उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
1. कृती करा. (२)
१.
महर्षी कर्वे यांची उताऱ्यात आलेली गुणवैशिष्ट्ये | _____________________ |
_____________________ |
पंडिता रमाबाई यांचे जीवनचरित्र आणि ईश्वरचंद्र विद्यासागर यांचे जीवनकार्य यांतून महर्षी कर्वे यांना हुरूप मिळाला. ईश्वरचंद्रांनी पोथ्यांचा पिट्ट्या पाडून विधवाविवाह होऊ शकतो, हे दाखवून दिले. स्वत: विधवेशी विवाह करून कर्व्यांनी त्याचा वस्तुपाठ घालून दिला. सुरुवात त्यांनी स्वत:पासून केली, म्हणून त्यांना बोलायची कोणास सोय उरली नाही. प्रा. धोंडो केशव कर्वे हे कॉलेजात गणित शिकवत. विद्वत्तेचा ते महामेरू होते. त्यामुळे त्यांच्याशी वाद घालायला कोणी धजले नाही. केवळ 'सत्पुरुषांचा छळ करावा', एवढेच 'ऐतिहासिक कार्य' तेव्हाच्या अज्ञ समाजाने केले. या समाजाबद्दल महर्षी अण्णासाहेब कर्वे अर्थातच क्षमाशील होते. त्यांना छळवादी समाजवृत्तीचा आधीपासूनच अंदाज होता. समाजाने केलेल्या धक्काबुक्कीत अण्णासाहेबांचे कपडे फाटत. रोज त्यांना आपला शर्ट नाही तर कोट, जिथे फाटला तिथे, शिवून घ्यावा लागत असे. फाटके कपडे ते वापरत नसत. गावातील सुशिक्षित समजल्या गेलेल्या लोकांनी ससेहोलपट चालवली तरी कर्व्यांनी ना त्यांना शिव्याशाप दिले ना आपल्या कार्यातून कर्वे विचलित झाले. जसे, संत ज्ञानेश्वरांचाही छळ झाला |
2. (१) योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा. (१)
1. अज्ञ समाजाचे ऐतिहासिक कार्य ____________
अ) सत्पुरुषांचा विरोध करणे.
ब) सत्पुरुषांचा सन्मान करणे.
क) सत्पुरुषांचा छळ करणे.
ड) सत्पुरुषांकडे पाठ फिरवणे.
(२) 'गणित' हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा. (१)
3. स्वमत. (३)
'कर्व्यांचे आचरण ज्ञानेश्वरांच्या कवितेसारखेच राहिले' या ओळीचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.
Solution
१.
महर्षी कर्वे यांची उताऱ्यात आलेली गुणवैशिष्ट्ये | क्षमाशील |
विद्वत्तेचा महामेरू |
2. (१)
1. अज्ञ समाजाचे ऐतिहासिक कार्य सत्पुरुषांचा छळ करणे.
(२) महर्षी कर्वे कॉलेजात कोणता विषय शिकवत?
3. संत ज्ञानेश्वर व त्यांच्या भावंडांना समाजाकडून अनेक प्रकारे त्रास दिला गेला. संत ज्ञानेश्वरांनी जे साहित्य लिहिले त्यात मात्र त्यांच्यावर झालेला अन्याय किंवा त्यांनी भोगलेले दु:ख आपल्याला दिसत नाही. त्यांच्या कवितेतून मानवी कल्याणाची आस दिसून येते. महर्षी कर्वे यांना देखील समाजाने खूप त्रास दिला. त्यांचा छळ केला गेला; मात्र क्षमाशील वृत्तीच्या महर्षी कर्वे यांनी हाती घेतलेला समाजाला शहाणे करण्याचा वसा सोडला नाही. त्रास देणाऱ्या लोकांना उलट शिव्याशाप न देता आपले कार्य तटस्थपणे पूर्ण करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. म्हणूनच त्यांच्या आचरणाला ज्ञानेश्वरांच्या कवितेची उपमा दिली आहे आणि ती उचित आहे.