खाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे सविस्तर उत्तरे लिहा.
माहितीचा अधिकार अधिनियमाची माहिती लिहा.
(अ) भारतात ही चळवळ कशी सुरू झाली?
(ब) माहिती व्याख्या
(क) माहितीचा अधिकार या अंतर्गत नागरिकांचे हक्क
Solution
केंद्र शासनाने २००५ मध्ये देशात 'माहितीचा अधिकार कायदा' लागू केला. या कायद्याची माहिती -
(अ) भारतात ही चळवळ कशी सुरू झाली?
(१) जयपूर शहरातील अस्वच्छतेच्या संदर्भात ए. के. कुलवाल यांनी केलेल्या अर्जावर राजस्थान उच्च न्यायालयाने माहितीचा अधिकार हा नागरिकांचा मूलभूत अधिकार असल्याचे स्पष्ट केले.
(२) १९९० मध्ये श्रीमती अरुणा रॉय यांनी राजस्थानमध्ये सुरू केलेल्या चळवळीत माहिती अधिकाराची गरज व्यक्त केली.
(३) हर्ष मंडर यांनी १९९६ मध्ये 'अन्नधान्य वितरण व्यवस्था व रोजगार विनिमय' यांबाबतची माहिती उघड करण्याचे धाडस दाखवले.
(४) महाराष्ट्रात अण्णा हजारे यांनी माहितीच्या अधिकारासाठी २००१ मध्ये तीव्र आंदोलन केले.
(५) या चळवळीमुळे केंद्र शासनाचा माहिती अधिकार महाराष्ट्रात लागू झाला.
(ब) माहिती व्याख्या :
माहितीचा अधिकार या कायद्यानुसार माहितीच्या अर्थ व व्याख्येत पुढील बाबींचा समावेश होता -
(१) शासनाचे दस्तावेज, ज्ञापने, ई-मेल, प्रसिद्धीपत्रके व परिपत्रके.
(२) शासनाचे अहवाल, आदेश, पत्रव्यवहार, निविदा, रोजवह्या.
(३) इलेक्ट्रॉनिक स्वरूपात साठवलेली आधार सामग्री.
(४) सार्वजनिक प्राधिकरणे, खाजगी संस्था व त्यात काम करणाऱ्या व्यक्ती विषयी माहिती.
(क) माहितीचा अधिकार या अंतर्गत नागरिकांचे हक्क :
(१) शासनाच्या, संस्थांच्या कामांची, दस्तऐवजांची वा अभिलेखांची पाहणी करणे.
(२) या दस्तावेजांच्या किंवा अभिलेखांच्या अधिकृत प्रती मिळवणे.
(३) या संस्थांनी काढलेली टिपणे, उतारे, प्रमाणित नमुने, सीडी, फ्लॉपी, टेप, व्हिडिओ कॅसेट अशा स्वरूपात किंवा संगणकीय माहिती मिळवण्याचा हक्क.