Advertisement Remove all ads

पुढील काव्यपंक्तीचे रसग्रहण करा. 'झरा लागेलच तिथे खोद आणखी जरासेउमेदीने जगण्याला बळ लागते थोडेसे!' - Marathi [मराठी]

Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads
Answer in Brief

पुढील काव्यपंक्तीचे रसग्रहण करा.

'झरा लागेलच तिथे खोद आणखी जरासे
उमेदीने जगण्याला बळ लागते थोडेसे!'

Advertisement Remove all ads

Solution

'खोद आणखी थोडेसे' या कवितेतून कवयित्री आसावरी काकडे जीवनात नेहमी आशावादी राहिले पाहिजे असा विचार मांडतात. ध्येयपूर्तीसाठी संयम, जिद्द, चिकाटी व आत्मविश्वास अंगी बाणून उमेदीने कष्ट करत राहिले पाहिजे हा संदेश दिला आहे. प्रयत्नांची कास धरली पाहिजे हे सांगताना कवयित्री म्हणते, आपण कधीही उमेद न हारता प्रयत्न करत राहावे. 'खोद आणखी जरासे' या ओळीचा अर्थच आहे, की सतत प्रयत्न करत राहावे. जसे जमिनीत चिकाटीने खोलवर खोदत राहिले, की पाण्याचा झरा सापडतो. तसेच, प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवले व आशावाद सोडला नाही, तर आपण आपले ध्येय गाठू शकतो. आपण जिथे थांबतो, तिथून चिकाटीने आणखी थोडेसेच पुढे गेले, तर यश निश्चितच मिळते. उमेद ठेवून म्हणजेच आशावादी राहून जगणे हे मानवास यशाच्या जवळ नेऊन पोहोचवते. अशाप्रकारे, जगण्याकरता थोड्याशा आत्मबळाची आवश्यकता असते, असा अर्थ यातून सूचित होतो.
          प्रस्तुत कविता अष्टाक्षरी छंदात असून अल्पाक्षरत्व हे या कवितेचे वैशिष्ट्य आहे. कवयित्रीने येथे कमीत कमी शब्दांतून अर्थगर्भ आशय व्यक्त केला आहे. 'झरा' या अतिशय सूचक व आशयघन प्रतीकातून कवयित्रीने आशावादी विचार मांडलेला आहे. चिकाटी, जिद्द, आशावाद ही मूल्ये सूचित करण्यासाठी 'आणखी जरासे' या शब्दाचा चपखलपणे वापर केला आहे. 'जरासे', 'थोडेसे' असे शब्द वापरून यमकाची सुंदर योजना केली आहे. त्यामुळे, ओळींना नादमयता प्राप्त झाली आहे.
          छोट्या छोट्या काव्यपंक्तींमुळे कवितेत एक आंतरिक लय निर्माण झााली आहे. यामुळे, ही कविता नादमधुर वाटते. या कवितेतून सकारात्मकतेची व आशावादाची रुजवणूक होते.

Concept: पद्य [इयत्ता १० वी]
  Is there an error in this question or solution?
Advertisement Remove all ads

APPEARS IN

SCERT Maharashtra Question Bank 10th Standard SSC Marathi Maharashtra State Board 2021 [मराठी इयत्ता १० वी]
Chapter 15.1 खोद आणखी थोडेस
कृती क्रमांक २ | Q 2. (इ)
Advertisement Remove all ads
Share
Notifications

View all notifications


      Forgot password?
View in app×