Advertisement Remove all ads

पुढील कवितेच्या त्याखाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा. 'अंकिला मी दास तुझा' गुण (०८) मुद्दे: १. प्रस्तुत कवितेचे कवी/ कवयित्री- (०१) २. प्रस्तुत कवितेचा विषय- (०१) - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads
Long Answer

पुढील कवितेच्या त्याखाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा.

'अंकिला मी दास तुझा' गुण (०८)

मुद्दे:

१. प्रस्तुत कवितेचे कवी/ कवयित्री- (०१)

२. प्रस्तुत कवितेचा विषय- (०१)

३. कवितेतील दिलेल्या ओळींचा सरळ अर्थ लिहा- (०२)

'सवेंची झेपावे पक्षिणी। पिल्ली पडतांची धरणी।।'

४. प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण- (०२)

५. प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश- (०२)

६. प्रस्तुत शब्दांचा अर्थ- (०२)

१. अंकिला -

२. माता -

३. दास -

४. मेघ -

Advertisement Remove all ads

Solution

१. कवी - संत नामदेव

२. कवितेचा विषय - परमेश्वर भेटीची तीव्र इच्छा

३. पिल्ले जमिनीवर कोसळताच पक्षीण लगेच तेथे झेप घेते.

४. 'अंकिला मी दास तुझा' हा अभंग मला फार आवडतो, कारण अभंगाची भाषा साधी-सरळ आहे. अत्यंत मोजक्या शब्दांत विविध दृष्टान्त (उदाहरणे) देऊन नामदेवांनी आपला उत्कट भाव कवितेत व्यक्त केला आहे. छोटे छोटे चरण (ओळी) वापरून नेमका अर्थ आपल्यापर्यंत पोहोचवला आहे. अभंगात 'बिंदूमध्ये सिंधू' म्हणजेच कमी शब्दांत खूप अर्थ व्यक्त करण्याची शक्ती आहे, हे या अभंगातून दिसून येते. ही संतकविता गाता येते. तसेच, ती वाचनीय, श्रवणीय असल्यामुळे मला फार आवडते.

५. प्रस्तुत अभंगातून संत नामदेव परमेश्वराला आई मानून त्याने त्याच्या मुलाप्रमाणे आपला सांभाळ करावा अशी आळवणी करतात. मूल ज्याप्रमाणे आपल्या आईवर पूर्णपणे अवलंबून असते त्याप्रमाणे आपणही परमेश्वरचरणी पूर्णपणे लीन व्हावे. यामुळे, परमेश्वर आपल्या भेटीसाठी आतुरतेने धाव घेईल असा विश्वास ते या अभंगातून व्यक्त करतात.

६. 

१. अंकित झालेला

२. आई, जननी

३. सेवक

४. ढग

Concept: पद्य (10th Standard)
  Is there an error in this question or solution?
Advertisement Remove all ads

APPEARS IN

SCERT Maharashtra Question Bank 10th Standard SSC Marathi Second Language Maharashtra State Board 2021
Chapter 2.1 संतवाणी (अ) अंकिला मी दास तुझा
स्वाध्याय | Q २. आ.
Advertisement Remove all ads
Share
Notifications

View all notifications


      Forgot password?
View in app×