पुढील विषयावर बातमी तयार करा.
जनता गर्ल्स हायस्कूल, शेंदूरजना घाट येथे “जागतिक महिला दिन” साजरा झाला. या कार्यक्रमाची बातमी तयार करा.
Solution
जनमत |
जनता गर्ल्स हायस्कूल येथे “जागतिक महिला दिन” उत्साहात साजरा दि. ९ मार्च २०२१ वार्ताहर, शेंदूरजना घाट: - तालुक्यातील जनता गर्ल्स हायस्कूल येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. स्वदेशी फाउंडेशनच्या फिल्ड ऑफिसर नम्रता शिर्के यांनी महिलांसाठीच्या शासकीय योजनांची माहिती दिली व घरगुती मिरची, आंब्याचे लोणचे बनवून त्याची बाजारात कशी विक्री करावी याचे मार्गदर्शन केले. यावेळी बचतगटाच्या ५० महिलांना प्रत्येकी २ किलो मशरूमचे बियाणे मोफत वाटप करण्यात आले. 'महिला सशक्तीकरण' या विषयावर जनता गर्ल्स हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी एक नाटिका सादर केली. या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे सभापती श्री. अक्षय देशमुख्, सदस्य स्नेहल पाटील, रमेश शिंद्रे आदी उपस्थित होते. जनता गर्ल्स हायस्कूलच्या विद्यार्थिनींसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यातील विजेत्या विद्यार्थिनींना पारितोषिके देऊन गौरवण्यात आले. हायस्कूलच्या मुख्याध्यापिका श्रीमती देशमुख यांनी 'नारी तु महान, विश्वाची आहेस शान.' अशी घोषणा देऊन साऱ्याचा उत्साह वाढवला. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात हा कार्यक्रम पार पडला. |