मनीषा आणि सविता यांच्या आजच्या वयांची बेरीज 31 वर्षे आहे. 3 वर्षांपूर्वी मनीषाचे वय सविताच्या त्या वेळच्या वयाच्या चौपट होते, तर त्या दोघींची आजची वये काढा.
Solution
समजा, मनीषाचे आजचे वय x वर्षे व सविताचे आजचे वय y वर्षे आहे.
दिलेल्या पहिल्या अटीनुसार, मनीषा आणि सविता यांच्या आजच्या वयांची बेरीज 31 वर्षे आहे.
x + y = 31 ....(i)
३ वर्षांपूर्वी,
मनीषाचे वय = (x – 3) वर्षे
सविताचे वय = (y – 3) वर्षे
दिलेल्या दुसऱ्या अटीनुसार, ३ वर्षांपूर्वी मनीषाचे वय सविताच्या त्या वेळच्या वयाच्या चौपट होते.
(x - 3) = 4(y - 3)
∴ x - 3 = 4y - 12
∴ x - 4y = - 12 + 3
∴ x - 4y = - 9 ...(ii)
समीकरण (i) मधून समीकरण (ii) वजा करून,
x + y = 31
x - 4y = - 9
- + +
5y = 40
∴ y = `40/5` = 8
y = 8 ही किंमत समीकरण (i) मध्ये ठेवून,
x + y = 31
x + 8 = 31
∴ x = 31 - 8
∴ x = 23
∴ मनीषाचे आजचे वय 23 वर्षे व सविताचे आजचे वय 8 वर्षे आहे.