खाली दिलेल्या कथेचा उत्तरार्ध लिहा.
नंदुरबारच्या खर्डी या आदिवासी गावात रिंकी नावाची मुलगी दगड-मातीतून धावायची. सात भावंडांमध्ये पाचव्या नंबरची मुलगी होती. घरी कोरडवाहू शेती होती. त्यामुळे, तिच्या आई-वडिलांना इतरांच्या शेतात काम करणे व उन्हाळयाच्या दिवसात मजुरीसाठी गावाबाहेर पडावे लागायचे. सर्व भावंडे मात्र घरीच असायची. यातच मोठ्या भावाला पळण्याचे वेड असल्याने तो पळण्यात तरबेज झाला. पुढे जाऊन त्याने स्पर्धेत भाग घेतला. या धावण्याच्या वेडामुळेच पुढे जाऊन त्याला वनरक्षक होण्याचं भाग्य लाभलं. त्याच्यापासून प्रेरणा घेऊन रिंकीसुद्धा धावू लागली आणि...
Solution
होतकरू रिंकी |
नंदुरबारच्या खर्डी या आदिवासी गावात रिंकी नावाची मुलगी दगड-मातीतून धावायची. सात भावंडांमध्ये पाचव्या नंबरची मुलगी होती. घरी कोरडवाहू शेती होती. त्यामुळे, तिच्या आई-वडिलांना इतरांच्या शेतात काम करणे व उन्हाळयाच्या दिवसात मजुरीसाठी गावाबाहेर पडावे लागायचे. सर्व भावंडे मात्र घरीच असायची. यातच मोठ्या भावाला पळण्याचे वेड असल्याने तो पळण्यात तरबेज झाला. पुढे जाऊन त्याने स्पर्धेत भाग घेतला. या धावण्याच्या वेडामुळेच पुढे जाऊन त्याला वनरक्षक होण्याचं भाग्य लाभलं. त्याच्यापासून प्रेरणा घेऊन रिंकीसुद्धा धावू लागली आणि आपल्या भावाच्या पावलांवर पाऊल ठेवून रिंकी धावण्याचा सराव करू लागली. तालुका स्तरावरील शालेय स्पर्धा होत्या. रिंकीला शाळेमध्ये या स्पर्धेबद्दल माहिती मिळाली. तिने आपल्या भावाजवळ हट्ट केला, की तिला या स्पर्धेत सहभागी व्हायचे आहे. रिंकीचा भाऊ स्वत: उत्तम धावपटू होता. त्याने शाळेतील शारीरिक शिक्षणाच्या शिक्षकांची भेट घेतली. शिक्षकांनी रिंकीचा सराव सुरू केला. रिंकी नियमित धाऊ लागली. तिला पळण्यासाठी स्पर्धेकरता बूट हवे होते. तिच्या भावाने बाजारातून ते आणून दिले. रिंकीला बूट घालून धावण्याची सवय नव्हती. तिला त्रास व्हायला लागला. तिच्या वेगावर त्याचा परिणाम झाला. तिने आपल्या प्रशिक्षकांना याविषयी सांगितले. तिच्या प्रशिक्षकांनी तिला सराव सुरू ठेवायला सांगितला. रिंकीचा सराव सुरू होता. तिच्या अनवाणी धावणाऱ्या पायांना आता बूट घालून धावण्याची सवय झाली होती. अखेरीस तो दिवस उजाडला. तालुकास्तरावर धावण्याच्या स्पर्धेत रिंकीने विक्रमी वेळेसह प्रथम क्रमांक पटकावला. तिच्या सरावाचे फळ तिला मिळाले. तिची निवड जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी झाली. तिचे स्वप्न मोठे होते. ऑलिंपिक स्पर्धेत देशासाठी खेळण्याचे स्वप्न तिने पाहिले होते. तिने त्या दृष्टीने सराव सुरू केला. अनेक अडचणी येणार होत्या; मात्र रिंकीचा निर्णय पक्का होता. तिचे हेही स्वप्न पूर्ण होणार याची तिला खात्री होती. त्यासाठी जिवापाड मेहनत करण्याची तिची तयारी होती. तात्पर्य: प्रयत्नांती परमेश्वर |