Advertisement Remove all ads

पर्यावरण चळवळीचे कार्य स्पष्ट करा. - History and Civics [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads
Answer in Brief

पर्यावरण चळवळीचे कार्य स्पष्ट करा.

Advertisement Remove all ads

Solution

  1. आजच्या काळात पर्यावरणीय र्हास ही एक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर गंभीर समस्या असल्याने हा र्हास रोखण्यासाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध चळवळी सक्रीय आहेत. पर्यावरणाचा ऱ्हास ही केवळ भारताचीच नव्हे तर जागतिक समस्या बनली आहे.
  2. पर्यावरणाचा ऱ्हास थांबवावा आणि शाश्वत विकासाकडे जगाची वाटचाल व्हावी यासाठी पॅरिस, रिओ अशा ठिकाणी जागतिक पर्यावरण परिषदा घेतल्या गेल्या.
  3. भारतातही पर्यावरणातील विविध घटकांच्या सुधारणेसाठी अनेक चळवळी सक्रीय आहेत. भारतात जैवविविधतेचे संरक्षण, पाण्याच्या विविध स्रोतांचे जतन, जंगल आवरण, नद्यांचे प्रदूषण, हरितपट्ट्यांचे संरक्षण, रासायनिक द्रव्यांचा वापर व त्यांचे दुष्परिणाम इत्यादी विषयांना प्राधान्य देऊन विविध चळवळी संघर्ष करत आहेत.
  4. 'चिपको' सारखे वृक्षसंवर्धन व संरक्षणासाठीचे आंदोलन, 'नमामि गंगे' सारखे गंगा नदी शुद्धीकरण आंदोलन, हरितक्रांती, जैवविविधतेचे संरक्षण यांसारख्या अनेक आंदोलनांनी व चळवळींनी पर्यावरण रक्षणाचे फार मोठे कार्य केले आहे.
    उदा. भारताचे जलपुरुष म्हणून ओळखले जाणारे डॉ. राजेंद्रसिंह राणा यांनी 'तरुण भारत संघा'ची स्थापना केली व राजस्थानातील शेकडो गावांत सुमारे अकरा हजार जोहड निर्माण करून जलसंवर्धन मोहिम राबवली. 
Concept: भारतातील प्रमुख चळवळी
  Is there an error in this question or solution?
Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads
Share
Notifications

View all notifications


      Forgot password?
View in app×