आपापल्या गावी जात. त्यांच्या गावी गुरुजींनी यावे, असा ते आग्रही करीत. अशा प्रकारे आजीमाजी सर्व विद्यार्थ्यांचा गुरुजींवर जीव होता.