पुढील शीर्षकावरून बातमी तयार करा.
बालिका दिननिमित्त, “बेटी बचाओ! बेटी पढाओ!” या उपक्रमास जिल्ह्यातील अनेक शाळांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद.
Solution
सामना |
'बालिका दिन' जिल्ह्यातील शाळांचा उत्स्फूर्त प्रतिसाद वार्ताहर, विक्रोळी (१२ ऑक्टोबर): जगभरात ११ ऑक्टोबरला साजरा केल्या जाणाऱ्या 'आंतरराष्ट्रीय बालिका दिनाच्या' निमित्ताने विक्रोळी जिल्हा परिषदेने 'बेटी बचाओ! बेटी पढाओ!' या उपक्रमाचे आयोजन केले होते. जिल्हा परिषद इमारतीमध्ये विविध स्पर्धांची योजना आखण्यात आली होती. जिल्ह्यातील शासकीय व खाजगी अशा जवळपास तिनशे शाळांनी या कार्यक्रमामध्ये आनंदाने सहभाग नोदविला. वक्तृत्व स्पर्धा, निबंधलेखन, कराटे स्पर्धा अशा अनेक स्पर्धांमध्ये जिल्ह्यातील शाळांनी सहभाग घेतला होता. 'बेटी बचाओ! बेटी पढाओ!' या एकमेव विषयावर या साऱ्या स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ जिल्हापरिषद अध्यक्ष श्री. विश्वनाथ केंद्रे यांच्या हस्ते संपन्न झाला. 'मुलगी शिकली तर प्रगती झाली' असे म्हणून मुली ह्याच देशाच्या प्रगतीचे कारण बनतील असे विचार त्यांनी आपल्या भाषणात मांडले. |