पत्रलेखन:- पुढील निवेदन वाचा व त्याखालील कोणतीही एक कृती सोडवा.
Solution
मागणी पत्र – (औपचारिक)
दिनांक: २ एप्रिल २०२१ प्रति, माननीय श्री. विश्वनाथ चाफेकर व्यवस्थापक- मातृसेवा पुस्तकालय, नेताजी सुभाषचंद्र मार्ग, ता.जि. लातूर ४०००१६ विषय: 'पुस्तकांच्या मागणीबाबत.' महोदय, सर्वप्रथम, मातृसेवा पुस्तकालयाच्या वर्धापन दिनानिमित्त आपणा सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा! मी कुमारी नम्रता एक रसिक वाचक या नात्याने आपल्या मातृसेवा पुस्तकालयातून माझ्या आवडीची काही पुस्तके मागवू इच्छिते. पुस्तकांची यादी सोबत जोडत आहे. तरी ही सर्व पुस्तके लवकरात लवकर दिलेल्या पत्त्यावर पोहोचवल्यास आनंद होईल. सोबत बिलही पाठवावे म्हणजे बिलाची रक्कम घरपोच सेवा उपलब्ध झाल्यावर त्वरित देता येईल. आपण या पुस्तकांवर योग्य ती सवलत द्याल असा विश्वास आहे. पुस्तकांची यादी पुढीलप्रमाणे:
कृपया, पुस्तके लवकरात लवकर पाठवावीत ही नम्र विनंती. कळावे, आपली विश्वासू, नम्रता बी-४०१, श्रीगणेश अपार्टमेंट, वझिरानाका, महात्मा गांधीनगर, लातूर ४०००६१ |
किंवा
विनंती पत्र – (औपचारिक)
दिनांक: ३ एप्रिल २०२१ प्रति, माननीय श्री. यदुनाथ चाफेकर व्यवस्थापक- मातृसेवा पुस्तकालय, नेताजी सुभाषचंद्र मार्ग, ता.जि. लातूर ४०००१ विषय: अधिक सवलत देण्याविषयी. महोदय, मी स्नेहल ज्ञानप्रबोधिनी हायस्कूल, लातूर या शाळेची शालेय ग्रंथालय प्रतिनिधी या नात्याने आपणांस हे पत्र लिहीत आहे. दिनांक २ एप्रिल रोजी आमच्या शाळेने आपल्या पुस्तकालयातून सुमारे ३०० वेगवेगळया पुस्तकांचा संच खरेदी केला आहे. ही सर्व पुस्तके सर्व विद्यार्थ्यांकरता शाळेच्या ग्रंथालयातर्फे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या २०% सवलतीशिवाय अधिकची सवलत दिल्यास उरलेल्या रकमेतून शालेय ग्रंथालयासाठी आणखी काही पुस्तके घेण्याची आमची इच्छा आहे. त्यामुळे, या खरेदीवर आपण सवलत द्यावी अशी मी आपणांस नम्र विनंती करते. कृपया, सवलती संदर्भात विचार करून लवकरात लवकर उत्तर कळवावे ही विनंती. कळावे, आपली कृपाभिलाषी, स्नेहल शालेय ग्रंथालय प्रतिनिधी, ज्ञानप्रबोधिनी हायस्कूल घनश्यामनगर, लातूर ४०००१ |