Advertisement Remove all ads

पृथ्वीला वाचवण्यासाठी काय काय करावे असे कवयित्रीला वाटते. - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Answer in Brief

पृथ्वीला वाचवण्यासाठी काय काय करावे असे कवयित्रीला वाटते.

Advertisement Remove all ads

Solution

'रंग मजेचे रंग उद्याचे' या कवितेत कवयित्री अंजली कुलकर्णी यांनी आजच्या संगणकयुगातील मानवाने निसर्गाचा मनमुराद आनंद लुटावा, पर्यावरण संवर्धन करावे असा संदेश दिला आहे. जागतिकीकरणाच्या या काळात जगणाऱ्या माणसाने निसर्गाशी असलेला जिव्हाळ्याचा संबंध तोडू नये. यासाठी त्याने पर्यावरणाची जोपासना करावी तरच त्याला सुंदरशा निसर्गाचा खराखुरा आस्वाद घेता येईल असा विचार यात व्यक्त होतो.

काळ्या आईची म्हणजेच मातीची सेवा करायला हवी कारण या काळ्या आईच्या पोटातून उगवणाऱ्या अन्नावरच आपले पोषण होते. त्यामुळे, मातीत कष्टणाऱ्या कष्टकरी हातांना आधार देण्याची गरज आहे.

वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. निसर्गातील जलचक्र बिघडत आहे. हे रोखण्यासाठी प्रत्येकाने डोंगरउतारावर, मोकळ्या जागी बिया फेकल्या पाहिजेत. पावसाळ्यात या बिया जमिनीत रुजतील, त्यातून झाडे निर्माण होतील. या झाडांमुळे राने वाढतील. परिणामी, पाऊस पुरेसा पडू लागेल. उघडेबोडके डोंगर पुन्हा हिरव्यागार गालिच्याने सजतील. अशा निसर्गसुंदर वातावरणात राहिल्यावर मानवालाही निसर्गाचा खराखुरा आस्वाद घेता येईल आणि पृथ्वीवरील निसर्गसृष्टीचे पर्यायाने येथील पर्यावरणाचे संवर्धन होईल, असे कवयित्रीला वाटते.

Concept: पद्य (10th Standard)
  Is there an error in this question or solution?
Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads
Share
Notifications

View all notifications


      Forgot password?
View in app×