पुढील समारंभाची बातमी तयार करा.
शाळेच्या सुवर्णमहोत्सवाचा उद्घाटन समारंभ माननीय शिक्षणमंत्री यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
Solution
लोकराज्य |
जनता विद्यालयाचा सुवर्णमहोत्सव उद्घाटन समारंभ : मा. शिक्षणमंत्र्यांची उपस्थिती दि. २६ मार्च २०२१ वार्ताहर, मुंबई: येथील विजयनगर विभागातील जनता विद्यालयाचे २०२०-२१ हे सुवर्ण-महोत्सवी वर्ष असून त्याचा उद्घाटन समारंभ दि. २६ मार्च रोजी मा. शिक्षणमंत्री बबनराव शिंदे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. मा. शिक्षणमंत्री बबनराव शिंदे यांच्यासह या विभागाचे आमदार राजन देशमुख आणि शाळेचे अनेक माजी विद्यार्थी हजर होते. शाळेला ७५ वर्षे पूर्ण झाल्याने संपूर्ण वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन शाळेकडून केले गेले आहे, याची माहितीपुस्तिका या प्रसंगी प्रकाशित केली गेली. शाळेतील माजी विद्यार्थ्यांनी उद्घाटन प्रसंगी म्हटलेले स्वागतगीत हे कार्यक्रमाचे खास आकर्षण ठरले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध कार्यक्रमांनी उपस्थितांची वाहवा मिळवली. माननीय शिक्षणमंत्र्यांनी आपल्या भाषणात शाळेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाबद्दल सर्वांचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. मुख्याध्यापक श्री. शिर्के सर यांनी साऱ्या निमंत्रित पाहुण्यांचे, आजी-माजी विद्यार्थ्यांचे आभार मानले आणि वर्षभर हा महोत्सव सुरू राहणार असून त्यात साऱ्याचा सहभाग हवा असे आवाहन केले. |