पुढील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
१) कोष्टक पूर्ण करा. (२)
श्रोतीं व्हावें सावधान। आतां सांगतों उत्तम गुण। वाट पुसल्याविण जाऊं नये। फळ ओळखिल्याविण खाऊं नये। जनीं आर्जव तोडूं नये। पापद्रव्य जोडूं नये। तोंडाळासीं भांडों नये। वाचाळासीं तंडों नये। आळसें सुख मानूं नये। चाहाडी मनास आणूं नये। सभेमध्यें लाजों नये। बाष्कळपणें बोलों नये। कोणाचा उपकार घेऊं नये। घेतला तरी राखों नये। व्यापकपण सांडूं नये। पराधेन होऊं नये। सत्यमार्ग सांडूं नये। असत्य पंथें जाऊं नये। अपकीर्ति ते सांडावी। सत्कीर्ति वाडवावी। |
२) खालील गोष्टींबाबत कोणती दक्षता घ्यावी ते लिहा. (२)
क्र. | गोष्टी | उत्तर | दक्षता |
i. | आळस | ______ | मानू नये. |
ii. | परपीडा | ______ | वागू नये. |
iii. | सत्यमार्ग | ______ | नये. |
iv. | सभेतील वर्तन | ______ | नये. |
३) खालील काव्यपंक्तींचा सरळ अर्थ लिहा. (२)
सत्यमार्ग सांडूं नये। असत्य पंथें जाऊं नये।
कदा अभिमान घेऊं नये। असत्याचा।
४) खालील काव्यपंक्तींतील विचारसाैंदर्य स्पष्ट करा. (२)
तोंडाळासी भांडो नये। वाचाळासीं तंडों नये।
संतसंग खंडूं नये। अंतर्यामीं।
Solution
१)
२)
क्र. | गोष्टी | उत्तर | दक्षता |
i. | आळस | सुख | मानू नये. |
ii. | परपीडा | विश्वासघातकी | वागू नये. |
iii. | सत्यमार्ग | सोडू | नये. |
iv. | सभेतील वर्तन | लाजू | नये. |
३) सत्याचा मार्ग कधीही सोडू नये, असत्याच्या वाटेवर कधीही जाऊ नये व खोटेपणाचा अभिमानही कधी बाळगू नये.
४) 'उत्तमलक्षण' या श्रीदासबोधातील उपदेशपर रचनेतून संत रामदासांनी आदर्श व्यक्तीची लक्षणे सांगतिली आहेत. तिने कोणत्या गोष्टी कराव्यात व कोणत्या गोष्टी टाळाव्यात याचा खुलासा केला आहे.
भांडखोर व्यक्तीशी भांडायला जाऊ नये. सतत बडबड करणाऱ्या व्यक्तीशी वाद घालत बसू नये, कारण या दोन्ही प्रकारच्या व्यक्ती समोरच्याचे बोलणे ऐकून न घेता स्वत:चेच म्हणणे खरे करणाऱ्यांपैकी असतात. त्यांच्याशी बोलणे म्हणजे आपला वेळ, आपली शक्ती वाया घालवल्यासारखे होईल. त्यामुळे, अशांचा संगच टाळावा; परंतु संतांच्या संगतीत अखंड रमावे. मनापासून त्यांच्या सहवासाचा, सान्निध्याचा लाभ घ्यावा, कारण त्यांच्या संगतीत राहून आपणही सज्जन बनतो, असा संदेश वरील काव्यपंक्तींतून कवी व्यक्त करतात.