Advertisement Remove all ads

पुढील 'औक्षण' कवितेच्या खाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा. गुण (०८) मुद्दे: १. प्रस्तुत कवितेचे कवी/ कवयित्री- (०१) २. प्रस्तुत कवितेचा विषय- (०१) ३. कवितेतील दिलेल्या ओळीचा सरळ अर्थ लिहा - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads
Long Answer

खाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा. गुण (०८)

नाही मुठीमधे द्रव्य

नाही शिरेमध्ये रक्त,

काय करावें कळेना

नाही कष्टाचे सामर्थ्य;

जीव ओवाळावा तरी

जीव किती हा लहान;

तुझ्या शौर्यगाथेपुढे

त्याची केवढीशी शान;

वर घोंघावे बंबारा,

पुढे कल्लोळ धुराचे,

धडाडत्या तोफांतून

तुझें पाऊल जिद्दीचें;

तुझी विजयाची दौड

डोळे भरून पहावी;

डोळयांतील आसवांची

ज्योत ज्योत पाजळावी

अशा असंख्य ज्योतींची

तुझ्यामागून राखण;

दीनदुबळयांचे असें

तुला एकच औक्षण. 

मुद्दे:

१. प्रस्तुत कवितेचे कवी/ कवयित्री- (०१)

२. प्रस्तुत कवितेचा विषय- (०१)

३. कवितेतील दिलेल्या ओळीचा सरळ अर्थ लिहा. (०२)

‘जीव ओवाळावा तरी, जीव किती हा लहान

तुऱ्या शौर्यगाथे पुढे, त्याची केवढीशी शान;’

४. कवितेत आलेल्या शब्दांचे अर्थ लिहा- (०२)

१. द्रव्य २. शिर ३. रक्त ४. आसवं

५. प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण- (०२)

Advertisement Remove all ads

Solution

१. कवयित्री - इंदिरा संत

२. कवितेचा विषय - सीमेवर लढायला जाण्यासाठी सुसज्ज झालेल्या जवानाविषयी साऱ्या देशवासियांच्या मनात दाटून येणाऱ्या विविध भावभावनांचे चित्रण.

३. तुझ्यावरून जीव ओवाळून टाकावा अशी मनाशी इच्छा धरली तरी माझा जीव किती लहान आहे! क्षुद्र आहे! तुझ्या शौर्याच्या, पराक्रमांच्या महानतेपुढे माझ्या जिवाची तुलनाच होऊ शकत नाही.

४.

१. धन, पैसा, संपत्ती

२. डोके, मस्तक

३. रुधिर

४. अश्रू

५. कमीत कमी शब्दांत कवयित्री सैनिकांप्रतीच्या उत्कट भावना सहजपणे आपल्यापर्यंत पोहोचवते. युद्धभूमीवरील चित्र आपल्या डोळयांसमोर जिवंतपणे साकार करते. साधी, सोपी भाषा वापरल्यामुळे कवितेचे सहजपणे आकलन होते. सर्व देशवासियांची प्रतिनिधी बनून सैनिकाचे औक्षण करण्याची कवयित्रीची कल्पनादेखील सुंदर आहे. तसेच, डोळयांना निरांजनाची तर अश्रूंना निरांजनातील ज्योतीची दिलेली उपमा मनाला भावते. यमक, अनुप्रास अलंकारांचा सुयोग्य वापर केल्यामुळे कविता लगेच तोंडपाठ होते. या सर्व गोष्टींमुळे मला ही कविता खूपच आवडते.

Concept: पद्य (10th Standard)
  Is there an error in this question or solution?
Advertisement Remove all ads

APPEARS IN

Advertisement Remove all ads
Share
Notifications

View all notifications


      Forgot password?
View in app×