सर्व चित्रे पाहा व गोष्ट सांगा.
Solution
मैदानात मुले फुटबॉल खेळात असतात आणि तिकडे तीन ससे लांबून त्यांचा खेळ पाहत असतात.
मुले निघून गेल्यावर ससे फुटबॉल खेळू लागले.
खेळता खेळता फुटबॉल एका खड्ड्यात पडला. आता काय करावे, ते सशांना कळेना!
आता काय करावे, ते सशांना कळेना! मग सशांना एक लाकडाची फळी मिळाली. त्यांनी ती लाकडी फळी खड्ड्यात घालून बॉल काढण्याचा प्रयत्न केला.
त्यांचा प्रयत्न चालू होता तर एका हत्तीने हे सगळं बघितलं तो तिथे एक गेला. त्याने सोंडेने पाणी आणले आणि सोंडेंतले पाणी खड्ड्यात ओतले. ससे हे सगळं आश्चर्याने बघत होते.
खड्डा पाण्याने भरला. खड्डा पाण्याने भरल्यामुळे फुटबॉल पाण्यावर तरंगायला लागला. सशांना फुटबॉल मिळाला. सश्यांनी तो फुटबॉल अलगद उचलला. त्यांना खूप आनंद झाला. हत्तीच्या प्रयत्नांमुळे फुटबॉल त्यांना मिळाला म्हणून त्यांनी हत्तीचे आभार मानले. तर या गोष्टीतून आपण काय शिकलो की नेहमी लोकांची मदत केली पाहिजे.