Advertisement Remove all ads

नाही मुठीमधे द्रव्य नाही शिरेमध्ये रक्त, काय करावें कळेना नाही कष्टाचे सामर्थ्य; जीव ओवाळावा तरी जीव किती हा लहान; तुPया शौर्यगाथेपुढे त्याची केवढीशी शान; वर घोंघावे बंबारा, पुढे - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisement Remove all ads
Advertisement Remove all ads
Long Answer

खाली दिलेल्या कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

१. चौकटी पूर्ण करा. (०२)

१. मुठीमध्ये जे नाही ते - ______

२. शिरेमध्ये जे नाही ते - ______

३. जीव असा आहे - ______

४. जवानाचे पाऊल असे आहे - ______

नाही मुठीमधे द्रव्य

नाही शिरेमध्ये रक्त,

काय करावें कळेना

नाही कष्टाचे सामर्थ्य;

जीव ओवाळावा तरी

जीव किती हा लहान;

तुझ्या शौर्यगाथेपुढे

त्याची केवढीशी शान;

वर घोंघावे बंबारा,

पुढे कल्लोळ धुराचे,

धडाडत्या तोफांतून

तुझें पाऊल जिद्दीचें;

तुझी विजयाची दौड

डोळे भरून पहावी;

डोळयांतील आसवांची

ज्योत ज्योत पाजळावी

अशा असंख्य ज्योतींची

तुझ्यामागून राखण;

दीनदुबळयांचे असें

तुला एकच औक्षण. 

२. प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. (०२)

 1. सैनिकांचे औक्षण कशाने केले जाते?
 2. दीनदुबळे असे कवयित्रींनी कोणाला उद्देशून संबोधले आहे?

३. प्रस्तुत कवितेतील शब्दांचे पर्यायवाची शब्द लिहा. (०२)

 1. डोळे
 2. कल्लोळ -
 3. शान -

 4. औक्षण -

४. खालील ओळींतील तुम्हांला समजलेला विचार तुमच्या शब्दांत लिहा. (०२)

“वर घोंघावे बंबारा, पुढे कल्लोळ धुरांचे,

धडाडत्या तोफांतून, तुझे पाऊल जिद्दीचे;”

Advertisement Remove all ads

Solution

१. चौकटी पूर्ण करा. (०२)

१. द्रव्य

२. रक्त

३. लहान

४. जिद्दीचे

२.

 1. सैनिकांचे औक्षण डोळयांतील आसवांच्या ज्योतींनी केले जाते.
 2. सैनिकांच्या कार्याचा अभिमान बाळगणाऱ्या देशवासियांना कवयित्रींनी दीनदुबळे असे संबोधले आहे.

३. 

 1. नेत्र, चक्षू, नयन
 2. लोळ
 3. मान, सन्मान
 4. ओवाळणे

४. 'औक्षण' म्हणजे ओवाळणे. सीमेवर लढायला जाण्यासाठी सुसज्ज झालेल्या जवानाला साऱ्या देशवासियांकडून केले जाणारे हे एक प्रातिनिधिक औक्षण आहे. या क्षणी मनात दाटून येणाऱ्या विविध भावभावना कवयित्री इंदिरा संत यांनी या कवितेत व्यक्त केल्या आहेत. सैनिक जेव्हा रणभूमीवर युद्धासाठी उतरतात त्यावेळी अनेक बिकट प्रसंगांचा त्यांना सामना करावा लागतो. बंदुकीच्या गोळयांचा, तोफगोळयांचा भडिमार होत आहे, नजरेपुढे धुराचे लोटच्या लोट उसळत आहेत, अशा परिस्थितीत न घाबरता, धडाडणाऱ्या तोफांची पर्वा न करता जिद्दीने, धैर्याने, शौर्याने तो लढतो. प्रसंगी प्राण तळहातावर झेलून संकटाला सामोरे जाणाऱ्या या सैनिकाचे शौर्य अवर्णनीय असते असा विचार कवयित्री या ओळींतून स्पष्ट करते.

Concept: पद्य (10th Standard)
  Is there an error in this question or solution?
Advertisement Remove all ads

APPEARS IN

Advertisement Remove all ads
Share
Notifications

View all notifications


      Forgot password?
View in app×