पुढील घटनेवर आधारित बातमी तयार करा.
कोरोना आला नी _____ गाव स्वच्छ झाले.
Solution
नवे राज्य |
कोरोना आला नी 'माणगांव' गाव स्वच्छ झाले. “कोरोनाची एक सकारात्मक बाजू” दि. १२ एप्रिल २०२१ वार्ताहर, माणगांव-रत्नागिरी: महाराष्ट्र सरकारने कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी लॉकडाऊन जाहिर केल्यानंतर सगळया व्यवस्था ढासाळून गेल्या. सर्वांत मोठा प्रश्न कचऱ्याची विल्हेवाट कशी लावणार हा निर्माण झाला होता. माणगांव गावात कचरा साफसफाईकडे नेहमीच दुर्लक्ष होत होते. त्यातच कचरा सफाई कर्मचाऱ्यांनी कोरोना काळात काम करण्यास नकार दिल्यामुळे माणगांवमधील कचरा समस्या गंभीर बनली होती. संपूर्ण गावात कचऱ्याचे आणि दुर्गंधीचे साम्रज्य पसरले होते. गावातील काही तरुण मंडळींनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गाव स्वच्छ करण्याचा निर्णय घेतला. सरपंच श्री. अंकुर शिर्के यांनी त्यांना उत्तम मार्गदर्शन केल्यामुळे संपूर्ण गाव पूर्णपणे स्वच्छ केले गेले. नागरिकांची साथ असेल, तर आपण कोणतेही काम सहज पूर्ण करू शकतो याची प्रचिती संपूर्ण गावाला आली. तसेच, केवळ कोरोनाच्या भितीने नव्हे, तर नेहमीच गाव स्वच्छ असायला हवे असे सरपंचांनी आपल्या भाषणात म्हटले. आपल्या या कार्याने गावाने सर्वांसमोर आदर्श निर्माण केला आहे. |