सर सय्यद अहमदखान यांनी केलेले कार्य लिहा.
Solution
एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात भारतीय समाज प्रबोधन चालू होते. अनेक समाजसुधारक सामाजिक-धार्मिक सुधारणा करण्याचे कार्य करीत होते. मुस्लीम समाजातही सर सय्यद अहमद खान यांनी सामाजिक सुधारणेचे पुढील कार्य केले -
(१) त्यांनी १८६४ मध्ये मुस्लिमांसाठी 'सायंटिफिक सोसायटी' स्थापन केली.
(२) या संस्थेमार्फत इतिहास, विज्ञान व राजकीय अर्थशास्त्र या विषयांचा अभ्यास केला जात असे. त्यांनी मुस्लीम समाजाला या विषयांची ओळख करून दिली.
(३) १८७५ मध्ये अहमद खान यांनी 'मुहम्मदन अँग्लो ओरिएन्टल कॉलेज'ची स्थापना केली. पुढे या कॉलेजचे रूपांतर 'अलिगढ मुस्लीम युनिव्हर्सिटी' मध्ये झाले. या शैक्षणिक संस्थेमुळे मुस्लिमांमध्ये शिक्षणाची ओढ लागली. मुस्लीम मुले-मुली उच्च शिक्षण घेऊ लागली.
(४) अहमद खान यांनी 'मोहम्मदन सोशल रिफॉर्मर' या नावाचे नियतकालिक काढून त्याद्वारे आधुनिक विचार मुस्लीम समाजात रुजवले.
(५) अहमदखान यांनी आपल्या ग्रंथातून, नियतकालिकातून आणि शैक्षणिक संस्थांतून आधुनिक शिक्षण, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा पुरस्कार केला.
(६) अबुल फैज याने सम्राट अकबराच्या प्रशासन पद्धतीवर लिहिलेल्या 'आइन-ए-अकबरी' या ग्रंथाचे त्यांनी संपादन केले.