खाली दिलेल्या कथेचा उत्तरार्ध लिहा.
रमणलाल नावाच्या व्यापाऱ्याला तीन मुले होती. व्यापाराचा चांगला जम असल्यामुळे रमणलालची परिस्थिती अतिशय उत्तम होती. मुलांमध्ये मात्र नेहमी वाद-विवाद आणि भांडणं होत त्याला तो कंटाळला. त्याने एका मित्राच्या सल्ल्यानुसार त्याने आपल्या मुलांना जवळ बोलावून सांगितले की, माझं आता वय झाल्यामुळे यापुढे व्यापार तुम्ही बघावा. पण आधी मी तुमची परीक्षा घेईन त्यात जो पास होईल त्याच्या हातात मी व्यापार देईल. त्याने तिघा मुलांना सारखे पैसे वाटले आणि...
Solution
जीवन: एक परीक्षा |
रमणलाल नावाच्या व्यापाऱ्याला तीन मुले होती. व्यापाराचा चांगला जम असल्यामुळे रमणलालची परिस्थिती अतिशय उत्तम होती. मुलांमध्ये मात्र नेहमी वाद-विवाद आणि भांडणं होत त्याला तो कंटाळला. त्याने एका मित्राच्या सल्ल्यानुसार त्याने आपल्या मुलांना जवळ बोलावून सांगितले की, माझं आता वय झाल्यामुळे यापुढे व्यापार तुम्ही बघावा. पण आधी मी तुमची परीक्षा घेईन त्यात जो पास होईल त्याच्या हातात मी व्यापार देईल. त्याने तिघा मुलांना सारखे पैसे वाटले आणि म्हणाला, “आपल्या वाड्याच्या पश्चिमेकडे तीन खोल्या आहेत. मी तुम्हांला दिलेल्या पैशांतून तुम्ही आज संध्याकाळपर्यंत आपापली खोली कशानंही पूर्ण भरून दाखवायची.” व्यापाराची जबाबदारी घेण्याकरता उत्सुक असलेल्या मुलांना ही परीक्षा क्षुल्लक वाटली. तिन्ही मुलांनी आपापले पैसे घेतले व ते निघून गेले. रमणलालचा मोठा मुलगा खूप खादाड होता. त्याला खाण्याची हौस होती. त्याने पैसे मिळताच हॉटेल गाठले. चमचमीत पदार्थ, मिठाई खाऊन तृप्त मनाने तो घरी आला. त्याला एवढे सारे पदार्थ खाऊन झोप येत होती. घरी येऊन त्याने पलंगावर अंग टाकले आणि तो झोपी गेला. रमणलालचा दुसरा मुलगा विचार करत बसला होता. खोली कशाने भरावी याचे उत्तर सापडत नव्हते. एवढ्यात त्याला रस्त्यावरून गवताचे भारे घेऊन जाणाऱ्या स्त्रिया दिसल्या. त्याने त्या स्त्रियांना थांबवले व त्यांच्याकडून गवत विकत घेऊन खोली गवताने भरू लागला; पण पैसे संपले तरीही खोलीचा निम्मा भाग मात्र रिकामाच राहिला. संध्याकाळ होताच रमणलालने फेरफटका मारून आपल्या मुलांनी काय केले हे पाहायचे ठरवले. तो बाहेर आला. पहिल्या मुलाच्या खोलीकडे गेला. खोलीत अंधार होता आणि मुलगा घोरत पडला होता. दुसऱ्या मुलाची खोली गवताने अर्धी भरलेली पाहून रमणलाल तेथून पुढे निघाला. त्याने तिसऱ्या मुलाच्या खोलीकडे मोर्चा वळवला. त्या खोलीतून मंद मंद सुगंध दरवळत होता. खोली स्वच्छ केलेली होती. देवाचा फोटो लावून त्यापुढे दिवा लावून रमणलालचा मुलगा भजन करत होता. भक्तिमय वातावरणाने, दिव्याच्या प्रकाशाने व सुगंधाने संपूर्ण खोली भरलेली होती. लगेच रमणलालने आपला निर्णय जाहिर केला, की मी माझा व्यापार तिसऱ्या मुलाला सांभाळाला देतो आहे. इतर दोघांनी त्याच्या सोबत राहून शिका आणि त्याला मदत करा. तात्पर्य: विचारपूर्वक कामे करुन कठीण कामेसुद्धा सहज होतात. |